Flair Writing IPO Allotment Status नोव्हेंबर 30, 2023 ला Finalize करण्यात आल आहे. ज्या लोकांनी या IPO साठी Apply केलं होत पण त्यांना शेअर्स Allot होणार नाहीत त्यांचे पैसे रीफंड केले जातील. रीफंडची प्रोसेस 1 डिसेंबर 2023 ला चालू होईल. आणि ज्या लोकांना या IPO Allot झाला असेल त्यांना डिसेंबर 4 ला शेअर्स त्यांच्या डिमॅट अकाउंटमध्ये येतील.
Flair Writing IPO चे Investors ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी IPO Allotment Status चेक करू शकतात. आणि ते कसं करायचं हेच आपण या पोस्ट समजून घेणार आहोत.
Flair Writing IPO Subscription Status काय आहे?
Flair Writing IPO सगळ्या कॅटेगरी एकत्र पाहिलं तर ४९.२८ Times Subscribed झाला आहे.
त्यांपैकी QIB (Qualified Institutional Buyers) नी या IPO जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. या कॅटेगरीमध्ये हा IPO १२२.०२ Times Subscribed झाला आहे. QIB कॅटेगरीमध्ये यामध्ये मोठ मोठ्या Mutual Funds कंपन्या, पेन्शन फंड, Insurance कंपन्या, बँका इत्यादिचां समावेश होतो.
NII (Non-Institutional Investors) या कॅटेगरीमध्ये हा IPO ३५.२३ Times Subscribed झाला आह. NII म्हणजे भरतीय नागरिक,NRI (बाहेर देशात राहणारा भारतीय व्यक्ती), HUF – Hindu Undivided Family चा कर्ता, एखादी ट्रस्ट, सोसायटी इ. जे २ लाखापेक्षा जास्त शेअर्ससाठी Apply करतात.
आता राहिले आपल्या सारखे सामान्य माणूस म्हणजेच Retail Investors. या कॅटेगरीमध्ये Flair Writing IPO १३.७३ Times Subscribed झाला आहे.
Linkintime या वेबसाईटवर Flair Writing IPO चा Status कसा चेक करायचा?
- लॉग इन करा Flair Writing IPO Allotment Page वर 👉Link Intime India Pvt Ltd – IPO Allotment Status
- IPO च नाव सिलेक्ट करा
- यांपैकी एखादा ऑप्शन सिलेक्ट करा – PAN नंबर, ॲप्लिकेशन नंबर किंवा DP ID ऑप्शन
- सर्च ऑप्शन वर क्लिक करा
- तुम्हाला Flair Writing IPO ची Allotment Status तुमच्या स्क्रिनवर बघायला मिळेल.
Demat Account मध्ये Flair Writing IPO चा Status कसा चेक कराल?
- तुमच्या ब्रोकर ला कॉल करा जर तुम्ही ऑफलाईन डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट वापरत असाल
- ऑनलाईन चेक करण्यासाठी डिमॅट अकाउंट/ट्रेडिंग अकाउंटमध्ये लाँग इन करा
- जर शेअर्स तुम्हाला Allot झाले असतील तर तुमच्या Demat Account मध्ये दिसतील.
(Zerodha, Groww, Angel One किंवा इतर डिमॅट अकाउंट तुम्ही वापरत असाल तरी प्रोसेस तीच असेल)
Bank Account च्या मदतीने Flair Writing IPO चा Status कसा चेक कराल?
- Bank Account चेक करा ज्यामधून तुम्ही IPO साठी Apply केलं होतं.
- Bank Account चा बॅलन्स चेक करा.
- जर तुम्हाला शेअर्स Allot झाले असतील तर पैसै डेबिट झाले असतील
- जर तुम्हाला शेअर्स Allot झाले नसतील तर जे पैसे ब्लॉक झाले होते ते तुम्हाला परत येतील.
Flair Writing IPO बद्दल माहिती
Flair Writing IPO ची सुरुवात २२ नोव्हेंबर २०२३ ला झाली होती आणि हा IPO २४ नोव्हेंबर २०२४ ला बंद झाला होता. Flair Writing IPO ची इश्यू साईज २९२ करोड एवढी आहे. एका लॉट मध्ये कमीत कमी ४९ शेअर्स घेता येत होते ज्याची एकूण किंमत ₹१४,८९६ होते. Flair Writing IPO भारतातील दोन्ही मोठ्या स्टॉक एक्सचेंज Bombay Stock Exchange आणि National Stock Exchange वर डिसेंबर ५, २०२३ ला लिस्ट होईल.
Flair Writing IPO चा हेतू काय आहे?
- नवीन Manufacturing फॅसिलिटी उभी करणे
- Flair च्या Subsidiaries कंपन्यांसाठी वर्किंग कॅपिटल पुरवणे
- आधीचे लोन आणि Borrowing ना फेडण्यासाठी
- इतर कॉर्पोरेट कामांसाठी या IPO मधून येणाऱ्या पैशाचा वापर केला जाईल.
Flair Writing IPO FAQs (in Marathi)
1) Flair Writing IPO ची Allotment Date काय आहे?
Flair Writing IPO ची Allotment Date नोव्हेंबर ३०, २०२३ आहे.
2) Flair Writing IPO ची Refund Date काय आहे?
Flair Writing IPO ची Refund Date १ डिसेंबर २०२३ आहे.
3) Flair Writing IPO स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?
Flair Writing IPO ५ डिसेंबर २०२३ ला स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल (BSE आणि NSE वर)
1 thought on “Flair Writing IPO Allotment Status कसा आणि कुठे चेक कराल?”