इटीएफ काय आहे? त्याचे प्रकार, फायदे आणि रिस्क जाणून घ्या | ETF or Exchange Traded Fund in Marathi

4.3/5 - (6 votes)

तुम्ही गुंतवणुकीच्या विविध प्रकारांबद्दल ऐकले असेल तसेच गुंतवणूक करण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करत असाल. गुंतवणुकीच्या या जगात एक लोकप्रिय आणि आकर्षक पर्याय म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETF). पण इटीएफ म्हणजे काय? ते कसे काम करतात आणि आपण त्यामध्ये कसे गुंतवणूक करू शकतो? हे सर्व समजून घेण्यासाठी ही ब्लॉग पोस्ट तुम्हाला हेल्प करेल.

ETF किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड याचा अगदी सोप्या भाषेत अर्थ समजायचा झाला तर खाली दिलेल्या तीन शब्दांकडे नीट लक्ष द्या:

  1. Exchange – एक्सचेंजचा अर्थ असा होतो की एखादी अशी गोष्ट जी स्टॉक एक्सचेंज जसे की बीएसई आणि एनएसईवर उपलब्ध असते.
  2. Traded – ट्रेडेडचा अर्थ असा होतो की एखादी गोष्ट जी ट्रेड करता येते म्हणजे खरेदी-विक्री करता येते.
  3. Fund – फंडचा अर्थ असा होतो की अनेक शेअर्सना एकत्र करून बनविलेला एक फंड किंवा ऍसेट
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 @marathifinance

ETF म्हणजे काय?

इटीएफ म्हणजे एक प्रकारचा फंड किंवा शेअर असतो जो अनेक शेअर्सना एकत्र करून किंवा इतर ऍसेट्सना एकत्र करून बनविला जातो. इतर म्युच्युअल फंडपेक्षा इटीएफमध्ये फरक हाच आहे की या फंडची किंवा शेअरची खरेदी-विक्री मार्केट टाइमिंगमध्ये करता येते.

ETFs कशाप्रकारे काम करतात?

एखादी म्युच्युअल फंड कंपनी विविध कंपन्यांचे शेअर्स विकत घेते आणि त्याची एक ETF बनविते. आता ही ETF तुम्ही एखाद्या शेअरप्रमाणे ट्रॅक करू शकता. जसा तुम्ही एखादा शेअर घेतात त्याच प्रमाणे याची खरेदी-विक्री करू शकता. पण इटीएफ ही फक्त शेअर्सची नसते तर इतर ऍसेट्स जसे की बॉन्ड्स, गोल्ड, सिल्व्हर इ.ची पण असू शकते. इटीएफचे काही मुख्य प्रकार पुढीलप्रमाणे:

इटीएफचे प्रकार | Types of ETFs

  1. Index ETFs: नावावरूनच समजल असेल की ही अशी इटीएफ असते जी एका ठराविक इंडेक्सला कॉपी करते जसे की सेंसेक्स किंवा निफ्टी 50. उदाहरण द्यायचं झालं तर SBI ETF Nifty 50 जी निफ्टी या इंडेक्सला कॉपी करते.
  2. Gold ETF: ही अशी इटीएफ आहे जिथे गोल्ड या ऍसेटच्या किमतीला ट्रॅक करते. उदाहरण द्यायचं झालं तर Nippon India ETF Gold BeES.
  3. Sector ETFs: या अशा इटीएफ असतात ज्या एका ठराविक सेक्टरमधील कंपन्यांना ट्रॅक करतात जसे की फार्मा, बँकिंग, आयटी इ. उदाहरण द्यायचं झालं तर Nippon India Nifty Pharma ETF ही अशी इटीएफ जी फार्मा सेक्टरमधील कंपन्यांमध्ये पैसे इन्वेस्ट करते.

इटीएफचे फायदे | Benefits of Investing in ETFs

  • इटीएफना तुम्ही अगदी एखाद्या स्टॉकप्रमाणे मार्केट चालू असताना खरेदी करू शकता आणि हवं तेव्हा विकू शकता.
  • जसा एखादा स्टॉक असतो त्याचप्रमाणे इटीएफ ट्रेड होतात त्यामुळे त्यांची रिपोर्टिंग मार्केट संपल की होते (Low value, High value सगळं स्पष्ट असतं).
  • इंडेक्स फंड किंवा इतर म्युच्युअल फंडपेक्षा इटीएफ खूप स्वस्त असतात.
ही पोस्ट वाचा 👉 म्यूचुअल फंड काय आहे? फायदे आणि तोटे?

इटीएफमधील रिस्क | Risks of ETFs

  • Trading Cost: जस आपण सुरुवातीपासून चर्चा केली की इटीएफ एखाद्या स्टॉकसारख्या असतात त्यामुळे त्यांच्यावर charges पण त्याच प्रमाणे लावले जातात. जेव्हा तुम्ही एखादा स्टॉक खरेदी करता किंवा विकता तेव्हा एक ब्रोकरेज किंवा ट्रॅन्सॅक्शन चार्जेस द्यावे लागतात तसेच चार्जेस इटीएफ विकत घेताना द्यावे लागतात.
  • Low Liquidity: Liquidity म्हणजे अचानक पैसे लागले तर एखाद्या ऍसेट विकून पैसे लगेच हातात आले पाहिजेत. पण इटीएफच्या बाबतीत भारतीय शेअर मार्केटमध्ये हा खूप मोठा इश्यू आहे. कारण अशा खूप साऱ्या इटीएफ आहेत ज्यामध्ये खूप कमी लोक इन्वेस्ट करतात.

उदाहरण द्यायचं झालं तर Navi Nifty 50 ETF घेऊ. या इटीएफची टोटल AUM (Asset Under Management) फक्त 6.63 करोड एवढी आहे. जर अशा इटीएफमध्ये पैसे इन्वेस्ट केलेत तर ते खूप रिस्की काम होतं कारण जेव्हा विकायला जाणार तेव्हा समोर खरेदी करायला व्यक्ती हवी. त्यामुळे इटीएफ निवडताना एक सिम्पल रूल इथे फॉलो करायचा तो म्हणजे जी इटीएफची AUM 5000 करोडच्या वर असेल आणि त्यामध्ये सतत खरेदी विक्री होत असेल अशी इटीएफ घ्यावी.

इटीएफमध्ये इन्वेस्ट कस कराल? | How to Invest in ETF?

खूप सोपं आहे. तुम्ही इन्व्हेस्टिंगसाठी जो पण App वापरत आहात (Zerodha, Groww, Angel One किंवा इतर) त्यामध्ये तुम्हाला हवी ती इटीएफ सर्च करा आणि एखादा स्टॉक विकत घेता तस विकत घ्या. पण जस तुम्ही एखादा स्टॉक विकत घेता आणि त्यासाठी एक ठराविक टाइमिंग आहे (9.15 – 3) अगदी इटीएफसाठी पण हेच टाइमिंग लागू होत. त्यामुळे जेव्हा मार्केट चालू असेल तेव्हाच तुम्ही इटीएफ विकत घेऊ शकता.

निष्कर्ष | Conclusion

इटीएफ हे एक उत्कृष्ट इन्व्हेस्टमेंट साधन आहे जे विविध शेअर्स आणि इतर ऍसेट्समध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट करण्याची संधी देते. हे म्युच्युअल फंडपेक्षा अधिक लवचिक आहे कारण तुम्ही त्याची खरेदी-विक्री मार्केटच्या टाइमिंगनुसार करू शकता. पण, इटीएफ इन्व्हेस्ट करण्याआधी त्यातील लिक्विडिटी आणि ट्रेडिंग कॉस्ट सारख्या रिस्कची काळजीपूर्वक तपासणी करणे गरजेचे आहे. योग्य माहिती आणि रणनीतीने, इटीएफमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यास तुम्हाला चांगला रिटर्न नक्कीच मिळू शकतो.

ही पोस्ट वाचा   👉 Navi Mutual Fund ची रिसर्च: तरुणांच्या म्यूचुअल फंड इन्वेस्टिंगमधील चुकांचा पर्दाफाश

इटीएफबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

इटीएफ म्हणजे काय?

इटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड, जो अनेक शेअर्स किंवा इतर ऍसेट्स एकत्र करून बनविला जातो. हा फंड स्टॉक एक्सचेंजवर खरेदी-विक्री करता येतो.

इटीएफ आणि म्युच्युअल फंडमध्ये काय फरक आहे?

म्युच्युअल फंड आणि इटीएफमध्ये मुख्य फरक म्हणजे इटीएफची खरेदी-विक्री मार्केट टाइमिंगमध्ये करता येते, तर म्युच्युअल फंडाची खरेदी-विक्री फक्त ट्रेडिंग तासांनंतर करता येते.

इटीएफ कोणत्या प्रकारच्या ऍसेट्समध्ये इन्वेस्ट करते?

इटीएफ विविध प्रकारच्या ऍसेट्समध्ये इन्वेस्ट करू शकते जसे की शेअर्स, बॉन्ड्स, गोल्ड, सिल्व्हर इ.

4. इटीएफच्या काही मुख्य प्रकार कोणते आहेत?

इंडेक्स इटीएफ: ज्या एका ठराविक इंडेक्सला कॉपी करतात जसे की सेंसेक्स किंवा निफ्टी 50.-

गोल्ड इटीएफ: ज्या गोल्डच्या किमतीला ट्रॅक करतात.

सेक्टर इटीएफ: ज्या एका ठराविक सेक्टरमधील कंपन्यांना ट्रॅक करतात जसे की फार्मा, बँकिंग, आयटी इ.

इटीएफमध्ये इन्वेस्ट करण्याचे फायदे काय आहेत?

  • इटीएफना स्टॉकप्रमाणे खरेदी-विक्री करता येते.
  • इटीएफची रिपोर्टिंग मार्केट संपल की होते.
  • इटीएफ इंडेक्स फंड किंवा इतर म्युच्युअल फंडपेक्षा स्वस्त असतात.

इटीएफमध्ये कोणते धोके असतात?

ट्रेडिंग कॉस्ट: स्टॉकप्रमाणे इटीएफवर देखील ब्रोकरेज किंवा ट्रॅन्सॅक्शन चार्जेस लागतात.

लो लिक्विडिटी: कमी लोक इन्वेस्ट करत असल्याने काही इटीएफमध्ये पैसे लगेच मिळणे कठीण असू शकते.

इटीएफमध्ये कसे इन्वेस्ट करायचे?

तुम्ही वापरत असलेल्या इन्व्हेस्टिंग App मध्ये (जसे की Zerodha, Groww, Angel One) हवी ती इटीएफ सर्च करून एखादा स्टॉक विकत घेता तशी विकत घ्या.

इटीएफची खरेदी-विक्री कधी करता येते?

इटीएफची खरेदी-विक्री मार्केट चालू असताना (ट्रेडिंग अवर्समध्ये) करता येते.

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi