तुमच्या पैशापासून पैसा कसा बनवाल? | How to Make Money from Your Money

How to Make Money: आजच्या बदलत्या फायनॅन्सच्या दुनियेत हा मी नुकताच वाचलेला Quote अगदी योग्यरित्या लागू होतो. “Money loses money when unemployed”. याचा अर्थ असा की, जेव्हा तुम्ही तुमच्या पैशाला कामाला न लावता असच आराम करू देता तेव्हा तो पैसे कमवत नाही तर गमावतो.

आजच्या पोस्टमध्ये तुमच्या पैशाला कसं कामाला लावता येईल यावर चर्चा करणार आहोत. चला तर सुरुवात करूया.

तुमचा पैसा तुमच्यासाठी काय आहे?

कल्पना करा की तुमच्याकडे असलेला पैसा हा तुमचा एक कामगार आहे किंवा नोकर आहे.

आता या कामगाराला असच बसून ठेवलत तर तुमच्या वेल्थ बनविण्याच्या प्रवासात त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि पैशाचा पुरेपूर वापर करून घ्यायचा असेल तर त्याला काहीतरी काम द्याव लागेल. ते काम म्हणजे तुमच्यासाठी जास्त पैसे बनविणे.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉कमी सॅलरीमधून वेल्थ कशी बनवायची? | How to Build Wealth with Low SALARY in Marathi 

जास्त पैसे कसे बनवणार?

जास्त पैसे बनविण्याचा सगळ्यात बेस्ट मार्ग म्हणजे पैसे इन्वेस्ट करणे. पैशाला एका बँक अकाऊंटमध्ये पडून ठेवण्यापेक्षा त्याला योग्य ठिकाणी इन्वेस्ट केलेल कधीही चांगल. पैसे इन्वेस्ट करण्यासाठी खूप सारे मार्ग उपलब्ध आहेत. काही बेस्ट मार्ग पुढीलप्रमाणे

स्टॉक मार्केट :- तुम्हाला जर डायरेक्ट स्टॉक निवडता येत असतील तर काही नेमके स्टॉक्स निवडून एक चांगला पोर्टफोलियो बनवा.

म्यूचुअल फंड SIP: – डायरेक्ट स्टॉक निवडायच टेंशन नकोय तर तुमच्यासाठी SIP हा मार्ग अगदी बेस्ट आहे.

ETF: – म्यूचुअल फंड पण नको आणि डायरेक्ट स्टॉक पण नकोय तर ETF मध्ये तुम्ही पैसे इन्वेस्ट करू शकता. रिटर्न पण मिळतात सोबत स्वस्त पण असतात.

Entrepreneurship: – स्वताचा बिझनेस करायचा आहे, डोक्यात चांगली आयडिया असेल तर त्यावर नक्की तुम्ही इन्वेस्ट केल पाहिजे.

गोल्ड:- इथे जास्त रिटर्न नाही पण Consistent रिटर्न नक्कीच मिळतील.

आर्थिक स्वातंत्र्याची गुरुकिल्ली हीच आहे की तुम्ही जितकी मेहनत पैसे कमविण्यासाठी घेत आहात त्यापेक्षा जास्त मेहनत तुमच्या पैशाने तुमच्यासाठी घेतली पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमच्या पैशाला एक काम देता, पैसे वाढविण्याचा एक हेतु देता तेव्हा तुमचा पैसा पडून न राहता वाढायला म्हणजेच Compound व्हायला सुरुवात होते.

Put your money to work, and watch it contribute to your financial success.

जॉइन मराठी फायनॅन्स कम्यूनिटी👉 (@marathifinance)

3 thoughts on “तुमच्या पैशापासून पैसा कसा बनवाल? | How to Make Money from Your Money”

Leave a Comment