Goal Based Mutual Fund Investing in Marathi: कोणताही Mutual Fund निवडताना सगळ्यात मोठी चूक तुम्ही नाही केली पाहिजे जी लोक नेहमीच करतात ती म्हणजे “मी हा म्यूचुअल फंड का निवडत आहे आणि किती टाइमसाठी निवडत आहे?” हे स्पष्ट न करणे.
आधी Goal ठरवा मग म्यूचुअल फंड निवडा.
कस तेच आपण समजून घेऊ.
Step 1: तुमचे Financial Goals काय आहेत? हे ठरवा.
प्रत्येकाचे काही ना कही गोल्स असतात तसे तुमचे पण असणार. सगळ्यात आधी ते गोल्स काय आहेत हे स्पष्ट करा.
काही गोल्स जस की रिटायरमेंट प्लॅनिंग, मुलांच शिक्षण (आता मूल नसतील तर होतील), फॉरेन ट्रीप, लग्नाची तयारी इ. हे अगदी कॉमन आहेत. या व्यतिरिक्त तुमचे काही गोल्स असतील तर बघा.
Step 2: आता या गोल्ससाठी किती खर्च लागेल?
तुम्ही रिटायरमेंटसाठी पैसे जमा करत आहात तर सगळ्यात आधी किती पैसे लागतील हे बघा. आता ते कस बघायच? यासाठी ही पोस्ट वाचा.
याच प्रमाणे बाकीचे गोल्स आहेत त्यांच्यासाठी किती खर्च लागेल हे ठरवा.
ऑनलाइन रिटायरमेंट कॅल्कुलेटर, एड्युकेशन कॅल्कुलेटर मिळतात त्यांची हेल्प घ्या.
Step 3: कोणत्या Goal साठी किती रिस्क घ्यायची?
रिटायरमेंट हे गोल लगेच पुर करायच आहे का? नाही. तर एथे तुम्ही थोडी रिस्क घेऊ शकता.
लग्नाची तयारी? इथे जास्त रिस्क घेऊन चालणार नाही. कारण लग्न ठराविक वय झाल की कराव लागेल आणि तेव्हा पैशाची गरज लागेल.
फॉरेन ट्रीप किंवा कुठे बाहेर फिरायला जायचं आहे? इथे तुम्ही रिस्क घेऊ शकता कारण समजा या वर्षी जायच होत पण पैसे जमा नाही झाले किंवा नेमक तेव्हा शेअर मार्केट डाऊन झाल तर तुम्ही पुढच्या वर्षी जावू शकता.
Step 4: कोणता Mutual Fund निवडायचा?
रिटायरमेंट साठी तुम्ही आता एक Risky फंड जस की Small Cap Fund किंवा Flexi Cap Fund घेऊ शकता. जशी रिटायरमेंट जवळ येईल तस त्यातले पैसे कमी रिस्क असलेल्या फंड, जस की इंडेक्स फंड किंवा इतर Asset मध्ये इन्वेस्ट करू शकता.
लग्नाची तयारी समजा हे Goal असेल तर ते कधी आहे ते बघा. कारण 3-5 वर्षात असेल तर सगळे पैसे शेअर मार्केटमध्ये लावू नका. कारण त्याच वेळी नेमक शेअर मार्केटला काही झाल तर तुमची नवरी शेअर मार्केट रीकवर होई पर्यन्त थांबणार नाही (किंवा नवरा). त्यामुळे विचार करून रिस्क घ्या.
फॉरेन ट्रीप किंवा कुठे बाहेर फिरायला जायचं आहे? समजा हे गोल असेल तर कधी जायच आहे ते बघा. पुढच्या काही वर्षात जायच असेल पण हे अस गोल आहे जिथे तुम्ही रिस्क घेऊ शकता. त्यासाठी एखादा Small cap fund निवडू शकता. (पण सेक्टर फंडपासून दूर रहा)
Step 5: Mutual Fund निवडा
आता तुम्हाला समजल असेल की आधी Goal ठरवून मग त्यानुसार म्यूचुअल फंड कसा निवडायचा. मी काही Goals ची उदाहरणे दिली आहेत. पण तुमचे Goals तुम्हाला चांगले माहीत असतील.
जेव्हा तुम्ही Goal ठरवून एखादा Mutual Fund निवडाल तेव्हा “अरे हा फंड चांगला आहे ना?, लॉन्ग टर्मसाठी घेऊ ना?, लॉस तर होणार नाही ना?” असे प्रश्न मनात येणार नाही.
स्टॉक असो की म्यूचुअल फंड, सतत बेस्ट रिटर्न मिळणार नाही. कधी शेअर मार्केट पडत तर कधी वर जात त्यानुसार रिटर्न मिळतो. हे जितक्या लवकर समजून घ्याल तितक तुमच्यासाठी चांगल आहे.
महत्वाची टीप: कोणताही Mutual Fund निवडताना त्या कॅटेगरीला आधी समजून घ्या. मी पाहतो खूप जण सेक्टर फंडमध्ये इन्वेस्ट करत आहेत. आणि विचारल तर त्यांना माहीत नसत की सेक्टर फंड काय असतात. फक्त रिटर्न बघून फंड निवडू नका. ब्लॉगवर विविध कॅटेगरीमधील फंड्ससाठी पोस्ट दिल्या आहेत त्या नक्की वाचा. (खाली लिंक दिल्या आहेत)
1 thought on “आधी ध्येय ठरवा मग म्यूचुअल फंड निवडा | Goal Based Mutual Fund Investing in Marathi”