Share Market Information: शेअर मार्केट म्हणजे अस मार्केट जिथे शेअर्सची खरेदी – विक्री केली जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शेअर म्हणजे नक्की काय? एक सिम्पल एक्झॅपलने समजून घेऊत.
समजा, तुम्ही तुमच्या गावी एक चहाचा बिझनेस सुरू केलात. बिझनेस सुरू होवून २ वर्ष झाली आहेत आणि बिझनेस अगदी मस्त चालला आहे. पण आता तुम्हाला बिझनेस हा फक्त गावापुरता मर्यादीत नं ठेवता मोठ्या शहरात घेऊन जायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला हवाय मोठा पैसा. पण बँकमध्ये लोन घ्यायला गेलात तर बँक खूप सारा व्याज लावतेय.
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 @marathifinance
मग आता करायच काय?
तुम्ही शेअर मार्केटमध्ये जाणार आणि भारताच्या अख्या पब्लिककडे पैसे मागणार तुमचा बिझनेस वाढवायला. आता पब्लिक काय फ्रीमध्ये पैसे देणार तुम्हाला तर अजिबात नाही. तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेणार तर तुम्हाला पण काहीतरी द्याव लागेल ना? त्यालाच म्हणतात शेअर.
थोडक्यात काय तर तुम्ही तुमच्या बिझनेस मधला थोडासा हिस्सा/ भागीदारी पब्लिकला देणार आहात. आणि त्यांना पब्लिकला शेअरहोल्डर बोल जात. कारण त्यांच्याकडे तुमच्या बिझनेसचे काही शेअर्स असतात. आणि हे शेअरहोल्डर एकाप्रकारे तुमच्या बिझनेसचे मालक बनतात पण जितका पैसा त्यांनी दिलय त्या हिशोबने त्यांना तो हक्क मिळतो.
अगदी याचप्रमाणे मोठ मोठ्या कंपन्या जस की HDFC, WIPRO, TATA आणि अशा अनेक कंपन्या बिझनेससाठी पैसा जमा करतात. (ही शेअर मार्केटची बेसिक कन्सेप्ट झाली. आता आपण Stock Exchage काय आहे ते समजून घेऊ)
स्टॉक एक्स्चेंज काय आहे? (What is Stock Exchange in Marathi)
स्टॉक एक्स्चेंज या नावावरून तुम्हाला अंदाज आला असेल की स्टॉक एक्स्चेंज नक्की काय आहे.
स्टॉक म्हणजे एखाद्या कंपनीचा शेअर किंवा हिस्सा. एक्स्चेंज म्हणजे देवाण-घेवाण किंवा खरेदी- विक्री. विविध कंपन्यांच्या शेअर्सची देवाण घेवाण किंवा खरेदी-विक्री करण्याच ठिकाण म्हणजे स्टॉक एक्स्चेंज.
भारतामध्ये मुख्य २ मुख्य स्टॉक एक्स्चेंज आहेत आणि ते म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE – Bombay Stock Exchange) आणि दुसर म्हणजे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE- National Stock Exchange)
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange)
- स्थापना: ९ जुले १८७५
- भारतातील तसेच आशियातील सर्वांत जुने स्टॉक एक्स्चेंज म्हणुन ओळखले जाते.
- ७००० पेक्षा जास्त कंपन्या या स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टेड आहेत.
- बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स (Sensex) आहे ज्यामध्ये भारतातील टॉप ३० कंपन्याचा समावेश होतो.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange)
- स्थापना: २७ नोव्हेंबर १९९२
- भरतातील सगळ्यात मोठे Stock exchange म्हणून ओळखले जाते.
- १६०० पेक्षा जास्त कंपन्या या Stock exchange वर लिस्टेड आहेत.
- नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा बेंचमार्क इंडेक्स Nifty50 आहे ज्यामध्ये भारतातील टॉप 50 कंपन्यांचा समावेश होतो.
स्टॉक एक्स्चेंज नक्की काम कसं करत?
मोठं मोठ्या कंपन्या जेव्हा बिझिनेस वाढवण्यासाठी पैसा जमा करत असतात तेव्हा त्या त्याचे शेअर्स स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट करतात. अस केल्याने मी, तुम्ही आणि कोणीही हे शेअर्स विकत घेऊ शकतो. थोडक्यात काय तर Stock exchange एक माध्यम आहे जे इनवेस्टर आणि कंपनीला एकत्र घेऊन येते.
स्टॉक एक्स्चेंजचे फायदे
१) बिझिनेससाठी पैसा :- स्टॉक एक्सचेंजच्या मदतीने अनेक कंपन्या त्यांचे शेअर्स पब्लिकला (म्हणजेच आपण) विकून पैसा गोला करतात.
२) लिक्विडीटी (Liquidity): – लिक्विडीटी म्हणजे पैशाची गरज पडली की लगेच पैसा हातात आला पाहिजे. जसं की गोल्ड, विकल की लगेच कॅशमशे रूपांतर करता येत. स्टॉक एक्सचेंजमुळे तुम्ही शेअर्स कधीही विकू शकता आणि त्याचे पैसे तुमच्या बँक अकाऊंटमध्ये येतात.
३) गुंतवणूकीची संधी:- स्टॉक एक्सचेंजमुळेच तर आपण कंपन्याचे शेअर्स विकत घेऊ शकतो मग कंपनी मोठी असो की छोटी आणि त्यावर रिटर्न मिळवू शकतो. यातून पैसा वाढवता येतो.
४) अर्थव्यवस्थेची वाढ:- प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी एक्सचेंज एक महत्वाचा भाग आहे. स्टॉक एक्सचेंजमुळे कंपन्यांना बिझिनेस वाढवायला पैसा मिळतो त्यामुळे तर आपल्या अनेक लोकांना नोकऱ्या उपलब्ध होतात.
५) पारदर्शकता (Transparency): – स्टॉक एक्सचेंज कंपन्यांना त्यांची आर्थिक माहिती जसं प्रॉफिट, लॉस, अकाउंट, बैलेंस शीट इ. लोकांसमोर जाहीर करण्यास बंधनकारक करते. त्यामुळे तर इनवेस्टर पैसा इनवेस्ट करायचा की मनी याबदल योग्य निर्णय घेऊ शकतात.
शेअर मार्केटमधील कंपन्यांचे प्रकार (Types of Companies in Share Market)
भारतीय शेअर मार्केटमध्ये कंपन्यांचे वर्गीकरण त्यांच्या बाजार भांडवलाच्या (Market Cap) आधारे केले आहे..हे वर्गीकरण भारतातील शेअर मार्केटच्या कामकाजावर देखरेख ठेवणारी नियामक संस्था सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI – Securities and Exchange Board of India) करते. (सेबीला शेअर मार्केटच पोलिस म्हणून आपण बोलू शकतो.) सेबीने Share Market मधील कंपन्यांना खालील कॅटेगरीसमध्ये वाटून दिल आहे.
लार्ज कॅप कंपन्या (Large Cap Companies):
लार्ज कॅप कंपन्या म्हणजे २०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त मार्केट कॅप असलेल्या कंपन्या असतात. या कंपन्या आपापल्या सेक्टरमध्ये टॉपवर असतात. त्यांच मार्केटमध्ये मोठ नाव असत आणि लोकांना या कंपन्यांवर चांगला विश्वास असतो. या कंपन्यांमध्ये पैसे इनवेस्ट करणे कमी रिस्की असते. भारतातील लार्ज कॅप कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस आणि एचडीएफसी बँक इ. यांचा समावेश होतो.
मिड कॅप कंपन्या (Mid Cap Companies):
मिड कॅप कंपन्या म्हणजे ज्यांचे मार्केट कॅप ५,००० कोटी ते २०,००० कोटी या दरम्यान असते. या कंपन्या सामान्यत: लार्ज-कॅप कंपन्यांपेक्षा जास्त रीस्की असतात आणि या कंपन्यांमध्ये पैसे इनवेस्ट करणे मध्यम रिस्कचे असते. मिड-कॅप कंपन्या सामान्यत: वाढत्या कंपन्या असतात ज्यांचा बिझनेस ट्रॅक रेकॉर्ड चांगला असतो आणि त्या लार्ज-कॅप कंपन्या बनण्याच्या मार्गावर असतात. भारतातील मिडकॅप कंपन्यांची उदाहरणे म्हणजे एमआरएफ, टोरंट फार्मास्युटिकल्स आणि इंद्रप्रस्थ गॅस इ.
स्मॉल-कॅप कंपन्या (Small Cap Companies):
स्मॉल कॅप कंपन्या म्हणजे जयंच मार्केट कॅप १,००० कोटी ते ५,००० कोटी रुपयांच्या दरम्यान असते. लार्ज कॅप आणि मिड कॅप कंपन्यांपेक्षा या कंपन्या सामान्यत: खूप जास्त रिस्क असतात. पण त्यांच्यात जास्त रिटर्न मिळण्याची क्षमता देखील असते. स्मॉल-कॅप कंपन्या सामान्यत: नवीन कंपन्या असतात ज्या मार्केटमध्ये स्वत: ला स्थापित करण्याचा प्रयत्न करीत असतात. भारतातील स्मॉल कॅप कंपन्यांची उदाहरणे म्हणजे न्यूक्लिअस सॉफ्टवेअर, ओरिएंट इलेक्ट्रिक आणि केएनआर कन्स्ट्रक्शन्स इ.
मायक्रो-कॅप कंपन्या (Micro-cap Companies):
मायक्रो कॅप कंपन्या म्हणजे १,००० कोटी रुपयांपेक्षा कमी मार्केट कॅप असलेल्या कंपन्या. या कंपन्या मार्केट कॅपिटलायझेशनच्या दृष्टीने सर्वात लहान असतात आणि सर्वात रिस्क याच कंपन्यांमध्ये असते. सामान्यत: या स्टार्ट-अप किंवा छोट्या कंपन्या असतात ज्या त्यांच्या ग्रोथच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर असतात. मायक्रो-कॅप कंपन्यांमध्ये सर्वाधिक रिटर्न मिळण्याची क्षमता असते पण यामध्ये रिस्क पण तेवढीच असते. नवीन इनवेस्टरने यापासून लांब राहिलेल बर असत.
भारतीय शेअर मार्केट गुंतवणूकदारांना विविध कंपन्यांमध्ये पैसे इनवेस्ट करण्याची संधी प्राप्त करून देते. प्रत्येक कंपनीची काही खास वैशिष्ट्ये असतात. काहीमध्ये जास्त रिस्क असते तर काहींमध्ये रिस्क एकदम कमी असते. अगदी रिटर्नच पण तसच आहे, काहींमध्ये जास्त रिटर्न मिळतो तर काहींमध्ये कमी मिळतो. गुंतवणूकदारानी प्रत्येक कॅटेगरीला नीट समजुन घेऊन मगच त्यात पैसे इनवेस्ट केलें पाहिजेत.
इतर पोस्ट वाचा 👉 या 5 हेल्पफुल टिप्स फॉलो करा, शेअर मार्केटमध्ये यशस्वी व्हा
9 thoughts on “शेअर मार्केट म्हणजे काय? मराठीतून सविस्तर माहिती | Share Market Information in Marathi”