25 पैकी फक्त 7 Large Cap Funds नी इंडेक्सपेक्षा जास्त रिटर्न दिलाय! (यामध्ये SIP करू की नको)

Rate this post

म्यूचुअल फंड इंडस्ट्रीमध्ये टोटल 25 Large Cap Funds आहेत. त्यापैकी फक्त 7 Funds नी गेल्या 5 वर्षात इंडेक्सपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे.

आता प्रश्न असा येतो की लार्ज कॅप फंडमध्ये इन्वेस्ट कराव की नाही? आणि जर आधीपासून इन्वेस्ट केल असेल तर या फंडमधून बाहेर पडाव का?

हेच डीटेलमध्ये समजून घेऊत. पण त्या आधी

Large Cap Fund काय आहे? 

लार्ज कॅप फंड म्हणजे असा फंड जो मार्केटमधील टॉप 100 कंपन्यांमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो किंवा ज्या कंपन्यांचा मार्केट कॅप २०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो. 

म्युच्युअल फंड कंपन्या या फंड्सना खूप वेगवेगळी नाव देतात. काही कंपन्या सरळ लार्ज कॅप फंड बोलतात तर काही कंपन्या Bluechip फंड बोलतात तर काही कंपन्या टॉप 100 फंड बोलतात. पण याचा अर्थ एकच असतो की हे Funds लार्ज कॅप कॅटेगरीमधील आहेत. 

उदाहरण: Nippon India Large Cap Fund, ICICI Prudential Bluechip Fund, HDFC Top 100 Fund

Benchmark Index काय आहे? 

तुम्ही जेव्हा  एखादा लार्ज कॅप फंड SIP चालू करण्यासाठी निवडता सगळ्यात आधी तो फंड कोणत्या इंडेक्सला बेंचमार्क म्हणून घेत आहे हे बघा. 

आता हे बेंचमार्क काय? 

एखादा फंड कसा परफॉर्म करतोय, किती रिटर्न देतोय हे बघण्यासाठी त्याला एका ठराविक इंडेक्ससोबत कम्पेअर केल जात त्यालाच बेंचमार्क इंडेक्स बोलतात. 

उदाहरणार्थ: 

ICICI Prudential Bluechip Fund या फंडची बेंचमार्क इंडेक्स NIFTY 100 Total Return Index ही आहे. आता या फंडला या इंडेक्स एवढा किंवा यापेक्षा जास्त रिटर्न आणून द्यायचा आहे. तरच त्यामध्ये इन्वेस्ट करण्यात काही अर्थ आहे. नाहीतर उगाच फंड मॅनेजरला फी का द्यायची? 

लार्ज कॅप फंडमध्ये इन्वेस्ट कराव की नाही? 

तुम्ही स्वताला विचारा की तुम्ही लार्ज कॅप फंड किती वर्षासाठी घेतला आहे?

जर उत्तर असेल.  “मी हा फंड लॉन्ग टर्मसाठी घेतला आहे म्हणजे कमीत कमी 5 वर्षासाठी घेतला आहे” तर आता या 5 वर्षात तुम्हाला किती रिटर्नची अपेक्षा आहे?

जर तुम्ही एकदम भारी भरकम रिटर्नची अपेक्षा करत आहात तर तुम्ही नक्कीच Disappoint होणार आहात कारण लार्ज कॅप कॅटेगरीमधून इंडेक्सपेक्षा जास्त रिटर्न मिळणे खूप कठीण आहे.

जर तुम्ही खूपच लकी आहात आणि तुम्ही एक चांगला फंड निवडलात ज्याचा फंड मॅनेजर खरंच चांगला आहे तर तुम्हाला इंडेक्सपेक्षा जास्त रिटर्न मिळेल. पण तरीही तो फंड मॅनेजर सतत, प्रत्येक वर्षी इंडेक्सपेक्षा जास्त रिटर्न देईल हे शक्य नाही.

कारण तुम्ही नीट विचार करा, लार्ज कॅप कंपन्या या टॉप कंपन्या असतात आणि त्यांची ग्रोथ आता हळू हळू होते.

Cafemutual च्या या 5 वर्षाच्या म्यूचुअल फंड परफॉर्मेंस रीपोर्टनुसार ज्या फंडसनी इंडेक्सपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे तो जास्त रिटर्न  फक्त 0.10% आणि 1.11% एवढा आहे. तुम्ही खाली दिलेल्या टेबलमध्ये बघू शकता.

आता यावर उपाय काय? 

उपाय आहे इंडेक्स फंड.

कारण इंडेक्स फंड ठराविक बेंचमार्कला कॉपी करतात आणि त्या इंडेक्स एवढा  रिटर्न आणून देतात. इथे फंड मॅनेजरची फी खूप असते कारण Expense रेशियो अगदी कमी असतो.

पण लार्ज कॅप फंडमध्ये Expense रेशियो द्यावा लागतो कारण फंड मॅनेजर रिसर्च करून कंपन्या निवडतो. पण फी देण्यात तेव्हाच अर्थ आहे जेव्हा तो फंड मॅनेजर  तुम्हाला रिटर्न जास्त आणून देईल.

लॉजिक खूप स्पष्ट आहे, जर तुम्हाला शेअर मार्केटमधील टॉप 100 कंपन्यांपैकी काही कंपन्यांमध्ये पैसे इन्वेस्ट करायचे असतील तर सरळ एखादा इंडेक्स फंड निवडा. 

फी पण वाचेल आणि रिटर्नपण इंडेक्स एवढा मिळेल.

आणि हो आज तुम्ही एखादा लार्ज कॅप फंड घ्या त्याचा Expense Ratio बघा आणि एखादा इंडेक्स फंड घ्या त्याचा Expense Ratio बघा आणि दोन्ही फंडचे 5 वर्षाचा रिटर्न बघा. तुम्हाला नक्कीच फरक दिसेल.

आणि म्हणून इंडेक्स फंड सही है!

Scheme Name
Benchmark
Return 5 Year (%) Regular Return 5 Year (%) Benchmark Alpha Daily AUM (Cr.)
ICICI Prudential Bluechip Fund NIFTY 100 Total Return Index 16.99 15.88 1.11 47,926.62
Baroda BNP Paribas Large Cap Fund NIFTY 100 Total Return Index 16.76 15.88 0.88 1,693.84
Nippon India Large Cap Fund S&P BSE 100 Total Return Index 17.00 16.47 0.52 20,198.77
Canara Robeco Bluechip Equity Fund S&P BSE 100 Total Return Index 16.92 16.47 0.45 11,640.42
Kotak Bluechip Fund NIFTY 100 Total Return Index 16.31 15.88 0.44 7,330.04
HDFC Top 100 Fund NIFTY 100 Total Return Index 16.10 15.88 0.23 30,266.92
Edelweiss Large Cap Fund NIFTY 100 Total Return Index 15.98 15.88 0.10 684.81
Tata Large Cap Fund NIFTY 100 Total Return Index 15.71 15.88 -0.17 1,853.51
Invesco India Largecap Fund NIFTY 100 Total Return Index 15.68 15.88 -0.20 909.05
SBI Bluechip Fund S&P BSE 100 Total Return Index 15.96 16.47 -0.52 43,502.60
Sundaram Large Cap Fund NIFTY 100 Total Return Index 15.26 15.88 -0.61 3,340.30
HSBC Large Cap Fund NIFTY 100 Total Return Index 15.08 15.88 -0.80 1,679.28
Aditya Birla Sun Life Frontline Equity Fund NIFTY 100 Total Return Index 14.92 15.88 -0.95 25,904.87
JM Large Cap Fund S&P BSE 100 Total Return Index 15.39 16.47 -1.08 73.58
LIC MF Large Cap Fund NIFTY 100 Total Return Index 14.78 15.88 -1.10 1,380.53
Bandhan Large Cap Fund S&P BSE 100 Total Return Index 15.31 16.47 -1.16 1,299.27
Mirae Asset Large Cap Fund NIFTY 100 Total Return Index 14.53 15.88 -1.34 37,989.14
UTI Large Cap Fund S&P BSE 100 Total Return Index 15.09 16.47 -1.38 12,231.09
Union Largecap Fund S&P BSE 100 Total Return Index 15.07 16.47 -1.40 280.80
PGIM India Large Cap Fund NIFTY 100 Total Return Index 13.78 15.88 -2.09 538.40
Franklin India Bluechip Fund NIFTY 100 Total Return Index 13.58 15.88 -2.30 7,465.54
Axis Bluechip Fund S&P BSE 100 Total Return Index 13.68 16.47 -2.80 33,173.00
DSP Top 100 Equity Fund S&P BSE 100 Total Return Index 13.65 16.47 -2.83 3,340.40
Groww Large Cap Fund NIFTY 100 Total Return Index 12.69 15.88 -3.18 113.50
Taurus Largecap Equity Fund S&P BSE 100 Total Return Index 12.88 16.47 -3.59 40.69

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Market Capitalization: – कंपनीच बाजार भांडवल म्हणजे काय? 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance

2 thoughts on “25 पैकी फक्त 7 Large Cap Funds नी इंडेक्सपेक्षा जास्त रिटर्न दिलाय! (यामध्ये SIP करू की नको)”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi