Finance & Family: माझ्या बायकोला (किंवा GF) फायनॅन्समध्ये काही इंटेरेस्ट नाहीये. (मी काय करू)

Rate this post

प्रत्येक घरची हीच कहाणी आहे की, घरचे पैशाचे व्यवहार नेहमी घरचा पुरुष बघतो आणि यात काही चुकीचं नाही. आतापर्यंत परंपरा हीच चालत आले की पुरुषांनी पैशाचे व्यवहार बघावेत आणि महिलांनी घरची कामे याकडे लक्ष द्यावे

तुमच्या घरी पण हाच सीन असेल की, तुम्ही पैशाचे व्यवहार बघत असाल आणि तुमच्या बायकोला (किंवा गर्लफ्रेंडला) हा पैसा कसा मॅनेज करायचा, कसा बनवायचा  यामध्ये काही इंटरेस्ट नसेल. पण पैशाबद्दल माहिती असणे का गरजेच आहे आणि आता यावर उपाय काय? याची चर्चा आपण आजच्या पोस्टमध्ये करणार आहोत. 

प्रॉब्लेम कधी होतो?

कल्पना करा की घरचा कमविता पुरुष काही कारणाने किंवा आजारपणाने मृत्यू पावतो. असं झाल्यानंतर सगळे पैशाचे व्यवहार, पैसा कसा मॅनेज करायचा या सगळ्याची जबाबदारी घरच्या महिलेवर येते आणि अशावेळी त्या महिलेचा मात्र पूर्ण गोंधळ उडतो.

मी एका को-ऑपरेटिव बँक मध्ये काम करतो आणि आम्ही दररोज अशा केसेस बघतो जिथे नवऱ्याच्या निधनानंतर एफडी किती आहेत, टर्म इन्शुरन्स काय आहे, म्युच्युअल फंड एस आय पी किती आहेत इ. ची काही कल्पना त्या महिलेला नसते. या सगळ्यांमध्ये त्या महिलेचा गोंधळ उडतो.  असं होऊ नये म्हणून आतापासूनच पर्सनल फायनॅन्सविषयी बेसिक माहिती ही घरच्या जबाबदार महिलेला असली पाहिजे. (किंवा फॅमिलीमधील इतर जबाबदार व्यक्तीला) 

आता जमाना बदलला आहे.

आतापर्यंत महिलांच काम होतं की जेवण बनवा आणि मुलांना सांभाळा. पण जमाना आता खूप बदलला आहे. हे पुरूषांच काम, हे महिलांच काम असा फरक राहीला नाहीये. खास करून जेव्हा पैसे  मॅनेज करण्याची वेळ येते. आणि फक्त घरची महिला म्हणजे बायको असली पाहिजे अस नाही. तुमची आई असू शकते, बहीण असू शकते. किंवा फॅमिलीमधील तुमच्या विश्वासातला एखादा व्यक्ति. तुमच्या SIP असुदेत, टर्म इन्शुरेंस, बँक FD किंवा Provident फंड किंवा इतर Assets. या सगळ्याला नॉमिनी असलाच पाहिजे. 

 तुम्ही काय करू शकता? 

  • जस तुम्ही फायनॅन्स शिकत आहात तसंच फायनॅन्सच महत्व तुमच्या बायकोला सांगा (GF असेल तर तिला)
  • SIP किती आहेत आणि कोणत्या फंडमध्ये आहेत हे तुमच्या बायकोला किंवा फॅमिलीमधील व्यक्तीला माहीत असल पाहिजे. आणि त्यातून पैसे कसे काढायचे हे माहीत असले पाहिजे.
  • टर्म इन्शुरेंस क्लेम कसं घ्यायच हे माहीत असले पाहिजे.
  • किती FD आहेत आणि कोणत्या बँकमध्ये आहेत हे माहीत असले पाहिजे
  • स्टॉक पोर्टफोलिओबद्दल माहिती असली पाहिजे
  • या सगळ्याची कागदपत्रे कुठे आहेत, पासवर्ड काय आहेत याची माहिती (हे जरा सांभाळून इतर कोणाच्या हाती नाही लागल पाहिजे)

तुम्ही आता मेहनत घेऊन पैसे कमवत आहात. जस शक्य होईल तसे पैसे सेव आणि इनवेस्ट करत आहात. हे सगळ कोणासाठी? फॅमिलीसाठीच ना. आणि म्हणून या सगळ्याची माहिती तुमच्या बायकोला असायला हवी.  दोघांनी एकत्र येऊन पैसे मॅनेज केलेत तर त्याचा फायदा जास्त होईल. घरच्या कमविणाऱ्या व्यक्तीला काही झाल्यास फॅमिलीला अजून प्रॉब्लेम नाही होणार यासाठी ही तयारी आहे हे लक्षात घ्या.

आणि हो तुमच्या जीवाला कधी काही नको होऊदेत हीच देवाशी प्रार्थना! पण या संगळ्यासाठी तयार राहणे हा एक योग्य निर्णय आहे.

Hapyy Investing!

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance) 

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

 5 Money Lies: पैशाबद्दलचे 5 गैरसमज (जे आपण सहज मान्य करत आलोय)

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi