आर्थिक स्वातंत्र्याबद्दलचे 5 गैरसमज | Financial Independence Retire Early (FIRE) in Marathi

Rate this post

Financial Independence Retire Early (FIRE) in Marathi: आपल्या प्रत्येकाला लाइफमध्ये आर्थिक स्वातंत्र्य हव आहे. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे एक असा दिवस

  • जेव्हा तुमच्याकडे पुरेसा पैसा असेल
  • जेव्हा तुम्ही 9-5 जॉबच्या जाळ्यातून बाहेर पडाल
  • जेव्हा तुम्ही फ्युचरच्या खर्चाची चिंता करणे सोडून द्याल

आजकाल मी ट्वीटर, पॉडकास्ट आणि इतर सोशल मीडियावर FIRE बद्दल खूप एकत आहे. FIRE म्हणजे Financial Independence Retire Early च आगेशी काही संबंध नाही. (आपल्याला कुठे आग लावायची नाहीये)

आता हे FIRE (Financial Independence Retire Early) नक्की आहे तरी काय?

FIRE  किंवा Financial Independence Retire Early याचा अर्थ असा की लाइफमध्ये अशा लेवलला पोचणे जिथे पैसे कमविण्यासाठी कोणताही काम न करता तुमचा खर्च आणि आर्थिक उद्दीष्टे भागविण्यासाठी पुरेसे पैसे तुमच्याकडे असतील.

जर नीट विचार केला तर  FIRE (Financial Independence Retire Early) ही लेवल तुम्ही रिटायरमेंट वयाच्या  म्हणजेच वयाच्या 58-60 वर्षापूर्वी आधीच गाठली पाहिजे.

FIRE (Financial Independence Retire Early) या लेवलला पोचणे म्हणजे तुमच्या फ्युचरसाठी आर्थिक सुरक्षितता मिळवणे. जिथे हव तिथे फिरायला जाणे अगदी खर्चाची कसलिच चिंता न करता. तसेच तुम्हाला जे मोठे खर्च नेहमीच करायचे होते त्या गोष्टींवर मनसोक्त खर्च करणे आणि भावी पिढ्यांसाठी वारसा सोडणे.

FIRE (Financial Independence Retire Early) या लेवलला पोचल्यानंतर तुम्हाला एक Active जॉब करायची गरज नाही जिथे तुम्ही आठवड्याचे 6 दिवस काम करता.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)

गैरसमज नंबर 1: – FIRE (Financial Independence Retire Early) म्हणजेच एक ठराविक आकडा किंवा रक्कम 

अनेक जन FIRE म्हणजे एक ठराविक आकडा गाठणे हेच समजतात जस की 1 करोड, 2 करोड किंवा 5 करोड.

जर तुम्ही FIRE ही कन्सेप्ट नुकतीच एकली असेल तर तुम्ही Financially Free तेव्हाच होता जेव्हा.

  • तुमच्या वार्षिक खर्चाच्या 30 पट रक्कम तुमच्याकडे जमा असेल (वय 60 वर्षे)
  • तुमच्या वार्षिक खर्चाच्या 35 ते 40 पट रक्कम तुमच्याकडे जमा असेल (वय 50 वर्षे)
  • तुमच्या वार्षिक खर्चाच्या 45 ते 50 पट रक्कम तुमच्याकडे जमा असेल (वय 40 वर्षे)

आता हे सगळे एक  हाय लेवलचे नंबर्स झाले. पण फक्त एक ठराविक नंबर माइंडमध्ये पक्का करून त्यामागे धावणे चालणार नाही. याच कारण अस की, तुम्ही आता एकटे आहात, लग्न नाही झालाय, मूल बाळ नाहीये, जास्त जबाबदऱ्या नाहीयेत.अशा वेळी तुमचे खर्च हे नेहमीच कमी असणार. त्यामुळे जर तुम्ही आजच्या हिशोबाने तुमच्या FIRE नंबरच कॅलक्युलेशन केलत तर तुम्हाला फ्युचरमध्ये हे पैसे कमी पडू शकतात. म्हणून सगळ्यात आधी तुमचे खर्च बघा आणि जसे खर्च वाढत जातील तशी तुमची FIRE ची रक्कम वाढली पाहिजे.

त्यामुळे तुमच्या FIRE नंबरसाठी तुम्ही हवा तो रुल वापर जसा की खर्चाच्या 30 पट, 40 पट किंवा 50 पट रक्कम जमा करणे पण हे लक्षात घ्या की, जसे तुमचे खर्च वाढतील हा नंबर पण वाढवा. FIRE नंबर म्हणजे अनेकांना वाटत की बस एक ठराविक नंबर पूर्ण केला, तेवढी रक्कम जमा केली की झालो आम्ही Financially Free.

Financially Free होण्यासाठी एक ठराविक नंबर गाठण्याची गरज नाही तर तुम्हाला तुमच्या खर्चाच्या 30 ते 40 पट रक्कम जमा करायची आहे हे तुमच Goal असल पाहिजे (जस खर्च वाढतील ही रक्कम पण वाढेल)

गैरसमज नंबर 2: – एकदा का FIRE (Financial Independence Retire Early) ची लेवल गाठली की लाइफ सेट आहे.

आपल्या प्रत्येकाला हेच वाटत असत की एवढे एवढे पैसे माझ्याकडे आले ना की मग फक्त आराम. लाइफ एवढी पण सोपी नाहीये. FIRE या लेवलला पोचण्याचा फायदे तर नक्कीच आहेत जसे की तुम्हाला सतत पैसे कमवायचे याचा विचार करावा लागणार नाही.

तुमची लाइफ खूप सोपी होईल जर तुमच्या बँक अकाऊंटमध्ये पुरेसा पैसा असेल. पण एक चिंता म्हणा की काम तुम्हाला सतत कराव लागणार ते म्हणजे तुम्ही जमा केलेला पैसा चांगल्या रिटर्न नियमित कसा वाढवायचा. तसेच एवढा पैसा मला लाइफ टाइमसाठी पुरेल याची चिंता सतत तुमच्या मागे असेल.

आणि हो तुमची FIRE ची रक्कम ठरवताना नेहमीच जास्त पैसे घेऊन कॅलक्युलेशन करा. समजा तुम्हाला तुमच्या वार्षिक खर्चानुसार  1 करोंड एवढ्या FIRE रक्कमची गरज आहे तर नेहमीच 20-30 लाख रुपये एक्स्ट्रा घेऊन कॅलक्युलेशन करा. आता अस करण्याच कारण अस की महागाईचा रेट हा सतत बदलत असतो.  आणि त्या रेटच्या हिशोबाने नेहमी कॅलक्युलेशन केले पाहिजे.

अजून एक कारण म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओवर मिळणारा रिटर्न हा दर वर्षी सेम नसेल. कधी कमी तर कधी जास्त असू शकतो.  तसेच एखाद अस काम येऊ शकते जिथे तुम्हाला मोठी रक्कम द्यावी लागेल. नेहमी लक्षात ठेवा की पैसे जास्त जमा झाले तरी चालतील, एक्स्ट्रा पैसे असणे यात काहीच नुकसान बाही पण कमी असतील तर मात्र गोंधल होतो.

गैरसमज नंबर 3: – सगळेजण पैसे कमवत आहेत आणि मीच मागे राहिलोय. 

आजकाल सोशल मीडियावर सतत कोणती किती पैसे कमविले किंवा कसे कमविले, अगदी लहान वयात आर्थिकरीत्या स्वातंत्र्य झाल्याची चर्चा चालू आहे. यूट्यूब, इनस्टा किंवा पॉडकास्ट असुदेत. येऊन जाऊन मुद्दा हाच असतो की पैसे कमवायचे कसे आणि किती? त्यापैकी काही लोक असतात जे या FIRE लेवलला पूर्ण करुन झालेत आणि काही आहेत जे अगदी जवळ आहेत. आणि हे सगळ बघून आपल्या प्रत्येकाला कधी ना कधी अस वाटत की यार मीच मागे राहिलोय.

पण एक कटू सत्य सांगतो, जर तुम्ही एक साधा 9-5 जॉब करत आहात आणि पैसे कामविण्याचा हा तुमचा एकमेव मार्ग आहे तर FIRE या लेवलला पोचण्यासाठी वेळ तर लागेलच ना? एकदम 30 वयात तुम्ही Financially Free नाही झालात तरी 40s किंवा 50s मध्ये नक्कीच व्हाल. अगदी 60s मध्ये Financially Free होण्यापेक्षा तुमच्या 40s किंवा 50s मध्ये झालेल कधीही चांगल नाही का?

अजून एक गोष्ट म्हणजे, बँकमध्ये 1 किंवा 2 करोंड जमा झाले म्हणजे मी FIRE या लेवलला पोचलो असतो होत नाही. जरी 1 करोंड जमा केलेत तरी त्यांना वाढविणे याकडे पण सतत लक्ष द्याव लागत. FIRE (Financial Independence Retire Early) ही लेवल गाठणे खूप कठीण आहे पण आपण प्रत्येकाने एक प्रामाणिक प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. कारण या कामात नुकसान काहीच नसेल. एकतर तुम्ही पूर्णपणे Financially Free व्हाल किंवा जेवढे पैसे आता तुमच्याकडे आहेत त्यापेक्षा जास्तच जमा कराल.

गैरसमज नंबर 4: – FIRE (Financial Independence Retire Early) म्हणजे पुन्हा लाइफमध्ये कामच नाही करायच. 

FIRE म्हणजे Financial Independence Retire Early.

1) Financial Independence म्हणजे आर्थिकरीत्या सक्षम किंवा स्वावलंबी बनणे.

2) Retire Early म्हणजे लवकर रिटायर होणे.

पण अनेक जण फक्त दुसऱ्या पार्टवर फोकस करतात ते म्हणजे लवकरात लवकर रिटायर कस व्हायच. पण जरा विचार करा की रिटायर झाल्यावर तुम्ही करणार काय? मुकेश अंबानी यांना काम करायची गरज आहे का? मला तर नाही वाटत पण तरीही ते ऑफिसला जातात. हो की नाही? अगदी तसंच आपण बोलतो की या जॉब लाइफमधून फ्री होवून रिटायर व्हायच. पण रिटायर झाल्यावर काय करायच हे पहिल क्लियर करा.

नुसत दिवसभर इनस्टावर रील बघू, यूट्यूबवर तारक मेहता का उलट चश्मा किंवा महाराष्ट्राची हास्यजत्रा बघून दिवस काढणे सुरुवातीला चांगल वाटेल पण नंतर प्रचंड कंटाळा येणार एवढ नक्की. कारण माणूस हा मुळात बनला आहे Active राहायला आणि कोणत्या ना कोणत्या कामात Busy राहायला.  नुसत एका जागी बसून फक्त 2 गोष्टी होतात एक म्हणजे वजन वाढत आणि दुसर म्हणजे चिडचीड होते.

मग प्रश्न आता असा आहे की आपण FIRE लेवल गाठून रिटायर व्हायच की नाही? रिटायर व्हा. नक्की व्हा. पण त्यानंतर तुमच्यासाठी एखाद अस काम किंवा हॉबी तयार ठेवा ज्यावर तुम्ही काम कराल तेही अगदी तुमच्या मर्जिने आणि तुमच्या टाइमनुसार.

गैरसमज नंबर 5: – FIRE (Financial Independence Retire Early) म्हणजे कंजूस बना आणि खर्च कमी करा. 

FIRE बद्दल सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे की तुम्हाला कंजूस बनाव लागेल आणि शक्य तितके खर्च टाळावे लागतील. अनेकांना अस वाटत की सुरुवातीच्या काही वर्षात अगदी काटकसर केली आणि त्या पैशाची बचत केली की आपण लवकर आर्थिकरीत्या स्वातंत्र्य मिळवू शकतो. पण जरा विचार करा, तुम्ही काटकसर करुन करून कीती करणार आणि कुठे कुठे पैसे वाचवणार? खर्च कमी करण्याला पण एक लिमिट आहे.

फॉर एक्झॅम्पल, मला चहा प्यायला (अरे सॉरी चहा नाही चाय) प्यायला प्रचंड आवडते आणि जर सतत मी असा विचार केला की हा चायवर खर्च होणारे पैसे वाचवतो तर लाइफ पूर्ण मज्जा कमी होईल. आणि तुमच्यासोबत अस होत असेल ना की तुम्हाला एखादी गोष्ट आवडते, त्यावर खर्च करायला आवडतो जस की फूड, शॉपिंग, travelling इत्यादि. तर यावर खर्च करा पण जाणीवपूर्वक करा.  उगाच अंधाधुंद पैसे उडवू नका.

फक्त एकच फोकस Financial Freedom 

या आर्टिकलच मेन गोल हेच होत की आपल्या माइंडमधील Financial Freedom बद्दल असेलेल मोठे गैरसमज दुर करणे. आणि अस करूनच आपण सगळेच एका योग्य माइंडसेटने Financial Freedom हे गोल गाठण्याचा प्रयत्न करू.

नको तिथे खर्च नाही करायच तुम्हाला पण तुमचा फोकस नेहमी तुमची इन्कम वाढविण्यावर जास्त ठेवा.  आणि तुमचे पैसे नेहमी अशा Assets मध्ये इनवेस्ट करा जिथे महागाईपेक्षा जास्त रिटर्न मिळेल. (कमीत कमी 5-6% तरी जास्त जर महागाई 7% असेल)

मी माझे विचार तुमच्यासोबत शेअर केलेत. तुम्ही तुमचे विचार Comments मध्ये शेअर करा.

Happy Investing!

काही महत्वाच्या पोस्ट नक्की वाचा. 

Personal Finance चे 5 Principles (न बोलले जाणारे) 

Personal Finance नक्की आहे तरी काय? 

आर्थिक स्वातंत्र्याबद्दलचे 5 गैरसमज | FIRE 

2 thoughts on “आर्थिक स्वातंत्र्याबद्दलचे 5 गैरसमज | Financial Independence Retire Early (FIRE) in Marathi”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi