Market Capitalization or Market Cap Meaning in Marathi
कोणत्याही कंपनीला एखाद्या इंडेक्समध्ये सामील करण्याआधी तीच बाजार भांडवल (Market Cap) किती आहे हे बघितल जात. बाजार भांडवल म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन (ज्याला मार्केट कॅप असेही म्हणतात) हे भारतीय शेअर मार्केटमध्ये कंपनीचा आकार मोजण्यासाठी वापरले जाणारे मेट्रिक आहे. आणि हे काम SEBI करते. त्यामुळे आपण SEBI बद्दल आधी थोडक्यात समजून घेऊत. आणि मग मार्केट कॅपबद्दल समजून घेऊत.
SEBI काय आहे?
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (The Securities and Exchange Board of India-SEBI) ही भारतीय शेअर मार्केटवर देखरेख ठेवणारी नियामक संस्था आहे. १९९२ मध्ये स्थापन झालेल्या सेबीचे काम शेअर मार्केटमध्ये पारदर्शकता आणि विश्वास वाढविणे, गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण करणे आणि भारताच्या शेअर मार्केटचा विकास करणे आहे.
SEBI ची उद्दिष्टे
SEBI चा मुख्य उद्देश भारतीय शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण करणे हा आहे. हे साध्य करण्यासाठी SEBI ची अनेक महत्त्वाची कामे करत असते:
१. शेअर मार्केटला Regulate करणे
SEBI स्टॉक एक्स्चेंज जस की NSE/BSE, डिपॉझिटरीज जस की NSDL/CDSL आणि इतर बाजार मध्यस्थांचे जसं की आपल्या सारखे सामान्य गुंतवणूकदार, ब्रोकर, बँक्स इत्यादींचे नियमन करते जेणेकरून ते निष्पक्ष आणि पारदर्शकपणे काम करतील याची खात्री सेबी करते.
२. पारदर्शकतेला प्रोत्साहन देणे
SEBI कंपन्यांना त्यांचे कामकाज आणि आर्थिक कामगिरीबद्दल महत्त्वाची माहिती जाहीर करणे बंधनकारक करून शेअर मार्केटमध्ये पारदर्शकतेला प्रोत्साहन देते आणि त्यामुळे आपल्या सारख्या अनेक गुंतवणूकदारांना त्याचा फायदा होतो.
३. इनसाइडर ट्रेडिंगवर लक्ष ठेवणे
SEBI इनसाइडर ट्रेडिंग शोधण्यासाठी आणि रोखण्यासाठी शेअर मार्केटमधील ट्रेडिंगवर लक्ष ठेवते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखादया कंपनीच्या आतल्या खबरी माहीत असतील तर तो त्याचा फायदा घेऊ शकतो जस की मोठ्या म्यूचुअल फंड कंपनीचे एम्प्लॉयी. त्यांना म्यूचुअल फंड कंपनी कोणता शेअर घेणार हे माहीत असेल तर स्वतःचा पैसा त्या शेअरमध्ये टाकू शकतात.
४. म्युच्युअल फंडांना Regulate करणे
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या हितासाठी काम करतील याची खात्री करण्यासाठी आणि फसवणुकीची कामे रोखण्यासाठी SEBI म्युच्युअल फंड कंपन्यांवर नीट लक्ष ठेऊन असते.
५. शेअर मार्केटचा विकास
गुंतवणूकीची नवीन साधने मार्केटमध्ये आणून , गुंतवणूकदारांच्या शिक्षणाला चालना देऊन आणि शेअर मार्केटच्या वाढीस प्रोत्साहन देऊन भारताच्या इकॉनॉमीचा विकास करण्याची जबाबदारी SEBI ची आहे.
SEBI चा भारतीय शेअर बाजारावर परिणाम
SEBI ने सुरुवातीपासूनच भारतीय शेअर मार्केटवर लक्षणीय प्रभाव टाकला आहे. त्यांच्या विविध नियमांमुळे मार्केटमध्ये पारदर्शकता वाढलीय ज्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. आणि जेव्हा गुंतवणूकदारांचा मार्केटवरचा विश्वास वाढतो तेव्हा जास्त पैसा शेअर मार्केटमध्ये येतो. त्यामुळे कंपन्यांना बिझिनेस वाढवायला सहज पैसा उपलब्ध होतो. कंपन्या या पैशाचा वापर नविन फॅक्टरी, एखाद नवीन युनिट टाकण्यासाठी करतात आणि त्यामूळे लोकांना नोकऱ्या मिळतात.
SEBI ने गुंतवणूकदारांचे शिक्षण आणि जागरूकता वाढविण्यासाठी पावले उचलली आहेत तसेच नवीन उपक्रम सेबी राबवत असते ज्यामुळे भारतात अधिक माहितीपूर्ण आणि अर्थसाक्षर गुंतवणूकदार तयार होण्यास मदत होत आहे. भारतीय शेअर बाजारात SEBI ची भूमिका महत्त्वाची आहे. SEBI चे प्रयत्न भारतात अधिक मजबूत आणि गतिशील शेअर मार्केट तयार करण्यात महत्त्वपूर्ण ठरत आहेत, ज्याने अधिक पैसा भारतामध्ये येत आहे आणि देशाच्या आर्थिक वाढीस चालना देण्यास मदत होत आहे.
Market Cap म्हणजे काय?
मार्केट कॅप म्हणजे थोडक्यात काय तर, एखादी कंपनी किती मोठी आहे किंवा कंपनीची मार्केटमध्ये व्यालू किती आहे याचा हिशोब लावणे आणि हे फ्री-फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन वेटेड मेथडॉलॉजी (Free Float Market Capitalization Weighted Methodology) च्या मदतीने ठरवल जाते. (नाव जरा कठीण आहे पण मेथड अगदी सोपी आहे.)
फ्री-फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन वेटेड मेथडॉलॉजी म्हणजे मार्केटमध्ये एखाद्या कंपनीचे जितके शेअर्स खरेदी विक्रीसाठी आहेत त्यावरून त्या कंपनीचा आकार (Size) ठरवणे.
आपण रिलायन्स (Reliance) या कंपनीच उदाहरण घेऊ आणि तीच मार्केट कॅप किती आहे ते जाणून घेऊत. आता रिलायन्सच्या एका शेअरची किमत Rs.२३५५ आहे (ज्या दिवशी मी ही पोस्ट लिहीत आहे पुढे जावून त्यात बदल होवू शकतो) आणि शेअर मार्केटमध्ये खरेदी विक्री असलेल्या शेअरची टोटल संख्या ३१२ करोंड आहे. आता आपण गणित केल तर, Rs २३५५ * ३१२ करोंड = ७,३४, ७६० करोंड एवढ रिलायन्स कंपनीचं मार्केट कॅप येत आहे. अशाच प्रकारे शेअर मार्केटमधील विविध कंपन्यांचे मार्केट कॅप काढले जातात आणि त्या नुसार एखादी कंपनी किती मोठी आहे हे आपल्याला समजते. आणि याच मार्केट कॅपच्या हिशोबाने या कंपन्यांना सेन्सेक्स आणि निफ्टि या इंडेक्समध्ये स्थान दिले जाते.
एक गोष्ट लक्षात घ्या की.
जे शेअर्स कंपनीच्या मालकाकडे असतात किंवा एखाद्या मोठ्या इन्वेस्टरकडे असतात त्या शेअर्सना मार्केट कॅप काढताना मोजल जात नाही. याच कारण अस की, कंपनीचा मालक त्याच्या कंपनीचे शेअर मार्केटमध्ये सहसा विकायला काढत नाहीत. याचा अर्थ असा की रिलायन्सच फ्री फ्लोट मार्केट कॅप आहे टोटल ७,३४,७६० करोंड आणि अंबानी फॅमिलीकडे असलेले शेअर्स जर मोजले तर रिलायन्सच मार्केट कॅप होत १५,१८, ९७५ करोंड एवढ होत. एक महत्वाची गोस्त लक्षात घ्या की जस एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत वाढते त्या कंपनीचं मार्केट कॅप वाढत आणि जर शेअरची किंमत कमी झाली की मार्केट कॅप कमी होते.
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇
शेअर मार्केट काय आहे? | Share Market Information in Marathi
Career in Share Market: शेअर मार्केटमध्ये कोणते करियर ऑप्शन आहेत?
Market Capitalization: – कंपनीच बाजार भांडवल म्हणजे काय?
फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)
12 thoughts on “Market Capitalization: कंपनीच बाजार भांडवल म्हणजे काय?”