Bajaj Group: – मार्केट कॅपमध्ये रु.10 लाख करोडचा टप्पा केला पार, असे करणारे बजाज ग्रुप 5 वे बिझनेस हाऊस

Bajaj Group News

मार्केट कॅपमध्ये रु. 10-लाख करोडचा टप्पा पार करणारे बजाज ग्रुप हे पाचवे बिझनेस हाऊस बनले आहे. यापूर्वी टाटा ग्रुप, मुकेश अंबानी ग्रुप, एचडीएफसी बँक आणि अदानी ग्रुपने हा टप्पा गाठला आहे.

बजाज ग्रुप विविध कंपनी मध्ये, Bajaj Auto मध्ये सगळ्यात जास्त वाढ झालीआहे. बजाज ऑटोमध्ये यावर्षी 72% हून अधिक वाढ झाली आहे. त्यासोबत बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह 12% आणि 9% ने वाढले आहेत. तर बजाज होल्डिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट ही बजाज ग्रुपची कंपनी या वर्षी 36% ने वाढली आहे. महाराष्ट्र स्कूटर्स 74% ने वाढली आहे.

(हे वाचा:- Market Capitalization: – कंपनीच बाजार भांडवल म्हणजे काय?)

दिवंगत राहुल बजाज ग्रुपशी संलग्न असलेल्या पाचही Listed कंपन्यांनी उत्तम परफॉर्मेंस दाखवला आहे. बजाज फिनसर्व्ह आणि बजाज फायनान्सचे नेतृत्व संजीव बजाज करत आहेत, तर बजाज ऑटोचे नेतृत्व राजीव बजाज करत आहेत. महाराष्ट्र स्कूटर्स ही बजाज होल्डिंग्स आणि इन्व्हेस्टमेंटची Subsidiary आहे.

Company Stock
Bajaj Auto +72%
Bajaj Finance +12%
Bajaj Finserv +9%
Bajaj Holdings & Investment +36%
Maharashtra Scooters +74%

 

Triumph Bike मुळे Bajaj Auto ची ग्रोथ

Triumph Speed 400
Photo Credit: – www.triumphmotorcycles.in

या वर्षाच्या सुरुवातीला ट्रायम्फ बाईक लाँच केल्यानंतर बजाज ऑटोच्या लक्षणीय वाढीमुळे बजाज ऑटो चे शेअर्स वाढले आहेत. CEO राजीव बजाज यांनी बजाज ट्रायम्फसाठी दर महिन्याला 10,000 युनिट्स विकण्याचे ध्येय ठेवल आहे. कंपनीला या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या 3 महिन्यात बाइकच प्रॉडक्शन आणि विक्री 18,000 युनिट्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

ब्रिटिश मोटरसायकल ब्रँड ट्रायम्फ सोबत Collaboration करुन डिसेंबरमध्ये नवीन प्रॉडक्ट रोलआउटसाठी सेट केली आहेत. Triumph Speed 400 आणि Scrambler 400 X या दोन्ही बाइक जुलैपासून भारतात उपलब्ध आहेत. या दोन्ही बाइकच्या चांगल्या सेल्समुळे कंपनीच्या रेविन्यूमध्ये वाढ झाली आहे.

Bajaj Finance आणि Bajaj Finserve ने दिले कमी रिटर्न

बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्हने कमी रिटर्न दिला आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज सारख्या प्रमुख कंपन्यांच्या Financial Services सेक्टरमध्ये प्रवेश केल्याने स्पर्धा वाढण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे बजाज फायनान्सच्या ग्रोथच्या शक्यतांवर परिणाम होईल, असे एक्स्पर्टनी म्हटले आहे.

B2B (Busines to Business) आणि B2C (Business to Consumer) विभागातील ही वाढलेली स्पर्धा बजाज फायनान्सच्या मीडियम टर्म प्रॉफिटवर परिणाम करू शकते. प्रायवेट बँका आजकाल ‘Buy Now, Pay Later’ अशा सुविधा देतात तसेच पर्सनल लोन सहज उपलब्ध करून देतात. यामुळे B2C या भागात बजाज फायनान्सच्या प्रॉफिटवर अधिक ताण येईल, असे एक्स्पर्टनी सांगितले आहे.

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance) 

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

Market Capitalization: – कंपनीच बाजार भांडवल म्हणजे काय?

Share Market काय आहे? (Detail Information in Marathi) 

Sensex & Nifty: – सेन्सेक्स आणि निफ्टी काय आहे? 

Leave a Comment

श्रीमंत व्यक्तींच्या 5 सवयी (ज्या तुम्ही विकसित केल्या पाहिजेत) Nova Agritech IPO GMP: ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? BLS-E Services IPO: अप्लाय करण्याआधी डीटेल माहिती वाचा डिटेल माहिती: HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य कस मिळेल? | 3 Steps of Financial Freedom in Marathi