SEBI Mutual Fund Stress Test: टॉप 5 स्मॉल कॅप म्यूचुअल फंडचे रिजल्ट्स काय? जाणून घ्या

Rate this post

SEBI Mutual Fund Stress Test:  SEBI (Securities and Exchange Board of India) च्या निर्देशाला प्रतिसाद म्हणून, AMFI (Association of Mutual Funds in India) ने सर्व म्यूचुअल फंड कंपन्याना  त्यांच्या स्मॉल कॅप फंडसाठी स्ट्रैस टेस्ट (Stress Test) घेण्याचे निर्देश दिले आहेत. मार्केटमध्ये स्मॉल कॅप फंडमध्ये वाढती अस्थिरता आणि स्मॉल कॅप म्यूचुअल फंडमध्ये सतत मोठ्या प्रमाणात येणारा पैसा यांविषयीच्या चिंतेमुळे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

SEBI ने म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना मार्केटमधील घसरणीशी संबंधित जोखमींबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी ही स्ट्रैस टेस्ट (Stress Test)  घेण्याचे काम AMFI ला दिले आहे. समजा मार्केटमधील गुंतवणूकदार त्यांच्या म्यूचुअल फंड होल्डिंग्स विकायला निघाले तर म्यूचुअल फंड कंपन्या किती वेळात गुंतवणूकदारांचे पैसे रिटर्न करू शकतात  हे जाणून घेणे या टेस्टचे उद्दिष्ट  होते.

सर्व म्यूचुअल फंड कंपन्याना 15 मार्चपर्यंत त्यांच्या संबंधित वेबसाइट्सवर स्ट्रैस टेस्ट (Stress Test) रिजल्ट प्रकाशित करणे आवश्यक आहे. शिवाय, हे रिजल्ट दर दोन आठवड्यांनी अपडेट केले जावेत जेणेकरून गुंतवणूकदारांना स्मॉल कॅप फंडांची Liquidity यासंबंधी नियमितपणे माहिती मिळू शकेल.

5 वर्षांच्या रिटर्नवर आधारित टॉप 5 स्मॉल-कॅप फंडांचे रिजल्ट पुढीलप्रमाणे आहेत, (की ते किती लगेच म्यूचुअल फंडमधील स्टॉक्स विकू शकतात आणि गुंतवणूकदारांना पैसे रिटर्न करू शकतात) 

Quant Small Cap Mutual Fund:

  • या फंडचा 50% स्मॉल कॅप पोर्टफोलियो Liquidate करण्यासाठी (म्हणजे पूर्णपणे विकण्यासाठी) 22 दिवस लागतील.
  • या फंडचा 25% स्मॉल कॅप पोर्टफोलियो Liquidate करण्यासाठी (म्हणजे पूर्णपणे विकण्यासाठी) 11 दिवस लागतील.

Bank of India Small Cap Mutual Fund:

  • या फंडचा 50% स्मॉल कॅप पोर्टफोलियो Liquidate करण्यासाठी (म्हणजे पूर्णपणे विकण्यासाठी) 2 दिवस लागतील.
  • या फंडचा 25% स्मॉल कॅप पोर्टफोलियो Liquidate करण्यासाठी (म्हणजे पूर्णपणे विकण्यासाठी) 1 दिवस लागतील.

Nippon India Small Cap Mutual Fund:

  • या फंडचा 50% स्मॉल कॅप पोर्टफोलियो Liquidate करण्यासाठी (म्हणजे पूर्णपणे विकण्यासाठी) 27 दिवस लागतील.
  • या फंडचा 25% स्मॉल कॅप पोर्टफोलियो Liquidate करण्यासाठी (म्हणजे पूर्णपणे विकण्यासाठी) 13 दिवस लागतील.

Edelweiss Small Cap Mutual Fund:

  • या फंडचा 50% स्मॉल कॅप पोर्टफोलियो Liquidate करण्यासाठी (म्हणजे पूर्णपणे विकण्यासाठी) 3 दिवस लागतील.
  • या फंडचा 25% स्मॉल कॅप पोर्टफोलियो Liquidate करण्यासाठी (म्हणजे पूर्णपणे विकण्यासाठी) 2 दिवस लागतील.

Axis Small Cap Mutual Fund:

  • या फंडचा 50% स्मॉल कॅप पोर्टफोलियो Liquidate करण्यासाठी (म्हणजे पूर्णपणे विकण्यासाठी) 28 दिवस लागतील.
  • या फंडचा 25% स्मॉल कॅप पोर्टफोलियो Liquidate करण्यासाठी (म्हणजे पूर्णपणे विकण्यासाठी) 14 दिवस लागतील.
आता या सगळ्या माहितीचा तुम्हाला काय फायदा होईल? 

जेव्हा तुम्ही एखाद्या म्यूचुअल फंडमध्ये पैसे इन्वेस्ट करणार आणि जेव्हा तुम्हाला तुम्हाला गरज लागेल तेव्हा ते पैसे तुम्हाला सहज आणि लगेच काढता आले पाहिजेत.

जर म्यूचुअल फंड कंपनीला लगेच त्याच्या म्यूचुअल फंडमधील स्टॉक्स विकता नाही आले तर तुम्हाला पैसे कुठून देणार. म्हणून कोणत्याही म्यूचुअल फंडमध्ये पैसे इन्वेस्ट करताना त्या म्यूचुअल फंडचा पोर्टफोलियो Liquidate करण्यासाठी (म्हणजे पूर्णपणे विकण्यासाठी) किती दिवस लागतात हे चेक करा.

SEBI च्या नियमानुसार प्रत्येक म्यूचुअल फंड कंपनीच्या वेबसाइट दर 2 आठवड्यांने ही स्ट्रैस टेस्ट (Stress Test) ची माहिती अपडेट केली जाईल. SEBI ने ही स्ट्रैस टेस्ट यासाठी आणली आहे कारण जेव्हा मार्केट एकदम डाऊन होत तेव्हा अनेक लोक न विचार करता पैसे काढतात. अशा वेळी त्यांना त्यांचे पैसे मिळाले पाहिजेत.

पोस्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा. काही Feedback असेल तर कमेन्टमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या पोस्टमध्ये!

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi