Gandhar Oil Refinery IPO: – Date, Price आणि इतर माहिती

Rate this post

Gandhar Oil Refinery IPO (Initial Public Offering)  दिनांक 22 नोव्हेंबर 2023 ला Primary मार्केटमध्ये येणार आहे. 

Gandhar Oil Refinery IPO  ची किंमत ₹160 ते ₹169 या दरम्यान ठरवली आहे. एका लॉटमध्ये तुझी टोटल 88 शेअर्स घेऊ शकता ज्याची किंमत ₹14,080 रूपये असेल. या IPO च्या मदतीने कंपनी 500 करोड रुपये जमा करायचा हेतू आहे ज्याचा वापर पुढे बिझनेस वाढविण्यासाठी केला जाईल. 

Gandhar Oil Refinery IPO Application डिटेल 

Investor पुढील 2  कॅटेगरीमध्ये Apply करू शकतात.

1) Regular Investor म्हणून Apply करा

  • किंमत = ₹160-₹169 रूपये
  • तुम्ही टोटल ₹200000 पर्यंत Apply करू शकता 

2) High Net Worth Individual म्हणून Apply करा

  • किंमत = ₹160-₹169 रूपये 
  • तुम्ही टोटल ₹200,000 रुपये – 5,00,000 रुपये पर्यंत Apply करू शकता.

Gandhar Oil Refinery कंपनीबद्दल माहिती 

गंधार ऑइल रीफायनरी या कंपनीची सुरुवात 1192 मध्ये झाली. या कंपनीचे मॅनिजिंग डायरेक्टर रमेश बाबूलाल पारेख आहेत.

गंधार ऑइल रीफायनरी ही एक व्हाइट ऑइल बनवणारी कंपनी आहे. गंधार ऑइल रीफायनरी ही कंपनी बिझनेससाठी प्रामुख्याने दोन सेक्टरवर फोकस करते आणि ते सेक्टर म्हणजे Consumer आणि Healthcare सेक्टर. 2017 मध्ये सुध्दा या कंपनीने IPO मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता पण काही कारणास्तव त्यांना तो प्लॅन कॅन्सल करावा लागला होता. 

आता २०२३ मध्ये पुन्हा Gandhar Oil Refinery ही कंपनी तीचा IPO घेऊन येत आहे. Gandhar Oil Refinery ही कंपनी White Oil निर्माती कंपनी आहे आणि ते ३५०+ पेक्षा जास्त प्रकारचे प्रोडक्ट बनवतात. 

१०० पेक्षा जास्त देशांमध्ये यांचे प्रॉडक्ट विकले जातात. सद्या त्यांच्याकडे ३५०० पेक्षा जास्त Clients आहेत जे यांचे प्रॉडक्ट विकत घेतात. यामध्ये काही प्रसिद्ध कंपन्यांचा समावेश होतो जस की P&G, Unilever, Marico, Dabur इत्यादी.

Gandhar Oil Refinery चे प्रोडक्टचां वापर कुठे होतो?

Personal Care – स्किनवर लावले जाणारे Moisturizer, Cleansers, Creams, केसांवर लावले जाणारे प्रोडक्ट, मेकअपचे प्रोडक्ट इत्यादी मध्ये White Oil चा वापर होतो.

Health Care – लहान मुलांचे लोशन आणि Oils, Massage Oils, Syrups इत्यादी मध्ये White Oil चा वापर होतो.

Performance Oil – मोठ मोठ्या मशिनमध्ये Lubricants म्हणून White Oil चा वापर होतो.

Gandhar Oil Refinery प्रॉफिट, रेविन्यू  आणि टोटल Assets

Gandhar Oil Refinery कंपनीच्या रेव्हेन्यू, Assets आणि प्रॉफिटवर नजर टाकलीत तर त्यामध्ये एक चांगली वाढ बघायला मिळत आहे. २०२३ मध्ये कंपनीचे Total Assets ₹१६१३.४४ करोड आहेत तसेच रेव्हेन्यू ₹४०७९.४४ करोड आहे. आणि २०२३ मध्ये कंपनीचा प्रॉफिट ₹१९०.१२ करोड आहे. 

Gandhar Oil Refinery कंपनीची Strengths

 

  • गंधार ऑईल रिफायनरी ही कंपनी White Oil निर्मात्या कंपन्यांपैकी एक टॉप कंपनी आहे. मार्केटमधील हिस्सेदारीच्या हिशोबाने जगातील टॉप ५ कंपन्यांमध्ये गंधार ऑईल रिफायनरीचा समावेश होतो.
  • मोठ मोठ्या Consumer आणि फार्मा कंपन्यांसोबत या कंपनीने चांगले बिझीनेस रिलेशनशिप बनविले आहेत कारण ती त्यांना ३५० पेक्षा जास्त प्रोडक्ट विकते.
  • गंधार ऑईल रिफायनरीने टोटल ३ manufacturing Facilities उभ्या केल्या आहात त्यापैकी २ वेस्टर्न इंडियामध्ये असून एक UEA मध्ये आहे. यांच्या मदतीने इंडिया तसेच बाहेर देशातील Clients ना प्रोडक्ट पुरवत आहे. 

Gandhar Oil Refinery कंपनीची  Weaknesses

  • गंधार ऑईल रिफायनरी कंपनी त्यांचा मेन बिझनेस US डॉलर आणि इतर देशाच्या करन्सीमध्ये करतें. याचा प्रॉब्लेम काय होतो जेव्हा पण बाहेर देशात काय होत आणि त्याचा परिमाण तिथल्या करन्सीवर होतो. यामुळे गंधार ऑईल रिफायनरीच्या बिझीनेस वर सरळ सरळ याचा परीणाम होतो.
  • गंधार ऑईल रिफायनरी त्यांच्या बिझीनेसचा मोठा भाग काही नेमक्या Suppliers पासून घेते. आणि त्यांच्यासोबत या कंपनीचा काही लाँग टर्म कॉन्ट्रॅक्ट नाहीये. त्यांनीं कच्चा माल देण्यास बंद केलं तर गंधार ऑईल रिफायनरीचा बिझीनेस मोठ्या प्रमाणात कमी होवू शकतो. 
  • गंधार ऑईल रिफायनरी कंपनीला चालवण्यासाठी मोठ्या Working Capital ची गरज लागते. बिझनेसमधून कॅश येणे बंद झालं तर बिझीनेस बंद पडू शकतो. 

Gandhar Oil Refinery बद्दल FAQ (Frequently Asked Questions) 

👉 गंधार ऑइल रीफायनरी  IPO चा इश्यू साइज किती शेअर्सचा आहे? 

गंधार ऑइल रीफायनरी IPO इश्यू साइज 2,96,26,732 shares (296.27 करोंड  शेअर्स  approximately) इक्विटि शेअर्स विकण्यासाठी आहे. 

👉 गंधार ऑइल रीफायनरी  IPO टोटल किती रककमेचा आहे? 

गंधार ऑइल रीफायनरी  IPO टोटल Rs.500  करोंड एवढा आहे. 

👉गंधार ऑइल रीफायनरी IPO कोणत्या तारखेला चालू आणि बंद होणार आहे? 

गंधार ऑइल रीफायनरी  हा IPO दिनांक 22 नोवेंबर 2023 ला चालू होणार आणि 24 नोवेंबर 2023 ला बंद होणार आहे. 

👉 गंधार ऑइल रीफायनरी  IPO ची किंमत काय असणार आहे? 

गंधार ऑइल रीफायनरी च्या एक शेअरची किंमत Rs.160 – 169 पर्यन्त असणार आहे. 

👉 गंधार ऑइल रीफायनरी  IPO मध्ये तुम्ही एका लॉटमध्ये  किती शेअर घेऊ शकता? 

गंधार ऑइल रीफायनरी  च्या IPO मध्ये तुम्हाला एका लॉटमध्ये टोटल 88 शेअर विकत घेता येतील. 

👉 गंधार ऑइल रीफायनरी  IPO कोणत्या एक्स्चेंजवर लिस्ट होणार आहे? 

गंधार ऑइल रीफायनरी  ही कंपनी भारताचे दोन्ही मोठे स्टॉक एक्स्चेंज म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज तसेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणार आहे. 

👉 गंधार ऑइल रीफायनरी  IPO चा रजिस्ट्रार कोण आहे? 

गंधार ऑइल रीफायनरी  या IPO साठी Link Intime India Pvt Ltd ही कंपनी रजिस्ट्रार आहे. 

👉 IPO म्हणजे काय ? 

IPO म्हणजे Initial Public Offering. याचा अर्थ असा की जेव्हा पण एखादी कंपनी तिचे शेअर्स  स्टॉक मार्केटमध्ये विकायला काढते. 

👉 Primary Market म्हणजे काय? 

स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्कटचे मुख्य दोन प्रकार असतात

एक म्हणजे Primary Market जिथे एखादी कंपनी अगदी नव्याने तिचे शेअर मार्केटमध्ये विकायला काढते जस की IPO

दुसर म्हणजे Secondary Market जिथे एखादी कंपनी तिचे जुने शेअर विकते तरी किंवा खरेदी करते. 

👉 FPO म्हणजे काय? 

FPO म्हणजे Further Public Offering याचा अर्थ असा की जेव्हा एखादी कंपनी दुसऱ्या वेळी की एक पेक्षा जास्त टाइम तिचे शेअर स्टॉक मार्केटमध्ये विकायला आणत आहे. 

इतर महत्वाच्या पोस्ट

अधिक माहितीसाठी विडियो सोर्स 

 

2 thoughts on “Gandhar Oil Refinery IPO: – Date, Price आणि इतर माहिती”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi