म्यूचुअल फंड युनिट्सवर लोन काढता येत का? | Loans Against Mutual Funds in Marathi

Rate this post

Loans Against Mutual Funds in Marathi: अचानक कधी कोणता खर्च येईल हे कधी सांगता येत नाही. घर घ्यायच आहे, लग्नाचा खर्च आहे किंवा एखादी मेडिकल एमर्जन्सि. अशा अनेक परिस्थितीत इच्छा नसताना पण अनेकदा सगळी सेविंग आणि इन्वेस्ट केलेले पैसे मोडावे लागतात. आणि ते देखील पुरे नसतील तर दूसरा मार्ग म्हणजे लोन घेणे.

पण बँकमधून लोन घ्यायच म्हटल की बँकला काहीतरी द्याव लागेल ना. बहुतेक लोकांना प्रॉपर्टी किंवा गोल्ड गहाण ठेवून लोन घ्यायच माहीत आहे पण तुम्ही म्यूचुअल फंड यूनिट्सवर सुद्धा लोन घेऊ शकता.

आणि ते कस घ्यायच? त्याबद्दल काही महत्वाचे पॉईंट्स आपण आजच्या पोस्टमध्ये समजून घेणार आहोत.

लोनची लिमिट किती असते? 

तुम्हाला म्यूचुअल फंड युनिट्सवर किती लोन मिळेल हे तुम्ही कोणत्या म्यूचुअल फंड स्कीममध्ये पैसे इन्वेस्ट केले आहेत यावरून ठरवल जात आणि तुम्ही नक्की कोणत्या बँक किंवा फायनॅन्स कंपनीकडून लोन घेणार आहात.

उदाहरण घ्यायच झाल तर, HDFC बँक आणि ICICI बँक जर तुमचा फंड इक्विटि कॅटेगरीचा असेल तर NAV च्या 50% वॅल्यूचा लोन देतात. तसेच फंड Debt कॅटेगरीचा असेल तर त्याच्या जवळजवळ 80% वॅल्यूचा लोन घेता येतो.

लोन किती मिळणार याची लिमिट ही प्रत्येक बँकसाठी वेगळी असेल त्यामुळे लोन घेण्याआधी तुम्हाला हे चेक कराव लागेल.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)

सगळ्याच म्यूचुअल फंडवर लोन मिळत नाही

अनेक बँका फक्त काही ठराविक म्यूचुअल फंड स्कीम्सवर लोन देतात. आता ते  फंडस नेमके कोणते  हे देखील तुम्ही ज्या बँकमध्ये लोन घ्यायला जाणार तिथे चेक कराव लागेल.

उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) फक्त SBI म्यूचुअल फंडचा एखादा म्यूचुअल फंड असेल तरच लोन देते. बाकीच्या म्यूचुअल फंड कंपनीचा फंड असेल तर लोन देत नाही. याउलट HDFC बँक HDFC म्यूचुअल फंड व्यतिरिक्त एखादी दुसरी म्यूचुअल फंड कंपनी असले तरी लोन देते.

जास्तीत जास्त किती लोन मिळेल? 

विविध बँकानी आपली आपली लिमिट सेट करून ठेवली आहे. SBI कमीत कमी 25,000 च लोन देते. तसेच HDFC Bank कमीत कमी 50,000 च लोन देते.

तसेच SBI जर इक्विटि फंड असेल तर 20 लाखाच आणि debt फंड असेल तर 5 करोडच जास्तीत जास्त लोन देते. आणि HDFC बँक इक्विटि म्यूचुअल फंड असले तर 20 लाख आणि Debt फंड असेल तर 1 करोडच लोन देते.

जर तुम्ही हे लोन बँकमधून न घेता एखाद्या फायनॅन्स कंपनीमधून घेतलत तर या लोनची लिमिट वाढते. उदाहरणार्थ आदित्य बिरला फायनॅन्स कमीत कमी 25 लाख आणि जास्तीत जास्त 10 करोडच लोन देते.

पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डपेक्षा स्वस्त 

सगळ्यात मोठा फायदा म्यूचुअल फंडवर लोन घेण्याचा हा आहे की इथे व्याज कमी द्यावा लागतो. तुम्ही पर्सनल लोन आणि क्रेडीड कार्ड लोनशी म्यूचुअल फंडवर मिळणाऱ्या लोनची तुलना केलीत तर इथे फायदा जास्त आहे. या लोनवर इंटरेस्ट रेट कमी असतो कारण तुम्ही तुमचे म्यूचुअल फंड युनिट्स गहाण ठेवत असता.

उदाहरणार्थ, तुम्ही जेव्हा म्यूचुअल फंडवर लोन घेता त्याचा इंटरेस्ट रेट हा 8% – 10% या दरम्यान असतो. आता यामध्ये थोडफार बदल असेल कारण बँक किंवा फायनॅन्स कंपनी बदलली की रेट थोडा बदलतो.

याउलट, पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड लोनमध्ये बँक किंवा फायनॅन्स कंपनी खूप जास्त रिस्क घेत असते. कारण लोन घेणाऱ्या व्यक्तीची काही वस्तु त्यांच्याकडे नसते. आणि म्हणून अशा प्रकारच्या लोनमध्ये इंटरेस्ट रेट नेहमीच जास्त घेतला जातो. (खूपच जास्त)

म्यूचुअल फंडसाठी बेस्ट App 👉 Groww

लोन घेतल तरी म्यूचुअल फंड युनिट्सवर इंटरेस्ट मिळत राहतो

जेव्हा तुम्ही तुमच्या म्यूचुअल फंड युनिट्सवर लोन घेता तेव्हा ते एका बँक किंवा फायनॅन्स कंपनीकडे फक्त एक सेक्युर्टी म्हणून असतात. पण त्या युनिट्सवर तुम्हाला रिटर्न मिळत असतो.

जर तुम्ही लोनचे पैसे नाही भरलेत तर ती बँक किंवा फायनॅन्स कंपनी ते युनिट्स विकून त्यांचे पैसे वसूल करते.

आता याचा फायदा काय होतो, एकतर तुम्हाला लोन मिळत, त्यामुळे युनिट्स विकावे लागत नाहीत. दुसर म्हणजे त्या युनिट्सवर रिटर्न मिळतो राहतो. (एका दगडात दोन पक्षी म्हणजे दोन काम होवून जातात)

तुम्ही ऑनलाइन अप्लाय करू शकता

आजकाल टेक्नॉलजीमुळे काय करता नाही येत. सगळ सोप झाल आहे.

मोठ मोठ्या बँका वेबसाइटच्या माध्यमातून लोन घेण्याची प्रोसेस उपलब्ध करून देत आहेत. तुम्हाला फक्त तुमचे म्यूचुअल फंडस युनिट्स ऑनलाइन Pledge करायचे आहेत. बँक तुम्हाला त्यावर Overdraft लिमिट देते. (Overdraft लिमिट म्हणजे जितके पैसे अकाऊंटमध्ये आहेत त्यापेक्षा जास्त पैसे काढण्याची सोय)

समजा तुम्ही म्यूचुअल फंड्स युनिट्स विकून लोन घेतलत आणि त्यावर तुम्ही 3 लाख रुपयाची लिमिट मिळाली. तर तुमच्या बँक अकाऊंटमध्ये जरी 25, 000 रुपये असले तरी तुम्ही 3 लाख Overdraft + तुमचे 25,000 असे टोटल 3,25,000 काढू शकता.

Conclusion 

जर तुम्ही पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड लोन घेणार आहात तर त्यापेक्षा म्यूचुअल फंडवर लोन घेणे कधीही चांगल कारण इथे इंटरेस्ट रेट कमी द्यावा लागतो. पण म्यूचुअल फंड युनिट्सवर लोन घेताना रक्कम मोठी असेल तर घ्या. आणि ते लवकर कसा फेडता येईल ते बघा.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 तुम्ही म्यूचुअल फंडमध्ये इन्वेस्ट करताना या चुका करताय का? | 5 Mutual Fund Mistakes in Marathi (marathifinance.net)

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi