पर्सनल फायनॅन्स नक्की आहे तरी काय? | Personal Finance in Marathi

Rate this post

Personal Finance in Marathi: आजकाल आपण खूप एकतो ना की, पर्सनल फायनॅन्स शिकणे खूप गरजेच आहे. यूट्यूब म्हणा की इनस्टाग्राम सगळीकडे नुसत फायनान्सचा बोलबाला आहे. पण हे पर्सनल फायनॅन्स नक्की आहे तरी काय? आणि तेच आपण आजच्या पोस्टमध्ये शिकणार आहोत. चला तर सुरुवात करुयात.

Personal Finance काय आहे? 

पर्सनल फायनॅन्स म्हणजे एखाद्याचे वैयक्तिक किंवा फॅमिली इन्कम, खर्च आणि मालमत्तेशी संबंधित पैशाची मॅनेजमेंट.

यामध्ये आर्थिक सुरक्षेबरोबरच शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्म आर्थिक उद्दिष्टांच्या (Financial Goals) नियोजनाचा समावेश होतो. आता पर्सनल यासाठी की आपल्या प्रतेकयाचे Financial goals वेगळे असतात, इन्कम वेगळी असते, कोणी गावी राहत तर कोणी शहरात. प्रतेकजण वेगळ्या परिस्थितीमध्ये राहत असतो. 

Personal Finance एवढ इम्पॉर्टंट का आहे?

कारण ते पुढील गोष्टींमध्ये तुमची हेल्प करत. 

1) योग्यरित्या पैसा मॅनेज करायला शिकलात तर तुमचा पैशांबद्दलचा ताण आणि चिंता कमी होते. 

2) तुम्ही चांगले आर्थिक निर्णय घेता त्यामुळे तुमच्या भविष्यासाठी एक मजबूत आर्थिक पाया तयार करता येतो. 

3) रिटायरमेंटसाठी  बचत करणे, घर खरेदी करणे किंवा कॉलेजसाठी फीसाठी पैसे जमा करणे इ. अशा अनेक आर्थिक उद्दीष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी Personal finance तुमची हेल्प करत.

Personal Finance चे अनेक वेगवेगळे पैलू 

बजेटिंग: बजेट तयार करणे ही तुमच्या पैसा प्रभावीपणे मॅनेज करण्याची पहिली पायरी आहे. एक बजेट तुम्हाला तुमची इन्कम आणि  खर्च ट्रॅक करण्यात मदत करते, जेणेकरून तुम्ही तुमचा पैसा कुठे जात आहे हे पाहू शकता आणि अधिक पैसे वाचविण्यासाठी काही बदल करायचे असतील तर ते करू शकता. 

बचत: Financial goals गाठण्यासाठी पैशाची बचत महत्त्वाची आहे. पैसे वाचविण्याचे बरेच वेगवेगळे मार्ग आहेत, जसे की एक साध बँक Saving अकाऊंट, FD करणे इ. पुरेशी Savings असतील तर तुम्ही तुमच लक्ष Investing करू शकता. 

गुंतवणूक: आजच्या काळात पैसा वाढविण्याचा एक पक्का मार्ग म्हणजे Investing होय. तुम्ही Investing साठी अनेक मार्ग वापरू शकता जस की Mutual Funds, Stocks, गोल्ड इ. 

इन्शुरेंस: Insurance हा आर्थिक नुकसानीपासून स्वत:चे रक्षण करण्याचा एक मार्ग आहे. प्रतेक व्यक्तीने स्वतच हेल्थ इन्शुरेंस आणि टर्म इन्शुरेंस घेतलच पाहिजे. काहीही करा पण याकडे कधीच दुर्लक्ष करू नका. 

उधारी: क्रेडिट हा पैसे उधार घेण्याचा एक मार्ग आहे. जेव्हा तुम्ही क्रेडिट वापरता म्हणजेच पैसे उधार घेऊन वापरता  मूलत: बँक किंवा इतर कोणाकडून पैसे उधार घेत आहात आणि कालांतराने व्याजासह ते परत करण्याचे आश्वासन देत असता. या क्रेडिटचा जबाबदारीने वापर करणे आणि त्यासंबंधी EMI किंवा Bills वेळेवर भरणे महत्वाचे आहे.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance) 

Personal Finance चे 6 बेसिक धडे 

जर तुम्हाला Personal Finance अधिक चांगल्या पद्धतीने शिकायचे असेल तर तुम्हाला सर्व Policies, सर्व Financial Products  आणि विविध Personal Finance चे  टॉपिक शिकण्याची काही गरज नाहीये.

सुरूवातीला तुम्हाला फक्त पैशाचे काही मूलभूत नियम समजून घेऊन तुम्हाला Personal Finance चा मजबूत पाया तयार करण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला या मूलभूत नियम माहित असतील तर तुम्ही Personal Finance च्या जगातील गुंतागुंत आणि रहस्ये आपोआप पाहू शकाल.

1) जेव्हा तुम्ही सुरक्षित Financial Products मध्ये इनवेस्ट करता तेव्हा ते कर्ज दिल्यासारख आहे. 

हे समजायला अगदी सोप आहे जेव्हा तुम्ही कमी रिस्क असलेले Products जस की बँक FD, PPF किंवा Infra Bonds, NSC इ. पैसे इनवेस्ट करण्यासाठी निवडता, तेव्हा सजमजून जा की तुम्ही एक Safe असलेला Investment Product निवडत आहात. ज्यामधून मिळणारा रिटर्न हा कमी पण पक्का आणि Guaranteed असेल.

पण अशा Financial Products मधून अगदी भारी रिटर्न अपेक्षित करणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. कारण जेव्हा तुम्ही अशा Products मध्ये इनवेस्ट करता म्हणजे तुम्ही इतरांना पैसे देत असता त्यांचा बिझनेस मोठा करायला. (Directly नाही पण कस ते मी समजवतो) जेव्हा तुम्ही बँक FD मध्ये पैसे इनवेस्ट करता, बँक त्यांच पैशानी अनेकांना लोन देते. जेव्हा तुम्ही PPF मध्ये पैसे इनवेस्ट करता, तेव्हा हा पैसा सरकार वापरते. जेव्हा तुम्ही Infra Bonds मध्ये पैसे इनवेस्ट करता, तेव्हा हा पैसा Infrastructure कंपन्या वापरतात.

सांगायचा मुद्दा असा की,  तुमचे पैसे इतर लोक वापरत असतात आणि त्या बदल्यात फार नाही पण अगदी महागाईच्या रेट एवढा रिटर्न तुम्हाला त्यावर दिला जातो. (6% – 7%)

2) जेव्हा तुम्ही Equity Market मध्ये इनवेस्ट करता तुम्ही एक पार्टनर बनता. 

जेव्हा तुम्ही तुमचे पैसे Stocks, Mutual Funds, Index Funds किंवा ETF मध्ये इनवेस्ट करता तेव्हा तुम्ही पैसे कोणाला उधार देत नाही. याउलट तुम्ही तुमचे पैसे एखाद्या बिझनेसमध्ये किंवा आयडियामध्ये इनवेस्ट करत असता.

बिझनेसमध्ये चांगले दिवस पण येतात आणि वाईट पण. आणि याचे तुम्ही पूर्ण भागीदार असता. तसेच बिझनेसमधून होणारा प्रॉफिट आणि लॉस या दोघांमध्ये तुमचा वाटा असतो. तुम्हाला अगदी भारी रिटर्न पण मिळू शकतो, कधी कमी रिटर्नवर संतुष्ट रहाव लागेल तर कधी तुमचे पैसे अगदी झीरो होण्याची पूर्ण शक्यता असते.

जर तुम्ही एखादा Nifty 50 Index Fund निवडता म्हणजेच तुम्ही Reliance, HDFC Bank, TCS अशा कोमपण्याच्या फ्युचरमधील परफॉर्मेंसवर पैसे इनवेस्ट करत असता. जर तुम्ही 15%-18% रिटर्नची अपेक्षा करत आहात तेही कसली रिस्क न घेता अस अजिबात होणार नाही.

