Long-Term Investing म्हणजे नक्की किती?

Rate this post

आपण सगळेजण हे नेहमीच एकत असतो की शेअर मार्केटमध्ये पैसे इनवेस्ट करत आहात तर ते लॉन्ग टर्मसाठी करा. पण हे लॉन्ग टर्म (Long Term) म्हणजे नक्की किती?

काय 5 वर्ष म्हणजे Long Term  आहे? की 10 वर्ष की 15? नक्की किती? आणि हेच आपण आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये शिकणार आहोत की Long-Term Investing  म्हणजे नक्की किती? आणि हे करण्यासाठी आपण शेअर मार्केटच्या मागील 24 वर्षाच्या डेटाचा आधार घेणार आहोत. चला तर सुरुवात करुयात!

जगप्रसिद्ध इनवेस्टर वॉरेन बफेट सांगतात की, मी माझी पहिली गुंतवणूक वयाच्या ११ व्या वर्षी केली आणि त्याआधी मी माझं आयुष्य Waste करत होतो. आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्की आला असेल. काय मी गुंतवणूक करण्यासाठी खूप उशीर केला आहे का? खर तर अजिबात नाही.

वॉरेन बफेट हेही सांगतात की, सगळयात मोठी गुंतवणूक म्हणजे स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक होय. जेवढं जास्त शिकाल तेवढं जास्त कमवाल. कोणतीही गुंतवणूक करण्याअशी थोडा वेळ त्याबद्दल शिकण्यासाठी स्वतःला द्या. स्वतःच्या नॉलेजमध्ये गुंतवणूक करा. वॉरेन बफेट यांनी ११ व्या वर्षी गुंतवणुकीला सुरुवात केली कारण त्यांना अगदी लहान वयातच शेअर मार्केटच चांगल नॉलेज होत. तुमच्याकडे तेवढं नॉलेज आहे का? किंवा ते घेण्यासाठी तुम्ही पुरेसा वेळ देत आहात का? असे प्रश्न तुम्ही स्वतःला नक्की विचारले पाहीजेत.

मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. प्रत्येकजण स्वतःच्या टायमिंगमध्ये अगदी योग्य असतो. कोणी वयाच्या ११ व्या सुरुवात करतो तर कोणी ३० किंवा ५०. सगळयात महत्वाचं म्हणजे सुरुवात करणे.

तुमची Long Term ची व्याख्या काय?

पूढील 20 वर्षात शेअर मार्केटमधून किती रिटर्न मिळणार हे शोधायला जाणे यात काही शहाणपण नाहीये. कारण त्याचा अंदाज लावणे खूप कठीण आहे. त्यामुळे तुमची Long Term ची व्याख्या ठरवताना तुम्हाला 2 गोष्टींकडे खास लक्ष द्यायच आहे. नंबर 1: –  तुम्हाला रिटर्न नेगेटिव किंवा झीरो मिळण्याची शक्यता अजिबात नको. नंबर 2: – तुम्हाला नेहमीच पॉजिटिव रिटर्न मिळेल याची 80% शक्यता असली पाहिजे. या दोन पॉईंट्सना लक्षात ठेवून तुम्हाला तुमच्या इन वेस्टिंगचे वर्षे ठरवायची आहेत जेणेकरून शेअर मार्केटमधून तुम्ही नेहमीच प्रॉफिट कमवू शकता.

मागील 24 वर्षाचा डेटा काय सांगतो?

जेव्हा आपण शेअर मार्कटच्या मागील 24 वर्षाच्या डेटाचा स्टडी करतो त्याला नीट समजून घेतो तेव्हा अस समजून येत की Long-Term Investing साठी तुम्ही कमीत कमी 7 वर्षे दिली पाहिजेत.

पॉवर ऑफ 7 वर्षे :- 

जे इन्वेस्टर शेअर मार्केटमध्ये कमीत कमी 7 वर्षे राहिले आहेत त्यांना जराही लॉस झाला नाही. खर तर त्यांना 10% पेक्षा जास्त रिटर्न मिळण्याची शक्यता 82% होती. यावरून आपल्याला हे समजत की 7 वर्षे एक योग्य पॉइंट आहे. इतके वर्ष तर तुम्ही शेअर मार्केटला दिली पाहिजे.

बेस्ट ठरतील 15 वर्षे :-

जर तुमच गोल Long-Term Investing करणे आहे तर तुम्ही 15 वर्षे तुमचे पैसे शेअर मार्केटमध्ये इनवेस्ट करण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही 15 वर्षे का? तुम्हाला हे एकून खूप बार वाटेल की जवळजवळ 95% वेळा Nifty 50 या इंडेक्सने 10% पेक्षा जास्तचा रिटर्न दिला आहे. अजून एक गोष्ट म्हणजे जे इन्वेस्टर शेअर मार्केटमध्ये 20 पेक्षा जास्त वर्षांसाठी राहतात त्यांना 10% पेक्षा जास्त रिटर्न हा नक्कीच मिळतो. त्यामुळे Long Term साठी पैसे इनवेस्ट करणे किती इम्पॉर्टंट आहे तेही अगदी कमी रिस्क घेऊन हे आपल्याला समजते.

शॉर्ट टर्म Investing का नको? 

कधी विचार केलात का? जर तुमच्या शेअर मार्केटमधील investing चा टाइम 7 वर्षांपेक्षा कमी असेल. अशा वेळी लॉस होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. आपण जर मागील डेटा पाहिला तर हे दिसून येत की 55% एवढी घसरण Nifty 50 मध्ये बघायला मिळाली होती. आणि जर आपण 3 वर्षाचा डेटा पाहिला तर जवळजवळ 15% घसरण बघायला मिळते. त्यामुळे 7 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष ही एक योग्य टाइम आहे शेअर मार्केटमध्ये पैसे इनवेस्ट करण्यासाठी आणि अस करून तुम्ही बँक FD किंवा महागाई या पेक्षा जास्त रिटर्न नक्कीच मिळवू शकता.

शेअर मार्केटमधील काही महत्वाचे ट्रेंडस 

ट्रेंड नंबर 1: – पॉवर ऑफ टाइम 

तुम्ही जितका जास्त टाइमसाठी शेअर मार्केटमध्ये पैसे इनवेस्ट करता तितक रिटर्नमधील चढ उतार (volatility) कमी होतात. Nifty 50 ही इंडेक्स एका वर्षामध्ये 108% वाढली आहे पण त्याच टाइममध्ये पुन्हा 55% ने पडली आहे. आणि शेअर मार्केटचा हा स्वभावच आहे सतत वर खाली होत असतो. पण जेव्हा तुम्ही 7 वर्षांच्या टाइम फ्रेममध्ये शेअर मार्केटच्या रिटर्नकडे बघता तेव्हा एकदम Lowest पॉइंट आणि Highest पॉइंट यातला फरक खूप खूप कमी होतो.

ट्रेंड नंबर 2: – टाइम इज मनी 

तुमच्या पोर्टफोलिओच्या 60% एवढी रक्कम जर शेअर मार्केटमध्ये इनवेस्ट करत असाल तर कमीत कमी 7 वर्ष इनवेस्ट करण्यासाठी तयार रहा. पोर्टफोलिओचा 60% म्हणजे थोडक्यात काय तर, समजा तुम्ही महिन्याचे 5000 रुपये इनवेस्ट करता. ( मग म्यूचुअल फंड असो की डायरेक्ट स्टॉक) जर या 5000 रुपयांच्या 60% म्हणजे 3000 रुपये जर तुम्ही फक्त शेअर मार्केटमध्ये इनवेस्ट करत आहात तर 7 वर्ष द्या. अस केल्याने तुमचे लॉस होण्याची शक्यता खूप कमी होते.

ट्रेंड नंबर 3: – Time Allocation 

जर तुम्ही शॉर्ट पीरियड म्हणजे 3-5 वर्षांसाठी शेअर मार्केटमध्ये पैसे इनवेस्ट करण्याचा विचार करत आहात तर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओच्या 20-30% पेक्षा जास्त पसी इनवेस्ट करू नका. कारण पहिल्या 5 वर्षात खूप रिस्क असते आणि अशा वेळी पूर्ण पैसे शेअर मार्केटमध्ये लावणे यात काहीच शहाणपण नाहीये.  

शेअर मार्केटमधील फायदा आणि रिस्क 

Share Market ही एक मोठी आणि गुंतागुंतीची सिस्टम आहे जी तुम्हाला प्रॉफिट पण करुन देऊ शकते आणि लॉस पण. अनेक मध्यमवर्गीय लोकांसाठी Share Market ही हळूहळू श्रीमंत होण्याची संधी असू शकते, पण अगदी झटपट गरीब होण्याचा मार्गही असू शकतो.

फायद्याची शक्यता खूप असते 

Share Market मध्ये लॉन्ग टर्ममध्ये उत्तम प्रॉफिट देण्याची क्षमता आहे. उदाहरणार्थ, Nifty 50 Index ने गेल्या 20 वर्षांत सरासरी 15% वार्षिक दराने वाढला आहे. म्हणजेच २००३ मध्ये Nifty 50 Index मध्ये १ लाख रुपयांची इन्वेस्टमेंट आज १० लाख रुपयांची झाली असती. 

अर्थात भविष्यात Share Market अगदी असाच रिटर्न देईल याची खात्री देता येत नाही. पण एक गोष्ट आपल्या सगळ्यांना चांगलीच माहीत आहे ती म्हणजे लॉन्ग टर्ममध्ये Share Market हा संपत्ती वाढविण्याचा एक चांगला मार्ग असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे.

रिस्कची शक्यता पण त्यासोबत असतेच

Share Market ही भयंकर Risky Investment आहे. शेअर्सच्या किंमती सतत वर-खाली होत असतात आणि पैसे गमावण्याची शक्यता नेहमीच असते. उदाहरणार्थ, २००८ च्या आर्थिक संकटात, Nifty 50 Index जवळजवळ ५० टक्क्यांनी घसरली होती. 

जर तुम्ही Share Market मध्ये इनवेस्ट करण्याचा विचार करत असाल तर त्यातील रिस्क समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही फक्त असे पैसे इनवेस्ट केले पाहिजेत जे गेले तरी तुमच्या डोक्याला कसला ताप होणार नाही.

Share Market मध्ये इनवेस्टमेंट कशी करावी?

Share Market मध्ये इनवेस्टमेंट करण्याचे काही वेगवेगळे मार्ग आहेत. तुम्ही डायरेक्ट Stocks खरेदी करू शकता, Mutual Fund मध्ये गुंतवणूक करू शकता किंवा Exchange Traded Fund मध्ये (ETF) गुंतवणूक करू शकता.

जर तुम्ही नव्यानेच Investing ला सुरुवात करत असाल तर Mutual Fund किंवा ETF पासून सुरुवात करणे चांगले आहे. मी तर नवीन इन्वेस्टरला Index Fund नहेमीच Suggest करतो.  एकदा का तुमच्याकडे पुरेसा अनुभव आला की मग तुम्ही डायरेक्ट Stocks खरेदी करण्याचा विचार करू शकता. पण हे जरा जास्तच Risky आहे त्यामुळे समजतील अशाच बिझनेसमध्ये इनवेस्ट करा. 

Share Market हे एक  शक्तिशाली साधन आहे ज्याचा उपयोग संपत्ती वाढविण्यासाठी केला जाऊ शकतो. पण, पैसे इनवेस्ट करण्यापूर्वी त्यातील रिस्क समजून घेणे महत्वाचे आहे. जर तुम्ही जमेल तेवढी रिस्क घेण्यास तयार असाल तर Share Market तुमचे आर्थिक भवितव्य (Financial Future) घडविण्याचा एक उत्तम मार्ग ठरू शकतो.

In the world of equities, time is indeed a friend and a powerful ally.

 नेहमी लक्षात ठेवा, या शेअर मार्केटच्या दुनियेत तुमच्याकडे असलेला टाइम हा तुमचा सगळ्यात पॉवरफुल फ्रेंड आहे. जसा तुमच्याकडे 24 तास असतात अगदी तसंच माझ्याकडे आणि आपल्या संगळ्यांकडे. त्यामुळे या टाइमचा नीट वापर करा. सुरुवातीला पैसे कमी इनवेस्ट केलेत तरी चालतील पण नेहमी लॉन्ग टर्मसाठी इनवेस्ट करा. 😅

(Source: - ETmoney, BSE & NSE website)
तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi