2024 मध्ये तुमच्या आवडीमधून पैसे कसे कमवाल? | How to Make Money in Marathi

Rate this post

How to Make Money in Marathi: मला एका फॉलोवरने DM केला की “असे कोणते स्किल्स शिकले पाहिजेत ज्याने इन्कम वाढवता येईल?”

आता एक्स्ट्रा इन्कम झालेली कोणाला आवडणार नाही. हो की नाही? आणि म्हणून या पोस्टमध्ये आपण एक्स्ट्रा इन्कम कमविण्यासाठी लागणाऱ्या काही प्रॅक्टिकल टिप्स आणि स्किल्स यावर चर्चा करणार आहोत. चला तर सुरुवात करूया.

How to Make Money in Marathi 2

इन्कम बनविण्याठी तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता? 

पहिली कॅटेगरी अशी येईल की ज्यांच्याकडे काही स्किल आहेत पण त्यांना माहीत नाहीये आणि दुसरी कॅटेगरी म्हणजे ज्याच्याकडे काहीच स्किल नाहीयेत पण शिकायची तयारी आहे. (आणि तुम्ही जर तिसऱ्या कॅटेगरीमध्ये असाल जिथे स्किल पण नाहीत आणि शिकायची पण तयारी नाहीये तर ही पोस्ट वाचण्यात काही फायदा नाही)

आता आपण पहिल्या दोन्ही कॅटेगरीसना नीट समजून घेऊ.

कॅटेगरी 1: माझ्याकडे काही स्किल्स आहेत असे लोक 

सगळ्यात आधी तुम्ही स्वताला विचारा की माझ्याकडे आता कोणते स्किल्स आहेत. एक पेन आणि पेपर घ्या किंवा फोनमध्ये Notes App असेल त्यावर एक लिस्ट बनवा जे स्किल्स तुम्हाला येत आहेत. छोटे मोठे स्किल चालतील फक्त लिहा. जर मी माझ उदाहरण दिल तर काही स्किल खालीलप्रमाणे

ग्राफिक डिझाईन – जे मी 2021 लॉक डाऊनमध्ये शिकलो Canva Pro App वर

कंटेंट रायटींग – मी 3 जून 2021 पासून @marathifinance हे पेज चालवत आहे, छोट्या छोट्या पोस्ट बनवून आता मला कंटेंट रायटींग यायला लागली. (सगळा प्रॅक्टिसचा खेळ)

विडियो एडिटिंग – मला बेसिक Animated Videos बनवता येतात (त्यावर सध्या फोकस नाहीये माझ)

अशाप्रकारे तुम्ही काय करू शकता याचा विचार करा. त्यानंतर पुढची स्टेप अशी की यामधील एक स्किल निवडा ज्यावर तुम्ही 2024 मध्ये फोकस कराल आणि त्याला Monetize करायचा प्रयत्न कराल. Monetize करायच म्हणजे त्यामधून पैसे कसे कमविता येतील याचा विचार करणे.

मी माझ उदाहरण देऊ तर, मी 2024 मध्ये रायटींगवर जास्त फोकस करत आहे कारण एक बँकचा जॉब करता करता मला हे शक्य आहे. त्यानंतरची सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे  तुम्हाला ही एक्स्ट्रा इन्कम बनविण्यासाठी जो वेळ द्यावा लागेल तो शक्य होणार आहे का? ते ठरवा.

तुम्ही काही जण जॉब करत असाल तर काही जण अजून स्टडी करत असतील पण हे सगळ करताना तुम्ही या एक्स्ट्रा इन्कमसाठी मेहनत घ्यायला तयार राहील पाहिजे.

कॅटेगरी 2: माझ्याकडे काही स्किल्स नाहीयेत असे लोक 

आपण सगळे जण कधी ना कधी या कॅटेगरीमधून गेलो आहोत.

आता तुम्हाला अस वाटत असेल की माझ्याकडे काही स्किल्स नाहीयेत. तर सगळ्यात आधी तुम्हाला काय आवडत हे बघा. अस होणारच नाही की तुम्हाला काहीच आवडत नाही. मी उदाहरण देऊन समजवतो.

तुम्हाला फिटनेसच वेड आहे तर हे तुमच्यासाठी एक स्किल बनू शकत.

तुम्हाला फोटोग्राहीची आवड आहे तर ते तुमच्यासाठी एक स्किल बनू शकत.

तुम्हाला विडियो एडिटिंग आवडत असेल तर हे तुमच एक स्किल बनू शकत.

आता तुम्हाला काय आवडत आणि काय नाही हे तुम्हाला सोधायच आहे. पण हे करताना एका गोष्टीकडे जास्त फोकस करायच आहे ती म्हणजे तुमची आवड आणि तुम्हाला हवी असलेली एक्स्ट्रा इन्कम यामध्ये एक नात हवंय ते म्हणजे Potential मार्केट किंवा डिमांड.

तुमची आवड + लोकांचे प्रॉब्लेम = इन्कम 

हा सिम्पल फॉर्म्युला आहे. तुमची जी काही आवड असेल त्याने लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व झाले पाहिजेत किंवा लोकांना वॅल्यू मिळाली पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी जेव्हा माझ Instagram पेज चालू केल आणि त्या माध्यमातून महितीशीर पोस्ट तुमच्यापर्यंत पोचवत गेलो ज्यातून तुम्हाला एक वॅल्यू मिळाली.

आता तुम्ही बोलाल की मग तुला एक्स्ट्रा इन्कम झाली का? होय झाली. Insta पेजवर काही Pramotion करण्यासाठी मी 2000 ते 4000 रुपये चार्ज केले आहेत. (पण मी कधी कोणत टेलिग्राम चॅनल प्रोमोट केल नाही आणि करणार पण नाही. आता सुद्धा दररोज ऑफर येत असतात पण मला ते पटत नाही म्हणून मी करत नाही)

How to Make Money in Marathi

(हे एक उदाहरण झाल. अशा प्रकारचे काही नेमके Pramotions मी करतो जर एखादी कंपनी चांगली असेल किंवा प्रॉडक्ट चांगल असेल)

याचा अर्थ असा नाही की संगळ्यांनी Insta पेजेस चालू करा. जरी केलेत तरी चांगलच आहे कारण नक्कीच तुम्ही त्यातून काही ना काही शिकणार. Insta पेज असो की YouTube चॅनल किंवा एखादा ब्लॉग. सगळ्यात महत्वाच आहे त्याला कस Monetize करता येईल तरच तुम्ही त्यातून इन्कम कमवू शकता.

इंटरनेटवर संधी शोधू नका, संधी बनवा. 

सोशल मीडियावर नवीन गोष्टी क्रिएट करण्यासाठी कोणाची Permission घ्यावी लागत नाही. इंटरनेटवर एक्स्ट्रा इन्कमची संधी सोधत बसण्यापेक्षा स्वताच्या आवडीने एखादी संधी बनवा. Insta फ्री आहे. यूट्यूब फ्री आहे आणि असे बरेच प्लॅटफॉर्म. पण कमी आहे ती फक्त आवड (आवड काहीतरी नवीन शिकण्याची आणि करण्याची)

काही स्किल्स डोक्यात येत नसतील तर खाली दिलेल्या स्किल्सपैकी तुम्ही काय करू शकता हे बघा. आणि हो इतर एखाद स्किल असेल,  तर तुम्ही त्यावर सुद्धा काम करू शकता. पण त्यासाठी मार्केट उपलब्ध आहे का, मार्केटमध्ये डिमांड आहे का किंवा त्यातून लोकांना वॅल्यू मिळत आहे की नाही ते आधी बघा.

1. Freelance Writing
2. Graphic Design
3. Web Development
4. Social Media Management
5. Digital Marketing
6. Photography
7. Video Editing
8. Affiliate Marketing
9. Fitness Training
10. Blogging

एक्स्ट्रा इन्कम बनवताना एक महत्वाची टीप 

सगळ्यात आधी फोकस तुम्ही 100 रुपये कसे बनवता येतील त्यावर करा. मला माहीत आहे 100 रुपये खूप कमी वाटतात पण एकदा का तुम्ही 100 कमविले की तुमचा कॉन्फिडंस अगदी रॉकेटसारखा बूस्ट होईल. मग त्या 100 चे 500 रुपये कसे करायचे हे तुम्हाला आपोआप समजेल. मग 500 रुपये ते 50,000 रुपयांचा मार्ग तुम्ही स्वता बनवाल.

Keep Learning & Keep Earning!

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 आयपीओची प्राइज आणि इतर माहिती | Medi Assist Healthcare IPO Price

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi