गो डिजिट आयपीओ येतोय, तुम्ही पैसे इन्वेस्ट करणार आहात तर ही माहिती नक्की वाचा | Go Digit IPO Review in Marathi

Go Digit IPO Review in Marathi: गो डिजिट आयपीओ 15 मे 2024 रोजी सुरू होणार आहे. गो डिजिट आयपीओ 17 मे 2024 रोजी बंद होणार आहे. गो डिजिट आयपीओची इश्यू साइज  ₹2614.65 करोड एवढी आहे. गो डिजिट आयपीओची किंमत ₹258 ते ₹272 रुपये प्रती शेअर ठरविण्यात आली आहे. 

आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही कमीत कमी 55 शेअर्ससाठी अप्लाय करू शकता ज्याची टोटल किंमत ₹14,960 रुपये असेल. गो डिजिट आयपीओची अलॉटमेंट 21 मे 2024 रोजी फिक्स करण्यात आली आहे.  गो डिजिट आयपीओची लिस्टिंग 23 मे 2024 रोजी केली जाईल.

नवीन अपडेटसाठी जॉइन टेलीग्राम चॅनल (आजच) 👉 @marathifinance

गो डिजिट कंपनीबद्दल माहिती | Go Digit Company Details

गो डिजिट इन्शुरन्स ही डिजिटल विमा कंपनी आहे जी ग्राहकांच्या चांगल्या अनुभवावर केंद्रित आहे. गो डिजिट इन्शुरन्स कंपनीची सुरुवात 6 डिसेंबर 2016 रोजी झाली. गो डिजिट इन्शुरेंस प्रॉडक्ट बनविणे तसेच कस्टमरपर्यन्त पोचविण्यासाठी टेक्नॉलजीचाअ पूर्ण वापर करत आहे. गो डिजिट ही एक Full Stack Insurance कंपनी आहे. Full Stack Insurance म्हणजे अशी कंपनी जीच्याकडे इन्शुरेंस पॉलिसी विकणे, Underwriting आणि इतर इन्शुरेंस संबंधित सुविधा देण्याच लायसेंस आहे.

go digit ipo in marathi
go digit ipo in marathi

गो डिजिट कंपनी पुढील प्रकारचे इन्शुरेंस प्रॉडक्ट कस्टमरना पुरविते:

  • मोटर इन्शुरेंस ज्यामध्ये कार, बाइक, टॅक्सी, ट्रक इ येतात
  • हेल्थ इन्शुरेंसमध्ये आरोग्य संजीवनी पॉलिसी पॉलिसी, कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरेंस इ येतात
  • इंटरनॅशनल ट्रॅवल इन्शुरेंस
  • शॉप इन्शुरेंस
  • होम इन्शुरेंस
  • इत्यादी

गो डिजिट आयपीओचा पैसा कुठे वापरणार? | Go Digit IPO Fund Use

  • शेअर मार्केटमध्ये कंपनीचे स्टॉक्स लिस्ट करून कंपनी तिचे नाव लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. या आयपीओमागे हा मोठा हेतु आहे. अस केल्याने कंपनीची नाव होईल.
  • तसेच कंपनीच्या दैनंदिन कामासाठी लागणारा पैसा म्हणजे Working Capital साठी हा आयपीओचा पैसा वापरला जाईल.
  • इतर कॉर्पोरेट कामांसाठी हा पैसा वापरला जाईल.

इतर पोस्ट वाचा 👉आधार हाऊसिंग फायनान्स आयपीओसाठी अप्लाय करताय? मग ही माहिती नक्की वाचा 

गो डिजिट आयपीओच्या महत्वाच्या तारखा | Go Digit IPO Important Dates

गो डिजिट आयपीओची सुरवात 15 मे 2024 रोजी सुरू होणार आहे आणि हा आयपीओ 17  मे 2024 रोजी बंद होणार आहे. गो डिजिट आयपीओची अलॉटमेंट 21 मे 2024 रोजी फिक्स करण्यात आली आहे. या आयपीओची लिस्टिंग 23 मे 2024 रोजी  केली जाईल.

आयपीओच्या किमतीची घोषणा 14 मे 2024
आयपीओ सुरू होणार 15 मे 2024
आयपीओ बंद होणार 17 मे 2024
आयपीओची अलॉटमेंट 21 मे 2024
रिफंड मिळणार 22 मे 2024
Demat Account मध्ये शेअर मिळणार 22 मे 2024
आयपीओची लिस्टिंग होणार 23 मे 2024

गो डिजिट आयपीओबद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न | Go Digit IPO FAQs 

Question 1) गो डिजिट आयपीओची अलॉटमेंट तारीख काय आहे?

Answer: गो डिजिट आयपीओची अलॉटमेंट तारीख  15 मे 2024 आहे.

Question 2) गो डिजिट आयपीओची रिफंड तारीख काय आहे?

Answer: गो डिजिट आयपीओची रिफंड तारीख 22 मे 2024 आहे.

Question 3) गो डिजिट आयपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?

Answer: गो डिजिट आयपीओ 23 मे 2024 रोजी BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल.

इतर पोस्ट वाचा 👉Bonus Share: बोनस शेअर काय आहे? काय फायदा होतो?

Leave a Comment