2024 साठी बेस्ट इंडेक्स फंड | UTI Nifty 50 Index Fund

Rate this post

UTI Nifty 50 Index Fund: 2024 चालू झाल आहे आणि तुम्ही SIP करायचा प्लान केला असेल.

जर तुम्ही एखादा चांगला इंडेक्स फंड बघत असाल तर तुम्ही UTI Nifty 50 Index Fund  सोबत जावू शकता.

आता याच कारण काय? तेच आपण या पोस्टमध्ये समजून घेऊ.

Index Fund काय आहे? 

असा फंड जो ठराविक इंडेक्सला कॉपी करतो जस की UTI Nifty 50 Index Fund जो Nifty 50 या इंडेक्सला कॉपी करतो.

जितका रिटर्न निफ्टि 50 इंडेक्स देणार ठेवढा रिटर्न या फंडला आणून द्यायचा असतो.

सिम्पल लॉजिक!

UTI Nifty 50 Index Fund चा रिटर्न 

UTI Nifty 50 Index Fund ने (जेव्हा मी ही पोस्ट लिहितोय 5 जानेवारी 2024) मागील 1 वर्षात 21.05%, मागील 3 वर्षात 16.39%, मागील 5 वर्षात 16.13% तसेच मागील 10 वर्षात 13.33% चा रिटर्न दिला आहे.

2013 ते 2023 याच दरम्यान Nifty 50 इंडेक्सने 13.20% चा रिटर्न दिला आहे. त्यामुळे हा फंड एक Consistent रिटर्न देणारा फंड आहे.

हा फंड कोणी निवडावा? 

  1. जर तुम्ही नवीन इन्वेस्टर असाल :- काही जण या वर्षी त्यांच्या investing च्या प्रवासाला सुरुवात करत आहेत. त्यांना आयडिया नसते की नक्की कुठचा फंड निवडायचा. त्यांनी एक छोट्या रककमेपासून या फंडमध्ये सुरुवात करू शकता. याचा फायदा असा होतो की तुम्हाला शेअर मार्केटची सवय होईल की कसे उतार चढाव येत राहतात. आणि मग तुम्ही दूसरा फंड घेऊ शकता.  
  2. जे लोक नुकतच जॉबला लागलेत:- मी खूप वेळा पाहिल आहे की जॉब लागला की अनेक जण बेस्ट फंड कोणता हे शोधत बसतात आणि SIP चालू करतच नाही. परिणाम काय होतो तर काही महीने असेच वाया जातात. 
  3. तुम्ही बाकीच्या कॅटेगरीविषयी समजून घेई पर्यन्त सुरुवात इंडेक्स फंडने करा. मग हव तर फलेक्सि कॅप फंड किंवा Small Cap Fund चालू करा. 

फंडबद्दल इतर माहिती 

  • या फंडचा Expense Ratio 0.21% आहे जो खूप कमी आहे. (Expense Ratio म्हणजे या फंडला मॅनेज करण्यासाठी दयावी लागलेली फी) 
  • या फंडमध्ये कसलाच Exit Load नाहीये. याचा अर्थ असा की जर अचानक पैसे काढायला लागले तरी कसले charges लावले जाणार नाही. 
  • या फंड मध्ये कमीत कमी 500 रुपयांपासून SIP चालू करू शकता. 
  • या फंडची NAV 148.38 आहे. (5 जानेवारी 2024) NAV म्हणजे या फंडचा एक यूनिटसाठी द्यावी लागणारी किमत. 

 Nifty 50 मधील इतर Funds

काहीना या फंडमध्ये SIP करायची नसेल किंवा दुसरे फंड हवे असतील तर तुम्ही खाली दिलेले Funds चेक करू शकता. (फक्त रिटर्न बघून निवडू नका, Expense ratio आणि Exit load या गोष्टी आधी चेक करा.)

  • Bandhan Nifty 50 Index Fund Direct Plan-Growth

  • CICI Prudential Nifty 50 Index Direct Plan-Growth

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Index Fund काय आहे? (Detail Information in Marathi) 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

Disclaimer: वरील पोस्ट ही फक्त महितीसाठी दिली आहे आर्थिक सल्ला नाही.  तुम्ही तुमची रिस्क क्षमता समजा आणि त्यानुसार लॉन्ग टर्मसाठी फंड निवडा. आणि तुम्ही नीट समजून कॉन्फिडंसने इन्वेस्ट केलेत ना मग मार्केट चांगले रिटर्न देणार एवढ नक्की!

1 thought on “2024 साठी बेस्ट इंडेक्स फंड | UTI Nifty 50 Index Fund”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi