Warren Buffett यांनी Paytm Share मधील सगळी हिस्सेदारी विकली!

Rate this post

Berkshire Hathaway या कंपनीने Paytm मधिल त्यांची सगळी हिस्सेदारी विकली आहे. ज्या रक्कमेत त्यांनी ही डील केली होती त्यापेक्षा 40% लॉसवर Berkshire Hathaway हे शेअर्स विकणार आहे.

Warren Buffett यांची कंपनी Berkshire Hathaway ने 2018 मध्ये यांनी ही गुंतवणूक $260 मिलियन डॉलर Paytm ला देऊन विकत घेतली होती. या बदल्यात Berkshire Hathaway ला Paytm मध्ये 3% ची हिस्सेदारी मिळाली होती. Warren Buffett यांची कंपनी Berkshire Hathaway साठी Paytm ही भारतातील पहिली डायरेक्ट स्टार्टअप Investment होती.

Berkshire Hathaway ने Paytm चे सारे शेअर्स विकल्यानंतर हे शेअर्स Ghisallo Master Fund आणि Copthall Mauritius Investment या दोन कंपन्यांनी विकत घेतले आहेत. Paytm च्या प्रत्येक शेअरची Berkshire Hathaway ला ₹877.2 एवढी किंमत मिळाली आहे. या डीलमधून Berkshire Hathaway ने ₹1371 करोड रुपये परत घेतले आहेत.

जेव्हापासून ही न्यूज मार्केटमध्ये आली आहे Paytm च्या शेअर्समध्ये घसरण सुरू झाली आहे. 23 नोव्हेंबरला मार्केट बंद झाल्यावर Paytm च्या शेअरची किंमत ₹921 रूपये होती जी आता ₹892.55 आहे.

Paytm Share बद्दल माहिती

Paytm Share ची चालू किंमत ₹892.55 रूपये आहे. Paytm IPO 8 नोव्हेंबर 2021 ला आला होता तेव्हा एका लॉटमध्ये तुम्ही 6 शेअर्स घेऊ शकत होतात. ज्यांची किंमत प्रत्येकी ₹2080-2150 अशी होती.

Paytm Quarter 2 चे रिझल्ट्स

Paytm ची पॅरेंट कंपनी One97 Communications ने सप्टेंबर 30, 2023 च्या तिमाही निकालमध्ये ₹290.5 करोडचा लॉस बूक केला आहे. मागच्या वर्षीच्या तिमाही सप्टेंबर तिमाही निकालामध्ये ₹571.1 करोड एवढा लॉस बूक केला होता.

या सप्टेंबर तिमाही निकालामध्ये Paytm चा रेव्हेन्यू मात्र वाढला आहे. आता रेव्हेन्यू ₹2,519 करोड एवढा आहे. मागच्या वर्षी हाच रेव्हेन्यू ₹1914 करोड एवढा होता म्हणजे रेव्हेन्यूमध्ये 32% ने वाढ झाली आहे.

Berkshire Hathaway कंपनी बद्दल माहिती

  • Berkshire Hathaway ही एक Multinational Conglomerate कंपनी आहे. Conglomerate म्हणजे अशी कंपनी जीचे बिझीनेस जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात आहेत.
  • Berkshire Hathaway ची सुरुवात Warren Buffett आणि Charlie Munger यांनी 1839 मध्ये केली होती.
  • ही कंपनी अनेक क्षेत्रात बिझीनेस करते जस की इन्शुरन्स, एनर्जी, मनुफॅक्चरींग, रिटेल इ.
  • Berkshire Hathaway कडे Coca-Cola, Apple, Bank of America आणि इतर मोठ्या कंपन्यांमध्ये हिस्सेदारी आहे.
  • Warren Buffett हे या कंपनीचे चैअरमन आणि CEO आहेत आणि Charlie Munger हे वाईस चैअरमन आहेत.

Paytm कंपनी बद्दल माहिती

  • Paytm ही भारतातील डिजिटल पेमेंट कंपनी आहे जी विविध प्रकारच्या सर्व्हिसेस पुरवते जस की मोबाईल पेमेंट, बिल पेमेंट, मनी ट्रान्स्फर आणि इ-कॉमर्स इ.
  • Paytm ची सुरूवात विजय शेखर शर्मा यांनी 2010 मध्ये केली आणि Paytm च मेन ऑफिस नोएडाला आहे.
  • Paytm चे जवळजवळ 400 मिलियन एवढे युजर आहेत. भारताची ही एक मोठी डिजिटल पेमेंट कंपनी आहे.
  • Paytm Wallet, Paytm QR code, Paytm UPI आणि Paytm साऊंड बॉक्स (Paytm करो हा आवाज एकला असेलच)
  • Paytm नंतर इतर कंपन्या जस की Phonepe, Google Pay, RazorPay आणि इतर मार्केटमध्ये आल्या आहेत.

इतर महत्वाच्या पोस्ट

Share Market काय आहे? 

Gandhar Oil Refinery IPO Day 3: – गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद! 

TATA Technologies IPO: Date, Price, Lot Size आणि इतर माहिती 

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi