DOMS Industries IPO Allotment Status: कसा आणि कुठे चेक कराल?

Rate this post

DOMS Industries IPO Allotment Status 

DOMS IPO 13 डिसेंबर रोजी सुरू झाला होता आणि 15 डिसेंबर रोजी बंद झाला. डॉम्स आयपीओची  किंमत बँड ₹750 ते ₹790 प्रति शेअर निश्चित केला होता. डॉम्स  आईपीओची अलॉटमेंट डिसेंबर 18, 2023 ला Finalize करण्यात आली आहे. ज्या लोकांना या IPO Allot झाला असेल 19  त्यांना डिसेंबरला शेअर्स त्यांच्या डिमॅट अकाउंटमध्ये येतील. पण ज्या लोकांनी या IPO साठी Apply केलं होत पण त्यांना शेअर्स Allot नाही होणार त्यांचे पैसे रीफंड केले जातील. रीफंडची प्रोसेस 19 डिसेंबर 2023 ला चालू होईल.

DOMS Industries IPO चे Investors ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी IPO Allotment Status चेक करू शकतात. आणि ते कसं करायचं हेच आपण या पोस्ट समजून घेणार आहोत.

DOMS Industries IPO Subscription Status काय आहे?

DOMS Industries IPO सगळ्या कॅटेगरीमध्ये एकत्रित पाहिलं तर 93.52 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे.

त्यांपैकी QIB (Qualified Institutional Buyers) नी या IPO जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. या कॅटेगरीमध्ये हा IPO 115.97  टाइम्स सबस्क्राईबझाला आहे. QIB कॅटेगरीमध्ये यामध्ये मोठ मोठ्या Mutual Funds कंपन्या, पेन्शन फंड, Insurance कंपन्या, बँका इत्यादिचां समावेश होतो.

NII (Non-Institutional Investors) या कॅटेगरीमध्ये हा IPO 66.51 टाइम्स सबस्क्राईबझाला आह. NII म्हणजे भरतीय नागरिक,NRI (बाहेर देशात राहणारा भारतीय व्यक्ती), HUF – Hindu Undivided Family चा कर्ता, एखादी ट्रस्ट, सोसायटी इ. जे २ लाखापेक्षा जास्त शेअर्ससाठी Apply करतात.

आता राहिले आपल्या सारखे सामान्य माणूस म्हणजेच Retail Investors. या कॅटेगरीमध्ये DOMS Industries IPO 69.67 टाइम्स सबस्क्राईबझाला आहे. त्यासोबत खास एम्प्लॉइजच्या कॅटेगरीमध्ये हा आयपीओ 29.21  टाइम्स सबस्क्राईब झाला आहे.

Linkintime या वेबसाईटवर DOMS Industries IPO चा Status कसा चेक करायचा?

  • लॉग इन करा DOMS Industries IPO Allotment Page वर 👉Link Intime India Pvt Ltd – IPO Allotment Status
  • IPO च नाव सिलेक्ट करा
  • यांपैकी एखादा ऑप्शन सिलेक्ट करा – PAN नंबर, ॲप्लिकेशन नंबर किंवा DP ID ऑप्शन
  •  सर्च ऑप्शन वर क्लिक करा
  • तुम्हाला DOMS Industries IPO ची Allotment Status तुमच्या स्क्रिनवर बघायला मिळेल.

Demat Account मध्ये DOMS Industries IPO चा Status कसा चेक कराल? 

  • तुमच्या ब्रोकर ला कॉल करा जर तुम्ही ऑफलाईन डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट वापरत असाल
  • ऑनलाईन चेक करण्यासाठी डिमॅट अकाउंट/ट्रेडिंग अकाउंटमध्ये लाँग इन करा
  • जर शेअर्स तुम्हाला Allot झाले असतील तर तुमच्या Demat Account मध्ये दिसतील.

(Zerodha, Groww, Angel One किंवा इतर डिमॅट अकाउंट तुम्ही वापरत असाल तरी प्रोसेस तीच असेल) 

Bank Account च्या मदतीने DOMS Industries IPO चा Status कसा चेक कराल? 

  • Bank Account चेक करा ज्यामधून तुम्ही IPO साठी Apply केलं होतं.
  • Bank Account चा बॅलन्स चेक करा.
  • जर तुम्हाला शेअर्स Allot झाले असतील तर पैसै डेबिट झाले असतील
  • जर तुम्हाला शेअर्स Allot झाले नसतील तर जे पैसे ब्लॉक झाले होते ते तुम्हाला परत येतील.

DOMS इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल माहिती

DOMS IPO MARATH

R.R इंडस्ट्रीज नावाची एक पार्टनरशिप फर्म म्हणून 1976 मध्ये स्थापना झाली. DOMS इंडस्ट्रीज लिमिटेड ही एक क्रिएटिव्ह प्रोडक्ट कंपनी म्हणून विकसित झाली आहे. गुजरातमधील वलसाड येथे असलेल्या कंपनीने 2005 मध्ये आपला प्रमुख ब्रँड “DOMS” सादर केला. DOMS हा भारतातील ‘स्टेशनरी आणि आर्ट’ प्रोडक्टच्या मार्केटमध्ये एक प्रमुख खेळाडू आणि ब्रँड आहे, जो विविध प्रकारचे प्रॉडक्ट ऑफर करतो. 

वेबसाइट 👉 DOMS – Stationery Products Manufacturers in India | Art Material Suppliers (domsindia.com)

DOMS IPO चा हेतू काय आहे?

आयपीओतून येणारे पैसे दोन प्राथमिक कारणांसाठी वापरले जातील. पहिलं म्हणजे, DOMS नवीन मॅन्युफॅक्चरिंगची सुविधा  स्थापन करण्यासाठी हा पैसा वापरला जाईल.   या नवीन मॅन्युफॅक्चरिंगच्या मदतीने नवीन लेखन उपकरणे, वॉटर कलर पेन, मार्कर आणि हायलाइटरसाठी उत्पादन क्षमता वाढवली जाईल. दुसरे म्हणजे, IPO मधून जमा झालेला पैसा इतर कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरला जाईल. 

DOMS Industries IPO FAQs (in Marathi) 

1) DOMS Industries IPO ची Allotment Date काय आहे? 

DOMS Industries IPO ची Allotment Date 18 डिसेंबर, 2023 आहे.

2) DOMS Industries IPO ची Refund Date काय आहे? 

DOMS Industries IPO ची Refund Date 19 डिसेंबर 2023 आहे. 

3) DOMS Industries IPO स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे? 

DOMS Industries IPO 20 डिसेंबर 2023 ला स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल (BSE आणि NSE वर) 

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

Punjab National Bank: 1 लाख करोड मार्केट कॅपचा आकडा पार करणारी तिसरी सरकारी बँक 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi