विविधीकरण (Diversification) ही पैसे इनवेस्ट करताना रिस्क मॅनेज करण्यासाठी वापरली जाणारी एक टेक्निक आहे.
Diversification म्हणजे एकाच ठिकाणी किंवा एकाच प्रकारच्या Asset मध्ये सगळे पैसे न इनवेस्ट करता वेगवेगळ्या Assets मध्ये इनवेस्ट करणे. थोडे पैसे Stocks मध्ये तर थोडे Mutual funds, FD, Gold किंवा इतर Financial Assets मध्ये इनवेस्ट करणे.
Diversification विविध क्षेत्रांमध्ये पैसे इनवेस्ट करून देखील करता येत जस की बँकिंग सेक्टर, आयटी सेक्टर, Pharma सेक्टर इ.
विविध Assets मध्ये Diversification कसं कराल?
छोटे मोठे इन्वेस्टर तसेच मोठ्या म्यूचुअल फंडचे फंड मॅनेजर नेहमी पैसे विविध Asset मध्ये इनवेस्ट करण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून पोर्टफोलिओची रिस्क कमी होते. काही मुख्य Assets पुढीलप्रमाणे:
शेअर मार्केट – जिथे मोठ मोठ्या कंपन्यांचे शेअर्स तुम्ही खरेदी विक्री करू शकता
Bonds – हे एक प्रकारच Fixed Income Debt Instrument आहे ज्याचा वापर करुन तुम्ही सरकारी किंवा कॉर्पोरेटच्या Bonds मध्ये इनवेस्ट करू शकता.
रीयल इस्टेट – घर, जागा किंवा एखादा फ्लॅट इ. मध्ये पैसे इनवेस्ट करून त्यातून रेंटच्या रूपाने पैसे कमविणे.
Exchange-traded funds (ETFs) – ETF म्हणजे विविध स्टॉक्सना एकत्र करून बनवलेली एक लिस्ट असते. हे एका स्टॉकप्रमाणे काम करत ज्याला तुम्ही शेअर मार्केटच्या टाइमिंगनुसार खरेदी किंवा विक्री करू शकता.
Commodities – सोने, चांदी किंवा इतर मटेरियल जे इतर प्रकारचे प्रॉडक्ट बनविण्यासाठी उपयोगी पडतात.
म्यूचुअल फंड – म्यूचुअल फंड हे सगळ्यांचे फेवरेट आहेत. म्यूचुअल फंडमध्ये इनवेस्ट करून तुम्ही एकाच फंडमध्ये विविध कंपन्यांमध्ये इनवेस्ट करू शकता. आणि सुरुवात अगदी 100 रुपयापासून करता येते.
Public Provident Fund (PPF) – पब्लिक प्रोवीडेंट फंड ही एक सरकारमान्य स्कीम आहे ज्यामध्ये तुम्ही लॉन्ग टर्मसाठी पैसै इनवेस्ट करू शकता. प्रत्येक कंपनी आपल्या Employees साठी या स्कीममध्ये पैसै Invest करत असते. सरकारचा सपोर्ट असल्यामुळे इथे रिस्क कमी असते.
FD – आपल्या आई वडिलांचे फेवरेट Investing साधन म्हणजे FD आणि खर बोलू तर FD वर आधी चांगले रिटर्न मिळायचे पण आता रिटर्न किती मिळतात यावर न बोललेलच बर.
इंडेक्स फंड – अगदी Mutual Fund सारखेच असतात. फरक फक्त एवढाच आहे की हे एका ठराविक इंडेक्समधील कंपन्यांमध्ये पैसे Invest करतात जस की Nifty 50 किंवा Sensex.
National Pension Scheme (NPS) – नावरून समजल असेल की ही स्कीम सरकारने खास करून रिटायरमेंटच्या हेतूसाठी बनवली आहे.
आणि इतर Asset ज्यामध्ये तुम्ही पैसे Invest करू शकता.
आता पैसे Diversify करण्यासाठी तुम्हाला यामधील प्रत्येक Asset मध्ये पैसे Invest करायची गरज नाही. तुमच्या रिस्क आणि Financial Goals नुसार तुम्हाला एखादा काही Asset निवडायचे आहेत आणि त्यामध्ये पैसे Invest करायचे आहेत.
Stock Diversification म्हणजे काय?
शेअर मार्केटच्या मदतीने तुम्ही हव्या त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता किंवा विकू शकता.
स्टॉक Diversification म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये स्टोक्स विकत घेताना ते एकाच प्रकारच्या कंपन्याचे किंवा सेक्टरचे न घेता विविध कंपन्यांचे घेणे.
याचा फायदा असा होतो सगळे पैसै एकाच स्टॉकमध्ये किंवा सेक्टरमध्ये Invest होत नाहीत आणि त्यामुळे लॉस होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते.
समजा तुम्ही फक्त एका सेक्टरमध्ये पैसे Invest केले जस की IT सेक्टर आणि नेमक सरकारने काही Policies मध्ये बदल केले किंवा काही इतर कारण असेल ज्यामुळे IT कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. अशा वेळी तुम्हाला मोठ नुकसान होवू शकत.
आणि म्हणून तुमच्या स्टॉक पोर्टफोलिओमध्ये एका पेक्षा जास्त स्टॉक्स असले पाहिजेत. कमीत कमी १०-१२ स्टॉक तुम्ही घेऊ शकता.
Mutual Fund Diversification म्हणजे काय?
Mutual Fund Diversification म्हणजे एकाच Mutual Fund मध्ये सगळे पैसै Invest न करता ते विविध प्रकारच्या Mutual Funds मध्ये Invest करणे. मार्केटमध्ये अनेक प्रकारचे Mutual Funds उपलब्ध आहेत जस की,
Equity Mutual Fund – जे कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसै Invest करतात.
Debt Mutual Fund – जे सरकार किंवा कंपन्यांच्या Bonds किंवा Fixed Income Securities मध्ये Invest करतात.
International Mutual Fund – असे Funds जे तुमचे पैसै बाहेर देशातील कंपन्यांमध्ये Invest करतात.
आता यातील Equity Funds हे जास्त Risky असतात आपण त्यांना Debt Mutual Fund सोबत Compare करतोय. तसेच International Mutual Fund हे जास्त Risky ठरतील जर तुम्ही आपल्या देशातील Equity Mutual Fund सोबत Compare करत असाल.
याचं कारण असं की, बाहेर देशात होणाऱ्या आर्थिक आणि राजकीय घडामोडींचा फटका लगेच तेथील कंपन्यांवर होत असतो. आणि अस झालं की तुम्ही Invest केलेल्या International Mutual Fund मध्ये त्याचा परीणाम बघायला मिळतो.
Mutual Fund मधील Diversification कस कस काम करत?
जस आपण आधी चर्चा केली की योग्यरित्या Diversification करण्यासाठी तुम्हाला तुम्ही रिस्क क्षमता आणि Financial Goals ची जाणीव हवी.
Diversification करण्याचा सगळ्यात मोठं कारण म्हणजे Mutual Fund मधील रिस्क कमी करणे. याचा अजून एक फायदा असा होतो की तुम्हाला तुमच्या Investment वर रिटर्न चांगला मिळतो.
समजा तुम्ही सगळे पैसे एकाच Mutual Fund मध्ये Invest केले होते. आणि नेमक त्याचं फंडमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला मोठ नुकसान होऊ शकत. पण जर तुम्ही फक्त थोडे पैसै या फंडमध्ये Invest केले असतील आणि बाकीचे इतर कॅटेगरीच्या Funds मध्ये तर तुम्हाला फारस नुकसान होणार नाही.
म्हणून सगळे पैसे एकाच फंडमध्ये न टाकता विवीध प्रकारच्या Funds मध्ये invest करा.
Diversification करण्याच नक्की कारण काय?
रिस्क कमी करणे:-
एकाच प्रकारच्या Asset मध्ये किंवा एकाच क्षेत्रामध्ये सगळे पैसे इनवेस्ट केले की तुम्ही खूप रिस्क ओढवून घेता. Diversification च्या मदतीने ही रिस्क कमी करता येते.
रिटर्न जास्त मिळवणे:-
आपल्याला संगळ्यांना हे चांगलच माहीत आहे की स्टॉकमध्ये FD पेक्षा जास्त रिटर्न मिळतात. पण जेव्हा तुम्ही पैसे Diversify करता या दोन्ही Assets मध्ये तेव्हा तुम्ही FD ची सुरक्षा तसेच स्टॉकचे उत्तम रिटर्न मिळवता.
बहुतेक अनुभवी इन्वेस्टर सहमत आहेत की, रिस्क कमी करून लॉन्ग टर्म मध्ये तुमची Financial Goals साध्य करण्याचा हा सर्वात महत्वाचा घटक आहे.
Diversification करण्यामागे तर्क असा आहे की विविध Financial Assets मार्केटच्या वेगवेगळ्या परिस्थितीत भिन्न कामगिरी करतात.
जेव्हा एक Asset किंवा Investment खराब काम करत असते, तेव्हा इतर Asset किंवा Investment चांगली कामगिरी करू शकते, ज्यामुळे लॉस भरून काढण्यास आणि पोर्टफोलिओचा एकूण रिटर्न स्थिर होण्यास मदत होते.
एक उदाहरण घेऊत!
समजा, शेअर मार्केट खूप खराब पेरफॉर्म करत आहे. तुम्ही डायरेक्ट घेतलेले सगळे Shares अगदी लॉसमध्ये आहेत.
पण दुसरीकडे गोल्डमध्ये तुम्हाला चांगला रिटर्न मिळत आहे किंवा तुम्ही काही Mutual Funds घेतले होते ते बऱ्यापैकी रिटर्न देत आहेत.
त्यामुळे एका Asset मध्ये होणाऱ्या लॉसची भरपाई दुसऱ्या Asset कडून केली जाते आणि म्हणून पैसे इनवेस्ट करताना Diversification करणे खूप गरजेचे आहे.
एक गोष्ट लक्षात घ्या!
Diversification अगदी 100% प्रॉफिटची हमी देत नाही किंवा तुम्हाला लॉस होणारच नाही अस सांगत नाही. पण Diversification हे Investing चे मूलभूत तत्त्व (fundamental principle) मानले जाते कारण यामुळे रिस्क मॅनेज करण्यास आणि लॉन्ग टर्ममध्ये नियमित रिटर्न मिळण्याची शक्यता वाढण्यास मदत होते.
अजून एक गोष्ट म्हणजे Diversification हे तुमच्या Financial Goals, तुमची रिस्क घेण्याची क्षमता तसेच तुम्ही किती टाइमसाठी इनवेस्ट करत आहात यावरून ठरवल पाहिजे.
6 thoughts on “विविधीकरण काय आहे आणि का गरजेच आहे? Diversification Meaning in Marathi”