लॉन्ग टर्ममध्ये प्रॉफिट होणार हे पक्क आहे पण शॉर्ट टर्ममध्ये शेअर मार्केट अगदी डांस करत. नुसत वर खाली इकडे तिकडे होत असत. हे लक्षात घेणे खूप गरजेच आहे.

म्यूचुअल फंडसाठी बेस्ट App 👉 Groww

3) रिस्क आणि रिटर्न अगदी हातात हात घालून असतात अगदी कॉलेजमधील नव्या कपलसारख. 

पूढील 5 वर्षात असा कुठे इनवेस्ट करू जिथे रिटर्न सगळ्यात जास्त आणि रिस्क कमी असेल? असा प्रश्न त्यांच्या माइंडमध्ये येतो ज्यांना Finance च्या बेसिक्सची काही आयडिया नसते. तुम्ही विचार करा की जेव्हा आपण सेफ इनवेस्टमेंट बद्दल बोलतो आपल्या माइंडमध्ये येते Bank FD. पण FD वर किती रिटर्न मिळतो हे आपल्याला चांगलाच माहीत आहे.

म्हणून तुम्हाला जर चांगला रिटर्न हवा असेल तर रिस्क तर घ्याविच लागेल.  आणि रिस्क कसलाही विचार न करता कधीच नाही घ्यायची. जे काही कराल ते नीट विचार करुन करा.शेअर मार्केट Risky तर आहे पण नीट समजून पैसे इनवेस्ट केलेत तर चांगला रिटर्न नक्कीच कमवू शकता.

4) प्रत्येक कंपनी बिझनेस करायला मार्केटमध्ये येते, फक्त समाजसेवा नाही. 

मार्केटमधील विविध कंपन्या ज्या तुम्हाला विविध प्रोडक्टस इनवेस्ट करायला उपलब्ध करून देतात जस की Insurance, Mutual Funds, Stocks, FDs इ. या सगळ्या कोमपण्या फक्त एका कारणामुळे बिझनेस करत असतात ते म्हणजे प्रॉफिट कमविणे. यात काही शंका नाही की काही कंपन्या त्या प्रॉफिटमधील काही पैशातून समाजसेवेची कामे करतात. आणि ती करावीच लगतात.

पण ते समाजसेवा तेव्हा करतील ना जेव्हा त्यांच्या खिशात पैसा असेल आणि तो कमविण्याचा मार्ग एकच आहे तो बिझनेस प्रॉफिट. जर तुम्ही सिगरेट ओढता, दारू पिता तर तुमचा Insurance प्रीमियम हा नेहमीच जास्त असणार आहे. जर एखादा Mutual Fund तुम्हाला चांगले रिटर्न आणून देत आहे तर तो फी पण तेवढीच घेणार. आणि तुम्ही त्यांच्या जागी असतात तर हेच केल असत. त्यामुळे एखाद्या कंपनीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्यांना प्रॉफिट हवा असतो कारण तरच त्या मार्केटमध्ये टिकू शकतात.

5) आता थोड Adjust कराल तर नंतर त्रास कमी होईल (निर्णय तुमचा) 

जर तुमचा जन्म एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये झाला आहे तर ही तुमची चूक नाही. पण जर तुम्ही आयुषभर तिथेच राहिलात तर ही मात्र तुमची चूक असेल.

जर तुम्ही आता Saving  आणि Investing करत नसाल. उद्याच उद्या बघू अशा Attitude मध्ये जगत असाल तर पुढची लाइफ खूप कठीण होणार एवढ नक्की. मला माहीत आहे, जेव्हा आपण तरुण असतो हेच वय असत बाहेर फिरायच, नवीन कपडे, फोन इ  घेण्याच. हे सगळ तुम्ही नक्कीच केल पाहिजे पण जाणीवपूर्वक.

एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आज तुम्ही तुमचे पैसे वाया घालवता खर तर तुम्ही तुमच्या फ्युचरमधील रिटायरमेंट फंडमधून पैसे वाया घालवत असता. आणि याची जाणीव करून घ्यायची असेल तर तुमच्या आजूबाजूला बघा. अनेक वयस्कर माणसे पूर्णपणे त्यांच्या मुलांवर अवलंबून आहेत.

मी अस बोलत नाही की आई वडिलांनी आपल्या मुलांवर अवलंबून राहील नाही पाहिजे. प्रत्येक मुलाने त्याच्या आई वडिलांची काळजी घेतलीच पाहिजे. पण अशा अनेक घटना होतात जिथे मुले आपल्या आई वडिलांना विसरून जातात. 

त्यामुळे प्रत्येकाने म्हातारपणीसुद्धा कोणावर अवलंबून न राहण्याची तयारी केली पाहिजे. आणि यासाठी जास्त खर्च नाही येणार कारण म्हातारपण अजून खूप लांब आहे. एक सिम्पल इंडेक्स फंडमधील SIP पण एक चांगला रिटायरमेंट फंड बनवू शकते.

पण त्यासाठी आता, तरुण वयात थोड Adjust कराव लागेल. नको ते खर्च टाळून रिटायरमेंट फंडमध्ये इनवेस्ट करांव लागेल.

6) आजकाल रिस्क न घेणे हीच सगळ्यात मोठी रिस्क आहे. 

“शेअर मार्केटमध्ये रिस्क आहे म्हणून मी इनवेस्ट नाही करत” अस बोलणाऱ्या अनेक व्यक्तींना मी भेटत असतो. तुम्ही सुद्धा नक्की भेटत असणार. काही जण पैसे फक्त FD मध्येच ठेवतात. अगदी आजकालची तरुण पोर पण. पण जरा विचार करा आजकाल रिस्क कुठे नाहीये.

शाळा, कॉलेज केल, डिग्री घेतली. आता पुढे जॉब मिळेल की नाही यामध्ये रिस्क आहे. पैसे नुसते FD मध्ये ठेवून काही मिळत नाही कारण सगळा रिटर्न महागाई खाते, इथे सुद्धा रिस्क आहे. कॉलेजचे बेस्ट कपल म्हणून फेमस आहोत पण फॅमिली लग्नाला नाही बोली तर काय? तिथे पण रिस्क आहे. तुम्ही रोडवर गाडी नीट चालवत असाल पण समोरचा गाडी घेऊन अंगावर आला तर काय? तिथे पण रिस्क आहेच हो.

थोडक्यात काय तर, आजकाल सगळीकडे रिस्क आहे. या रिस्कला मॅनेज करायला शिका. शेअर मार्केट शॉर्ट टर्ममध्ये Risky आहे पण लॉन्ग टर्म मध्ये प्रॉफिट देणारच. त्यामुळे रिस्क घ्या आणि वेल्थ बनवा. तुम्ही करू शकता आणि करावच लागेल.

Conclusion हेच आहे की…

पर्सनल फायनॅन्स हा एक गुंतागुंतीचा विषय असू शकतो, पण बेसिक गोष्टी शिकणे महत्वाचे आहे जेणेकरून तुम्ही माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेऊ शकाल.

पुस्तके, वेबसाइट्स आणि यूट्यूब इ. साधने पर्सनल फायनॅन्सबद्दल शिकण्यास मदत करण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे यांचा पुरेपूर वापर कसा करायचा हे तुम्हाला शिकाव लागेल.

आपल्या सारख्या सामान्य लोकांचा पैसा मॅनेज करायला कोणी आर्थिक सल्लागार नसतो कारण आर्थिक सल्लागार ठेवणे संगळ्यांना परवडट नाही. म्हणून तुम्ही स्वतः Finance शिकायला सुरुवात करा.

Happy Investing!

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 Personal Finance चे 5 Principles (न बोलले जाणारे) (marathifinance.net)

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi