Bharti Hexacom (Airtel) IPO: अप्लाय करताय? ही माहिती नक्की वाचा

तुम्ही सीम कार्ड कोणत वापरता? जिओ की एयरटेल? जर एयरटेल वापरत असाल तर या कंपनीचा आयपीओ येत आहे तेही भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) या नावाने.  भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) हे कंपनीच रजिस्टर नाव आहे आणि कंपनी एयरटेल (Airtel) या नावाने बिझनेस करते. (त्यामुळे कन्फ्युज होवू नका)  

भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओ 14 एप्रिल 2024 रोजी  सुरू होणार आहे. भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom)  आयपीओ 5 एप्रिल 2024 रोजी बंद होणार आहे. भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची इश्यू साइज  ₹4,275 करोड एवढी आहे.

भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची किंमत ₹542 ते ₹570  रुपये प्रती शेअर ठरविण्यात आली आहे. आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही कमीत कमी 26 शेअर्ससाठी अप्लाय करू शकता ज्याची टोटल किंमत ₹14,820 रुपये असेल.

Bharti Hexacom (Airtel) Company ची माहिती 

भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) लिमिटेडची सुरुवात एक कम्युनिकेशन्स सोल्युशन्स प्रदात म्हणून  1995 मध्ये झाली.

भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) ही राजस्थान आणि नॉर्थ ईस्ट भारतामध्ये दूरसंचार सेवा पुरवते. तसेच कंपनी एअरटेल ब्रँड अंतर्गत फिक्स्ड-लाइन, ब्रॉडबँड आणि मोबाइल सेवा देते. तुमच्याकडे सुद्धा एयरटेलच सीम कार्ड नक्कीच असेल जर तुम्ही दोन सीम कार्ड वापरत असाल.

कंपनी सातत्याने मार्केटमध्ये तिचा रेविन्यू  मार्केट शेअर वाढविण्यावर फोकस करत आहे. तसेच कंपनीचे खर्च कमी करण्यासाठी कॉस्ट ऑप्टिमायझेशनद्वारे प्रॉफिट राखत आहे. कंपनी सतत नेटवर्क विस्तारामध्ये गुंतवणूक करत आहे आणि डिजिटल पायाभूत सुविधा आणि सेवांसाठी एअरटेल ब्रॅंडचा पुरेपूर वापर करत आहेत.

भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) कडे 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 88,000 पेक्षा जास्त रिटेल टच पॉइंट्ससह विस्तृत डिस्ट्रिब्यूशन नेटवर्क आहे.

जॉइन टेलिग्राम चॅनल : @marathifinancecommunity

Bharti Hexacom (Airtel) IPO चा हेतू काय आहे? 

भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओ प्रमुख दोन कारणांसाठी मार्केटमध्ये आणण्यात येत आहे. ते पुढीलप्रमाणे 

  • सध्याच्या शेअरहोल्डरकडे असलेले 75,000,000 Equity Shares, Offer for Sale च्या माध्यमातून मार्केटमध्ये विकायला काढणे.
  • Equity Shares ना स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट करून लिस्टिंगचे फायदे मिळवणे जस की बिझनेससाठी पैसे जमा करणे

Bharti Hexacom (Airtel) कंपनीचे फायनॅनष्यल रीपोर्ट 

₹ करोंडमध्ये 
वर्ष रेविन्यू (Revenue)  खर्च (Expense) PAT (Profit After Tax)
2021 ₹4704.3 ₹3549.9 ₹1033.9
2022 ₹5494.0 ₹3591.2 ₹1674.6
2023 ₹6719.2 ₹3793.3 ₹549.2
डिसेंबर 2023 ₹5420.8 ₹2737.4 ₹281.8

Bharti Hexacom (Airtel) IPO ची अलॉटमेंट आणि लिस्टिंग तारीख 

भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची सुरवात 3 एप्रिल 2024 रोजी सुरू होणार आहे आणि हा आयपीओ 5 एप्रिल 2024 रोजी बंद होणार आहे. भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची अलॉटमेंट 8 एप्रिल 2024 रोजी फिक्स करण्यात आली आहे. या आयपीओची लिस्टिंग 12 एप्रिल 2024 रोजी 2024 रोजी केली जाईल.

आयपीओच्या किंमतची घोषणा April 3, 2024
आयपीओ सुरू होणार April 3, 2024
आयपीओ बंद होणार April 5, 2024
आयपीओची अलॉटमेंट April 8, 2024
रिफंड मिळणार April 10, 2024
शेअर डीमॅट अकाऊंटमध्ये येणार April 10, 2024
आयपीओची लिस्टिंग होणार April 12, 2024

Bharti Hexacom (Airtel) IPO FAQs 

Question 1) भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची अलॉटमेंट तारीख काय आहे?

Answer: भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची अलॉटमेंट तारीख  8 एप्रिल 2024 आहे.

Question 2) भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची रिफंड तारीख काय आहे?

Answer: भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची रिफंड तारीख 10 एप्रिल 2024 आहे.

Question 3) भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?

Answer: भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओ 12 एप्रिल 2024 रोजी BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल.

ही पोस्ट वाचा :- शेअर मार्केट काय आहे? | Share Market Information in Marathi 

Leave a Comment

आर्थिक स्वातंत्र्य काय आहे? | What is financial freedom in Marathi भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची माहिती | Airtel IPO 31 मार्चच्या आधी हे करा, नाहीतर बंद होतील म्यूचुअल फंड व्यवहार | Mutual Fund RE-KYC चांगला सीबील स्कोर का गरजेच आहे? | Why do you need a CIBIL score?) सीबील स्कोर काय आहे? | What is CIBIL Score?