खर्चाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोण | TIME Vs MONEY

आपण प्रत्येकजण या परिस्थितिमधून जात असतो. तुम्हाला एखादा चांगला शर्ट आवडतो, नुकताच लॉंच झालेला स्मार्टफोन तुम्हाला घ्यावासा वाटतो. कधीपासून तुम्ही तुमच्या आवडत्या ठिकाणी फिरायला जायच प्लान करत आहात.

पण जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टींसाठी लागणाऱ्या खर्चाचा विचार करता तेव्हा मात्र तुमच्या पोटात गोळा येतो. पण तरीही हिम्मत करून तुम्ही असे मोठे खर्च करत असता. आज नाही एन्जॉय करणार तर कधी करणार अस बोलून तुम्ही स्वताची समजूत काढता.

पण पण पण.. असा मोठा खर्च करण्याआधी जरा असा विचार करा की, तुम्ही या गोष्टींवर पैसे खर्च करत नाही तर  तुमचा टाइम खर्च करत आहात. (कस ते मी सांगतो)

पैसे नाही टाइम वाचवा  (कारण Time is Money)

एक उदाहरण घेऊ.

समजा तुम्हाला नवीन फोन घ्यायचा आहे ज्याची किंमत 20,000 रुपये आहे. आता विचार करा तुमची सॅलरी किती आहे. समजा तुमची सॅलरी 25,000 आहे. आता हे 25,000 कमविण्यासाठी तुम्ही महिन्याचे टोटल 25 दिवस काम करता. (रविवार आणि सुट्ट्या सोडल्या आहेत)

तुम्ही दिवसाचे 8 तास काम करता. (खर तर यापेक्षा जास्तच काम होत) पण तरीही आपण 8 तास घेऊ. महिन्याचे 25 दिवस * 8 तास = महिन्याचे टोटल 200 तास. आता तुमची सॅलरी जर 25,000 आहे म्हणजे 25,000/ 200 तास = 125 रुपये तासाला होतात.

आणि जर आता तुम्हाला नवीन 20,000 फोन घायचा आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या 160 तासाची कमाई यावर द्यावी लागेल. 160 तास म्हणजे टोटल 20 दिवस फक्त तुम्ही एक फोन घेण्यासाठी देणार आहात.

इतर पोस्ट वाचा 👉Save Money: बजेटच्या बाहेर खर्च होतो? तुम्ही Anchoring Bias चे शिकार तर नाही होत?

आता हे फक्त एक उदाहरण झाल. पण यामागचा धडा तुम्ही समजून घ्या. 

कोणताही खर्च करताना तुम्ही फक्त पैसे किती गेले यापेक्षा तुमचे किती दिवस किंवा तास खर्च झाले आहेत, असा विचार केलात तर तुम्ही नको त्या गोष्टींवर खर्च नक्कीच कमी करू शकता. मी अस सांगत नाही की कशावर खर्च करूच नका.

पण तुम्हाला कोणत्या गोष्टी खरंच गरजेच्या आहेत आणि कोणत्या नाही, यातला फरक तुम्हाला ओळखता आला पाहिजे. फोन असो की नवीन गाडी, शॉपिंग करणे असो की बाहेर फिरणे असो, या सगळ्यात तुम्हाला कशात जास्त आनंद मिळतो हे बघा.

अस तर होत नाही ना की, आनंद काही दिवस राहतो मग गायब. नवीन फोन घेतला की काही दिवस त्याला वापरणे मस्त वाटत. मग अजून त्या फोनचा एक नवीन मॉडेल येतो आणि मग पुन्हा तो घे हा वीक चालू.

त्यापेक्षा खर्च अशा ठिकाणी करा जिथे तुमच्या चांगल्या आठवणी बनतील. जस की फॅमिलीसोबत किंवा मित्रासोबत बाहेर फिरायला जाणे.

दृष्टिकोण बदला लाइफ बदलेल

“Time is more valuable than money. You can get more money, but you cannot get more time.” – Jim Rohn

जस जिम रॉन सांगत आहे की, टाइम हे पैशापेक्षा मौल्यवान आहे. तुम्ही पैसा कितीही कमवू शकता पण टाइम नाही. एकदा का टाइम हातातून गेलं की गेलं.

तुमचा दृष्टिकोण रुपयापासून तुमचे तास किती महत्वाचे आहेत यावर बदलायला हवा. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी खर्च करायला जाणार तेव्हा तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारां.

“काय मी या गोष्टीसाठी माझ्या लाईफचां एवढा टाइम देऊ शकतो? जर उत्तर होय असेल तर तुम्ही नक्की त्यावर खर्च करा.

पण तुम्हाला वाटलं की हा फक्त क्षणिक आनंद आहे. एखादी गोष्ट करून किंवा वस्तू घेऊन त्यामधून मिळालेला आनंद हा लाँग टर्मसाठी सहसा टिकत नाही तर त्यावर खर्च करू नका.

टाईमचा योग्य वापर करा. टाईम आहे तर पैसा कितीही कमवता येईल.

इतर पोस्ट वाचा 👉मी नोकरी करतोय पण आर्थिक स्वातंत्र्यासाठी अजून काय केल पाहिजे?

जॉइन टेलीग्राम चॅनल👉 (@marathifinance)