डायव्हर्सिफिकेशनसाठी टोटल किती फंडस घेऊ? | Mutual Fund Diversification in Marathi

Mutual Fund Diversification in Marathi: म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये टोटल किती फंड असले पाहिजे? असा प्रश्न तुम्हाला पण नक्कीच पडला असेल. 

हा प्रश्न जरी सरळ असला तरी याचे उत्तर थोडं कठीण आहे कारण Mutual Fund Diversification करताना  इन्वेस्टरचा कम्फर्ट लेव्हल, त्याची रिस्क क्षमता आणि रक्कम या गोष्टी बघणे महत्त्वाचे आहे.  

या पोस्टमध्ये आपण समजून घेऊन की योग्य डायवर्सिफिकेशन असलेला म्यूचुअल फंड पोर्टफोलियो कसा बनवायचा. 

चला तर सुरुवात करू. 

सगळ्यात आधी डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय? 

 डायव्हर्सिफिकेशन म्हणजे सगळे पैसे एकाच फंडमध्ये किंवा एकाच सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट न करता वेगवेगळ्या फंडस किंवा सेक्टर्समध्ये इन्व्हेस्ट करणे. 

आता डायव्हर्सिफिकेशन करताना तुम्ही वेगवेगळ्या सेक्टरमध्ये करणार जस की आयटी सेक्टर, बँकिंग सेक्टर किंवा ऑटो सेक्टर इ. किंवा कंपन्यांच्या मार्केट कॅपनुसार करणार आहात जस की लार्ज कॅप कंपन्या, मिड कॅप किंवा स्मॉल कॅप कंपन्या इ. 

उदाहरणार्थ जर तुम्ही सेन्सेक्स इंडेक्स फंड घेतला तर मार्केटमधील टॉप 30 कंपन्यांमध्ये तुमचे पैसे इन्वेस्ट करणार आहात. याचा अर्थ तुम्ही लार्ज कॅप कंपन्यामध्ये तुमचे ओऐसे इन्व्हेस्ट करणार  आहात. 

Mutual Fund Diversification करताना महत्वाचे पॉईंट्स 

जर तुमचा पोर्टफोलिओ छोटा आहे किंवा तुम्ही नुकतंच पैसे इन्वेस्ट करायला सुरुवात केली तर खूप सारे फंडस घ्यायची गरज नाही 1-2 फंडस पुरेसे आहेत. 

जसा तुमचा म्यूचुअल फंड पोर्टफोलियो मोठा व्हायला लागतो तस इन्वेस्ट करण्याची रक्कम पण वाढते. अशा वेळी सगळे पैसे एकाच म्यूचुअल फंडमध्ये इन्वेस्ट करण्याची भीती वाटते. मग तुम्ही रिस्क कमी करण्यासाठी दुसऱ्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. 

 समजा तुम्ही 3000 ची SIP एका फलेक्सि कॅप फंडमध्ये करत होता पण आता तुम्हाला रक्कम वाढवायची आहे तर काही इन्वेस्टर याच फंडमध्ये इन्वेस्ट करतील तर काही यासाठी एखादा दूसरा फंड घेतील. यात काही चुकीच नाही कारण किती फंड घ्यायचे ही प्रत्येकाची चॉइस आहे पण खूप जास्त फंडस घेऊन ते मॅनेज करायला त्रास होणार नाही याकडे पण लक्ष द्या. 

डायव्हर्सिफिकेशन बद्दल काही गैरसमज

→ काही इन्वेस्टरना वाट की पोर्टफोलिओमध्ये जर डायव्हर्सिफिकेशन करायचं असेल तर स्मॉल कॅप आणि मिडकॅप पण असलेच पाहिजेत. पण आस करणे गरजेच नाहीये. 

→ मिडकॅप आणि स्मॉल कॅप फंड लॉंग टर्ममध्ये खूप चांगले रिटर्न देतात यात काही शंका नाही पण त्यांच्यासोबत रिस्क पण तेवढीच असते. प्रत्येक इन्वेस्टर एवढी रिस्क घ्यायला तयार नसतो. 

→ जर तुम्हाला स्मॉल कॅप फंड किंवा मिड कॅप फंड घ्यायचा नसेल तर तुम्ही एखादा फ्लेक्सि कॅप फंड घेऊ शकता जिथे तुम्हाला एकाच फंडमध्ये स्मॉल कॅप कंपन्या, लार्ज कॅप कंपन्या आणि मिडकॅप कंपनी या सगळ्या मिळतील. 

प्रॅक्टिकल Mutual Fund Diversification कसं करायचं? 

→ तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जास्तीत जास्त 5 फंड्स असले पाहिजेत तेही वेगवेगळ्या कॅटेगरीचे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या की, तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये  पैसे इन्वेस्ट करायचा विचार का केलात कारण तुम्हाला एक एक स्टॉक निवडायचा नाहीये, त्यामध्ये जास्त रिस्क आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही एक म्यूचुअल फंड निवडता त्यामध्ये आधीच खूप साऱ्या कंपन्यां असतात. आणि म्हणून खूप सारे फंडस घेऊन काही फायदा होणार नाही. 

→  जर तुमचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओची साईज छोटी आहे, SIP ची रक्कम छोटी आहे (1000 – 2000 रुपये तुम्ही 2-3 फंडसमध्ये इन्व्हेस्ट करा. मी काहींचा पोर्टफोलिओ बघतो तर 200 रुपयाची SIP, 300 रुपयाची SIP केल्या आहेत आणि खूप सारे फंडस पोर्टफोलिओमध्ये ठेवले आहेत तर तसं करू नका.)

→ एकाच कॅटेगरीमधील दोन वेगळे फंडस निवडताना पोर्टफोलिओ Overlapping चेक करा. समजा तुम्ही एका Small कॅप फंडमध्ये 5000 ची SIP करत आहात पण आता तुम्हाला अजून एक SIP स्मॉल कॅप फंडमध्ये करायची आहे पण फंड दूसरा हवा आहे. अशा वेळी पहिला फंड आणि दूसरा फंड यामध्ये त्याच त्याच कंपन्या तर नाहीत ना, हे आधी चेक करा.  यालाच पोर्टफोलियो Overlapping बोलतात. 

योग्य फंड निवडून तुमच्या रिस्क क्षमतेनुसार Mutual Fund Diversification करणे ही एक कला आहे. 

जेव्हा तुम्ही नेमकेच पण निवडता तेव्हा लॉंग टर्ममध्ये ते मॅनेज करायला पण सोपे जातात. उगाचच खूप सारे फंडस घेऊन त्याच त्याच कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करण्यात काही अर्थ नाही. यामध्ये नुकसान तुमचच आहे कारण तुम्हाला Expense Ratio स्वरूपात वेगवेगळ्या फंडसची फी द्यावी लागेल. 

मी माझं उदाहरण देऊ तर, माझ्यासाठी जास्तीत जास्त 5 फंडस पुरेसे आहेत. त्यापैकी सध्या माझ्याकडे फक्त 3 आहेत.  दुसर म्हणजे मी कॅटेगिरी सिलेक्ट करून ठेवल्या आहेत आणि मी त्यामध्येच इन्वेस्ट करेन जस की इंडेक्स फंड, फ्लेक्स फ्लेक्सि कॅप फंड आणि  स्मॉल कॅप फंड. 

तुम्हीसुद्धा तुम्हाला ज्या कॅटेगिरीज समजतात किंवा तुमच्या Financial goals साठी चांगल्या आहेत त्या निवडा आणि त्यामध्ये लॉन्ग टर्मसाठी इन्वेस्ट करा. 

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉विविधीकरण (Diversification) काय आहे आणि का गरजेच आहे?

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance

2 thoughts on “डायव्हर्सिफिकेशनसाठी टोटल किती फंडस घेऊ? | Mutual Fund Diversification in Marathi”

Leave a Comment

श्रीमंत व्यक्तींच्या 5 सवयी (ज्या तुम्ही विकसित केल्या पाहिजेत) Nova Agritech IPO GMP: ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? BLS-E Services IPO: अप्लाय करण्याआधी डीटेल माहिती वाचा डिटेल माहिती: HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य कस मिळेल? | 3 Steps of Financial Freedom in Marathi