Financial Freedom in Marathi (Instant Gratification Trap): आपण अशा दुनियेत जगतोय जिथे सगळ कस झटपट मिळत आहे. सगळ्यांना अगदी तात्काळ समाधान (Instant Gratification) हव असत. भूक लागली आहे? zomato वर ऑर्डर केली जेवण घरी. कंटाळा आलाय? Instagram ओपन केल, रीलवर टाइमपास सुरू. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला सहज मिळतात.
पण या Instant Gratification म्हणजेच तात्काळ समाधानाची सवय जेव्हा फायनॅन्स या क्षेत्रात घेऊन येता तेव्हा तुमच्या श्रीमंत होण्यामध्ये हा एक अडथळा बनून राहतो. आता ते कस? हेच आपण आजच्या पोस्टमध्ये समजून घेणार आहोत. चला तर सुरवात करूया.
हे पटकन सगळ काही हवा असलेला स्वभावच तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याचा शत्रू आहे. (कस ते समजून घ्या)
पुरेशी सेविंग होत नाही: प्रत्येक रुपया जो तुम्ही मूड झाला की लगेच एखाद्या गोष्टीवर खर्च करता तो इन्वेस्ट होत नाही. दर वर्षी नवीन येणारे फोन, नवीन कपडे, कार इ. गोष्टीवर मन झाल की लगेच खर्च करणे चुकीच आहे. खरंच मला याची गरज आहे का? असा प्रश्न आधी तुम्ही स्वताला विचारायला हवा. लक्षात घ्या जर सेविंग वाढवायची असेल तर पैसे नक्की कुठे खर्च होत आहेत ते पहिल सोधा. तुमची सेविंग आपोआप वाढेल.
इन्वेस्ट करण्याची संधी हातातून जाते: जेव्हा जेव्हा तुम्ही तुमचे पैसे नको त्या गोष्टींवर खर्च करणार ज्याची तुम्हाला खरंच गरज नसते, अशा वेळी तुमच्या हातातून ते पैसे चांगल्या ठिकाणी इन्वेस्ट करण्याची संधी निघून जाते. हेच घाईघाईत केलेल खर्च शेवटी तुमच्या टोटल संपत्तिमध्ये खूप फरक आणतात. त्यामुळे शक्य तिथे खर्च वाढवून इन्वेस्ट करण्याकडे लक्ष द्या.
कर्ज आणि तुम्ही: तात्काळ समाधान (Instant gratification) च्या नादात खूप सारे लोक पर्सनल लोन घेऊन तसेच क्रेडिट कार्डचा अंधाधून वापर करतात आणि परिणामी कर्जाच्या जाळ्यात फसतात. आणि सगळ्यात बेकार गोष्ट म्हणजे क्रेडिट कार्ड असो की पर्सनल लोन, इंट्रेस्ट रेट एवढे जास्त असतात की ते फेडणे खूप कठीण होवून जात. म्हणू शक्य तो यांचा वापर जाणीवपूर्वक करा.
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉How to Become Rich: तुम्ही पैसे कमविणे की तुमच्या पैशाने तुमच्यासाठी पैसे कमविणे? काय चांगल आहे?
आता या तात्काळ समाधान (Instant gratification) Mentality मधून बाहेर कसं पडायच?
लॉन्ग टर्म वेल्थ बनवायची असेल तर सगळ्यात आधी तुमच्या Mindset मध्ये बदल होणे फार गरजेचं आहे. तात्काळ समाधान (Instant gratification) असलेल्या माइंडपासून तुम्हाला दूर जावून विलंबित समाधान (delayed gratification) माइंडकडे वाटचाल करायची आहे. हे करताना तुम्हाला पुढील टिप्स कामी येतील.
लाइफचे आर्थिक ध्येय ठरवा: तुमच्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य काय आहे हे स्पष्ट करा. पुरेसा पैसा, राहायला घर, आनंदी फॅमिली, गणपती आणि शिमगा गावी इ. तुम्हाला नक्की काय हवय हे स्पष्ट करा. कारण लाइफचे ध्येय स्पष्ट असतील तर उगाच नको तिथे खर्च तुम्ही करणार नाही. जास्त पैसे इन्वेस्ट करण्यासाठी तुमच्याकडे आता एक कारण आहे ते म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य.
फ्युचर लाइफची कल्पना करा: Visualize करा की तुम्हाला तुमची लाइफ कशी हवीय. जॉब टेंशन नकोय? ट्रेन किंवा बसची गर्दी नकोय? बॉसचे टोमणे नकोयत? मग कल्पना करा की हे सगळ तुम्ही कस Achieve करू शकता. हे करण्याचा मार्ग एकच आहे. जितक कमवत आहात. त्यातला मोठा हिस्सा इन्वेस्ट करा. इकडे तिकडे खर्च करणे टाळा.
बजेट बनविणे गरजेच आहे: मला माहीत आहे, बजेट बनविणे खूप कंटाळवाण काम आहे. पण किती पैसे तुमच्याकडे येतात, त्यातले किती पुन्हा बाहेर जातात आणि नक्की कुठे जातात याची माहिती तुम्हाला असली पाहिजे. महिन्याचा एक बजेट बनवा की एवढा खर्च करेन आणि बाकी इन्वेस्ट करेन. काही वेळा, बजेटच्या बाहेर खर्च जातात जस की सण येणे. पण वर्षाच्या 12 पैकी 10 महीने जरी नीट बजेट करून खर्च केलात तर तुम्ही Average लोकांपेक्षा खूप पुढे असाल.
पोस्ट आवडली असेल तर शेअर करा ही तुमची जबाबदारी आहे. चांगल्या पोस्ट लिहिणे ही माझी जबाबदारी. Keep Learning & Keep Earning!
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Personal Finance in Marathi: आर्थिक पाया मजबूत करायचय? 3 पर्सनल फायनॅन्स रुल आजच समजून घ्या
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
1 thought on “Financial Freedom in Marathi: आर्थिक स्वातंत्र्याचा मोठा शत्रू म्हणजे तात्काळ समाधान? कस ते समजून घ्या”