इंडेक्स फंड काय आहे? (Index Fund in Marathi)

1/5 - (1 vote)

म्यूचुअल फंड दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे ॲक्टिव फंडस् आणि दुसर म्हणजे पॅसीव फंडस्.  Index Fund हे पॅसीव फंडस्च्या कॅटेगरीमध्ये येतात. आजच्या पोस्टमध्ये आपण इंडेक्स काय आहेत आणि कसे काम करतात तसेच एक Safe Index Fund कसा निवडायचा हे डिटेलमध्ये समजुन घेऊ, चला तर सुरुवात करूयात.

ॲक्टिव फंड म्हणजे असा फंड जिथे एक किंवा एकापेक्षा जास्त फंड मॅनेजर्स चांगल्या कंपन्या निवडतात आणि त्यामध्ये पैसे इनवेस्ट करतात. त्यांच गोल असत की इनवेस्टरला म्हणजेच आपल्याला मार्केटपेक्षा जास्त रिटर्न आणून देणे. याउलट पॅसीव फंडचा फंडा थोडा वेगळा असतो. पॅसीव म्हणजेच इंडेक्स फंडमध्ये फंड मॅनेजरला जास्त रिसर्च करावी लागत नाही, त्याला फक्त एखाद्या ठराविक इंडेक्सला कॉपी करून मार्केट एवढा रिटर्न आपल्याला आणून द्यायचा असतो.

Index Fund नक्की कसे काम करतात?

तुम्ही सेन्सेक्स आणि निफ्टि बदल एकल असेलच ना? भारताच्या शेअर मार्केटमध्ये या 2 मुख्य इंडेक्स आहेत. सेन्सेक्स ही बॉम्ब स्टॉक एक्सचेंज ची मार्केट इंडेक्स आहे ज्यामध्ये भारताच्या टॉप 30 कंपन्यांचा समावेश होतो. जेव्हा तुम्ही एखादा इंडेक्स फंड निवडता जो सेन्सेक्सला कॉपी करतोय, याचा अर्थ असा की तुम्ही इन्वेस्ट केलेले पैसे भारताच्या टॉप 30 कंपन्यांमध्ये इन्वेस्ट केले जातात.

अगदी याचप्रमाणे एखादा Index Fund जर निफ्टि या इंडेक्स ला कॉपी करत असेल तर तो निफ्टिमध्ये असलेल्या कंपन्यांमध्ये पैसे इन्वेस्ट करतो. आता निफ्टि 50 ही नॅशनल स्टॉक एक्स्चेंजची मार्केट इंडेक्स आहे ज्यामध्ये टोटल 50 कंपन्यांचा समावेश होतो. जेव्हा तुम्ही निफ्टि 50 ला कॉपी करणारा एखादा फंड निवडता म्हणजेच तुमचा पैसा भारताच्या टॉप 50 कंपन्यांमध्ये इन्वेस्ट केला जातो.

इंडेक्स फंड का निवडावा?

  • पहिल कारण म्हणजे Index Fund सिम्पल असतात. – मी खूप नोटिस केलय की जॉबला लागल्यानंतर अनेकजण चांगला फंड निवडण्यात खूप वेळ घालवतात आणि SIP स्टार्ट करतच नाहीत त्यामुळे वर्ष वाया जातात. त्या पेक्षा एक सिम्पल Index Fund निवडा आणि SIP ला सुरवात करा. (आणि माझ्यामते एक इंडेक्स फंड प्रतेक्याकडे असावा)

  • दुसर कारण म्हणजे एक्सपेंस रेशियो खूप कमी असतो. – एक्सपेंस रेशियो म्हणजे फंड मॅनेजरला द्यावी लागणारी फी आणि इंडेक्स फंडमध्ये ही फी खूप कमी असते कारण फंड मॅनेजरला काही डोक लावायच नसत. फक्त एखाद्या इंडेक्सला कॉपी करायच असत त्यामुळे एक्सपेंस रेशियो कमी असतो.

  • तिसर कारण म्हणजे बहूतेक इंडेक्स फंडमध्ये एक्जिट लोड झीरो असतो. – एक्जिट लोड म्हणजे अचानक पैसे काढल्यानंतर द्यावी लागणारी फी आणि इंडेक्स फंडमध्ये ही फी झीरो असते त्यामूळे कधी अचानक पैसे काढले तरी काही नुकसान होत नाही.

  • चौथ कारण म्हणजे कमी रिस्क – इंडेक्स फंडमध्ये कमी रिस्क असण्याच कारण म्हणजे त्यामध्ये असलेल्या कंपन्या भारताच्या टॉप कंपन्या असतात. या कंपन्यांच नाव अख्या मार्केटभर असते. या कंपन्यांचा बिझनेस परफॉर्मेंस उत्तम असतो त्यामुळे यामध्ये पैसे इनवेस्ट करणे कमी रिस्की ठरते.

Index Fund मध्ये रिटर्न कीती मिळणारं?

जर तुम्ही शेअर मार्केचा सुरुवातीपासूनचा इतिहास पाहिलात तर इंडेक्सने 12% चा Average रिटर्न दिलाय. 12% कमी वाटत असेल पण लाँग टर्ममध्ये हेच 12% खूप कमाल करू शकतात. आणि तेच तर आपल्याला बघायच आहे. मी तर जॉब लागल्या लागल्या इंडेक्स फंडमध्ये एक SIP चालू केलीय आणि ती SIP अशीच चालू ठेवायचा माझा प्लॅन आहे. तुम्ही पण एक इंडेक्स SIP चालू करुन या प्लॅनमध्ये सामील व्हा. आणि रक्कम ५००, १००० किंवा तुम्हाला जमेल तशी घ्या. मग बघू 10 वर्षांनी काय होतय.

अरे हा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फंडच नाव तर सागितलं नाही, अस तुमच्या मनात आलं असेलच. तुम्हाला नाही सांगणार तर कोणाला सांगणार मित्रांनो. मी UTI Nifty 50 Index Fund या फंडमध्ये SIP करतो. ( Disclaimer: – हा फंड चांगला आहे पण स्वतः निट बघून घ्या. आणि इतर फंडस् असतील तर ते पण बघा. बाकी तुम्ही सगळे स्मार्ट आहातच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आधीपासून जर एखाद्या फंडमध्ये SIP करत आहात तर ही पोस्ट वाचून लगेच बंद करू नका.)

एक Safe Index Fund कसा निवडायचा? 

सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही सोधली पाहिजे ती म्हणजे Safe नक्की काय आहे? तुमच्यासाठी Safe ची व्याख्या काय आहे? आपल्या सगळ्यांना हे चांगलंच ठाऊक आहे की जिथे शेअर मार्केटच नाव येतं तिथे रिस्क अगदी मागोमाग चालत असते. कारण शेअर मार्केट हे खूप Volatile म्हणजेच चढ उतार असलेलं investment पर्याय आहे. आता तुम्ही इडेक्स फंडबद्दल एकल असेलच आणि का नाही एकणार आजकाल प्रत्येक मोठा यूट्यूबर इंडेक्स फंडची तारिफ करत असतो. (खर तर मी सुध्दा🤭) पण याचा अर्थ असा होत नाही की आपण इंडेक्स फंडच्या मागे लागलं पाहिजे.  इंडेक्स फंडमध्ये invest करायचं की नाही हे ठरवण्याआधी इंडेक्स फंड नक्की काय आहे आणि त्यामध्ये का invest केलं पाहिजे हे शिकून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये एक Safe इंडेक्स फंड कसा निवडायचा? हे आपण काही पॉइंट्सच्या मदतीने समजुन घेणार आहोत. चला तर सुरुवात करूयात!

1. क्लारिटी हवी

सगळ्यात आधी तुम्ही एक्विटी हा Asset क्लास का निवडत आहात हे स्पष्ट करा. शेअर मार्केटमध्ये तुम्ही पैसे का invest करत आहात याची Clarity तुम्हाला असायला हवी. फक्त मित्र मंडळी बोलत आहेत किंवा ते शेअर मार्केट किंवा इंडेक्स फंडमध्ये invest करत आहेत मग तुझी पण केलं पाहिजे हे चुकीचं आहे. आणि म्हणून तुमचे goals काय आहेत हे समजून मग तुझी इंडेक्स फंड किंवा शेअर मार्केटमध्ये invest केलं पाहिजे.

2. Asset Allocation महत्वाच!

कोणीही कितीही सांगेल पण सगळा पैसा कधीच फक्त एका Asset मध्ये Invest करू नका जर तुमचा Goal लाँग टर्ममध्ये चांगली wealth बनविणे आहे. याच कारण अस की कोणत Asset कशा प्रकारे काम करेल, चांगले रिटर्न देईल की नाही याची आपल्याला काही आयडिया नसते.  टीव्ही, यूट्यूब आणि आजकाल टेलिग्राम चॅनेलद्वारे मिळणारे फुकटचे सल्ले, predictions जितकं होईल तितकं टाळा. कारण मार्केट नक्की कसं परफॉर्म करेल हे कोणालाही माहीत नसते.  अशा परिस्थतीमध्ये सगळ्यांत बेस्ट strategy म्हणजे की योग्यरित्या थोडे थोडे पैसे विविध प्रकारच्या Asset मध्ये invest करणे, यालाच Asset Allocation म्हणतात.

अजून एक गोष्ट Asset Allocation करताना नेहमी तुम्ही किती टाइमसाठी पैसे invest करत आहात आणि तुमची रिस्क क्षमता काय आहे हे जाणून घ्या. योग्य Asset Allocation करून लाँग टर्मसाठी त्यासोबत टिकून राहणे ही Inventing करताना घेतली जाणारी पहिली स्टेप आहे. जर तुम्हाला Asset Allocation कसं करायचं हे माहीत नसेल तर यूट्यूब किंवा ब्लॉगच्या माध्यमातून शिका. (आणि आपला मराठी फायनान्स ब्लॉग आहेच, जितकं येईल तेवढं मी शेअर करेन पक्का प्रॉमिस🤝)

3. इक्विटीची गरज आहे!

जर तुमची Asset Allocation ही स्टेप पूर्ण झाली असेल आणि तुम्हाला इक्विटी या Asset क्लासची खरंच गरज वाटत असेल तर तुम्हाला आता याचा विचार करायचा आहे की तुम्ही इक्विटीमध्ये कशा प्रकारे पैसे invest करणार आहात. इक्विटी याचा साधा सोपा अर्थ असा की जेव्हा आपण Invest केलेला पैसा शेअर मार्केटमध्ये Invest केला जातो त्याला इक्विटी अस म्हणतात.  आता इक्विटी मार्केटमध्ये पैसे Invest करण्याचे खूप सारे मार्ग आहेत जस की 

  • डायरेक्ट स्टॉक घेणे 
  • PMS (Portfolio Management Services) – सहसा श्रीमंत लोकं याचा वापर करतात, कमीत कमी Investment ५० लाखाची असते.
  • Smallcase – अगदी रेडिमेडमेड पोर्टफोलिओ 
  • Active Mutual Funds – बहुतेक लोकांचे फेवरेट, फंड मॅनेजर डोक लावून चांगले स्टॉक निवडतो 
  • इंडेक्स फंड – हे सद्या ट्रेण्डमध्ये आहेत, फंड मॅनेजर काही करत नाही फक्त सेन्सेक्स किंवा निफ्टि 50 अशा इंडेक्सना कॉपी करतो. 

तुम्ही या पैकी तुम्हाला हवा तो मार्ग निवडा. यांपैकी PMS आणि Smallcase मध्ये विविध चार्जेस, टॅक्स इ. गोष्टी समजायला कीचकड आहेत. त्यामूळे शक्यतो हे पर्याय टाळा. जर तुम्ही स्वतः डायरेक्ट स्टॉक निवडायचा ठरवलं तर त्यासाठी स्किल, टाईम आणि Patience तुमच्याकडे असायला हवं. आता उरला एक बेस्ट पर्याय म्हणजे आपले फेवरेट म्यूचुअल फंड.

4. Index Fund ची गरज!

ज्या लोकांना हा प्रश्न पडला आहे की “एक Safe Index Fund कसा निवडायचा?” तर त्यासाठी तूम्ही ॲक्टिव फंड आणि Passive फंड यातला फरक समजला पाहिजे. थोडक्यात फरक समजायचं झालं तर ॲक्टिव फंड म्हणजे असा फंड जिथे फंड मॅनेजर त्याच डोक लावून चांगल्या कंपन्या निवडतो आणि Investors ला चांगले रिटर्न आणून देणे.  Passive fund म्हणजे असा फंड जिथे फंड मॅनेजरला जास्त डोक लावायची गरज नसते, फक्त एका इंडेक्स जस की सेन्सेक्स आणि निफ्टी ५० ला कॉपी करून इंडेक्स एवढे रिटर्न आणून द्यायचे असतात. एकदा का तुमचा ॲक्टिव फंड आणि Passive फंड यातला फरक समजला आणि तुम्ही जर इंडेक्स फंडमध्ये पैसे Invest करायचे ठरवले तर पुढील प्रश्न हा येतो की  इंडेक्स फंडमध्ये SafeIndex Fund नक्की कोणता? ते पण आपण समजून घेऊ.

 मार्केटमध्ये एकदम Safe Index Fund असू शकतो का? 

खर बोलू तर नाही! एक्विटी मार्केट म्हणजेच शेअर मार्केट हे अगदी Volatile असत. इथे सतत चढ उतार होत असतात.  तुम्ही इंडेक्स फंड का निवडत आहात कारण तुम्हाला फंड मॅनेजरची रिस्क नको आहे. आपण आधी चर्चा केली की इंडेक्स फंड एका ठराविक इंडेक्स फंडला कॉपी करतात. त्या इंडेक्समध्ये जितक्या कंपन्या असणार तुमचे पैसै त्या कंपन्यांमध्ये Invest केले जातात.  जर एखादा इंडेक्स फंड सेन्सेक्स या इंडेक्सला कॉपी करत असेल तर त्यामधे भारताच्या टॉप ३० कंपन्या असणार आणि त्यावर तुमचा पैसा लावला जाईल. कारण सेन्सेक्स या इंडेक्समध्ये ३० कंपन्या असतात. 

  • पण बाकीच्या रिस्क जस मार्केट खाली जाई, बेकार परफॉर्म करेल इ. रिस्क इंडेक्समध्ये सुद्धा असतात त्यांना आपण पुर्णपणे टाळू शकत नाही. पण तुम्ही कोणत्या प्रकारच्या कंपनीमध्ये invest करत आहात त्यानूसार रिस्क बदलत जाते. इंडेक्स फंड ज्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये Invest करतो जस की small cap company, mid cap company किंवा large cap company.  
  • एक गोष्ट लक्षात घ्या की इंडेक्स फंड पण एक प्रकारचे म्यूचुअल फंडच आहेत. काही कंपन्या आपल्या सारख्या investors ना त्यांच्या फंडमध्ये पैसे Invest करण्यासाठी आधी फंडचा expense ratio हा अगदी कमी ठेवतात. पण नंतर कोणताही कारण न देता expense ratio वाढवतात. त्यामुळे जरा सावध रहा.
  • आजकाल सगळेजण इंडेक्स फंडची खूप तारिफ करत आहेत (त्यापैकी मी पण एक) पण याचा अर्थ असा नाही तुम्ही प्रत्येक टाईपच्या इंदेडमध्ये फंडमध्ये पैसे invest केले पाहिजेत. NSE म्हणजेच National Stock Exchange मध्ये 350 एवढ्या वेगवेगळ्या इंडेक्स आहेत. आणि काही म्यूचुअल फंड कंपन्याचा अजिबात भरोसा नाही ते 350+ इंडेक्स फंड सुरू करतील. माझ्या मते निफ्टी 50, सेन्सेक्स आणि थोड रिस्क वाढवली की Nifty Next 50 या इंडेक्समध्ये Invest करा. इतर इंडेक्सकडे अगदी दुर्लक्ष करा.
  • आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे शेअर मार्केटमध्ये invest केल्यानंतर Passive Mindset असणे गरजेचे आहे. सतत रिटर्न बघत बसणे, कधी हा फंड तर कधी तो फंड अस करणे हे टाळा. काही लोक तुम्हाला भेटतील, तुम्हाला बोलतील “अरे वेड्या काय या इंडेक्स फंडमध्ये invest करतोस त्या पेक्षा Active Mutual फंड घे किंवा डायरेक्ट स्टॉक घे” अशा वेळी तुम्ही ठाम रहा. इंडेक्स फंड निवडणे हे सोप काम आहे पण लाँग टर्ममध्ये त्या इंडेक्स फंडसोबत मार्केटमध्ये टिकून राहणे फार फार कठीण असते. त्यासाठी स्वतःवर आणि स्वतःच्या प्लॅनिंगवर पूर्ण विश्र्वास ठेवावा लागेल.

या पोस्टमधून आपण काय शिकलो? 

कोणताही फंड पुर्णपणे safe कधीच नसतो. कारण शेअर मार्केटमध्ये रिस्क तर असतेच ना आणि आपल्या सगळ्यांना हे चांगलंच ठाऊक आहे. एक्विटी एक प्रकारचं Volatile Asset आहे त्यामध्ये इंडेक्स फंड फक्त फंड मॅनेजरसोबत येणारी रिस्क कमी करत. बाकी रिस्क तर राहणारच. 

आजच्या ब्लॉग पोस्टमधून तुम्ही काहीतरी नवीन शिकला असाल अशी मला खात्री आहे, भेटू आता पुढच्या पोस्टमध्ये. तो पर्यंत काळजी घ्या, पैसे Invest करा.

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi