स्मॉल कॅप फंड काय आहे? फायदे आणि तोटे | Small Cap Fund in Marathi

Rate this post

Small Cap Fund in Marathi: स्मॉल कॅप फंडस् असे फंडस् असतात जे मार्केटमधील टॉप 250 कंपन्यानंतर येणाऱ्या कंपन्यांमध्ये पैसे Invest करतात. लार्ज कॅप फंड आणि इंडेक्स फंड किंवा  इतर प्रकारच्या म्युच्युअल फंडांपेक्षा स्मॉल कॅप फंड अधिक Risky मानले जातात.

कारण मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत स्मॉल कॅप कंपन्यांना आर्थिक अस्थिरता  येण्याची शक्यता जास्त असते. पण, स्मॉल कॅप फंडमध्ये इतर प्रकारच्या फंडांच्या तुलनेत जास्त रिटर्न देण्याची क्षमता असते.

आजच्या पोस्टमध्ये आपण स्मॉल कॅप फंड काय आहे?  फायदे आणि तोटे, तुम्ही यामध्ये पैसे Invest केले पाहिजेत का? यावर अगदी डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. 

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)

 Small Cap Fund म्हणजे काय? 

स्मॉल कॅप आहे म्हणजे असा फंड जो मार्केटमधील स्मॉल Capitalisation म्हणजेच बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांमध्ये पैसे Invest करतो. मार्केटमधील पहिल्या 250 कंपन्या सोडल्या की त्यापुढील कंपन्या स्मॉल कॅपच्या कॅटेगरीमध्ये येतात. सेबीने मार्केटमधील कंपन्यांच विविध कॅटेगरीमध्ये विभाजन केलं आहे.

  • Large Cap Company: – मार्केटची नंबर 1 कंपनी ते 100 वी कंपनी (काही उदाहरणे – Reliance, HDFC Bank, TCS इ.) 
  • Mid Cap Company: – मार्केटमधील 101 वी कंपनी ते 250 वी कंपनी (काही उदाहरणे – HPCL, Adani Power, MRF इ.) 
  • Small Cap Company: – मार्केटमधील 251 वी कंपनी ते पुढील सगळ्या कंपन्या ( काही उदाहरणे – RBL Bank, Adani Enterprises Ltd, Anand Rathi Wealth Ltd इ.) 

Small Cap Fund चे फायदे काय आहेत? 

स्मॉल कॅप फंडमध्ये पैसे Invest करण्याचे खूप सारे फायदे आहेत त्यापैकी काही महत्त्वाचे फायदे पुढीलप्रमाणे

1. मोठ्या प्रमाणात Growth ची क्षमता: स्मॉल कॅप कंपन्या अशा कंपन्या असतात ज्या अगदी सुरुवातीच्या Stage वर असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची पूर्ण क्षमता असते. आणि याचा फायदा Investor ला अगदी भरमसाट रिटर्नच्या माध्यमातून होतो. 

2. मार्केटमधील लपलेल्या कंपन्या: मार्केटमध्ये 7000 पेक्षा जास्त कंपन्या आहेत. आणि यामध्ये अशा काही कंपन्या असतात ज्याबद्दल लोकांना फारशी माहिती नसते. आणि हीच संधी असते त्यामध्ये पैसे Invest करण्याची कारण आता त्यांचे शेअर्स अगदी स्वस्त दरात मिळतात. 

3. जास्त रिटर्नची क्षमता: स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत वेगाने वाढ होण्याची क्षमता असते. कारण  स्मॉल कॅप कंपन्या या नवीन बिझनेस किंवा इंडस्ट्रीमध्ये असतात आणि त्यांची स्पर्धा कमी असते. परिणामी, मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सपेक्षा स्मॉल कॅप शेअर्स जास्त रिटर्न देऊ शकतात.

4. डायव्हर्सिफिकेशन: स्मॉल कॅप फंड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यास मदत करू शकतात. हे खूप महत्वाच आहे कारण यामुळे विविध कंपन्यांमध्ये पैसे इनवेस्ट करून तुमची रिस्क कमी होते.

5. भांडवल वाढीची क्षमता: स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये मोठ्या कंपन्यांपेक्षा अधिक कॅपिटल वाढवण्याची क्षमता असते. कॅपिटल म्हणजे तुम्ही इनवेस्ट केलेले पैसे. जस आधी चर्चा केली, या छोट्या कंपन्या असतात त्यामुळे तुमचे पैसे मोठ्या प्रमाणात वाढतील याची पूर्ण शक्यता असते. 

म्यूचुअल फंडसाठी बेस्ट App 👉 Groww

Small Cap Fund चे तोटे काय आहेत? 

1. रिस्क: मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत स्मॉल कॅप कंपन्यांना आर्थिक अस्थिरता येण्याची शक्यता जास्त असते. कारण या कंपन्या लहान त्यामुळे त्यांच्याकडे आर्थिक संसाधने कमी असतात. 

परिणामी, इतर प्रकारच्या फंडांपेक्षा स्मॉल कॅप भयंकर Risky असतात. जेव्हा मार्केट पडत ना तेव्हा सगळयात जास्त नुकसान इथेच बघायला मिळत. 

2. पैसे काढताना प्रॉब्लेम: मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सपेक्षा स्मॉल कॅप शेअर्सची खरेदी-विक्री करणे अधिक अवघड असते. कारण स्मॉल कॅप शेअर्सचे खरेदीदार आणि विक्रेते कमी असतात.

पण आपल्याला याच जास्त टेंशन घ्यायची गरज नाही कारण तुम्ही स्मॉल कॅप फंडमध्ये पैसे इनवेस्ट केले आहेत जेव्हा तुम्ही पैसे काढणार फंड मॅनेजरला कसही करुन द्यावेच लागतात. 

3. खर्च: स्मॉल कॅप फंडांमध्ये सामान्यत: इतर प्रकारच्या फंडांपेक्षा जास्त फी म्हणजे Expense Ratio असतो. चांगले शेअर्स निवडताना फंड मॅनेजरला खूप रिसर्च करावी लागते. सोबत एखादा शेअर कधी घ्यायचा आणि विकायचा या सगळ्या कामासाठी फंड मॅनेजर फी घेतो. (फुकटमध्ये काम कोण करेल?)

4. कमी रिसर्च: Small Cap कंपन्या मार्केटमध्ये एवढ्या प्रसिध्द नसतात त्यामुळे त्यांच्याविषयी खूप सारी माहिती सहज उपलब्ध नसते जस की प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, Balance Sheet, Revenue इ. या कारणांमुळे स्मॉल कॅप फंडमध्ये Invest करणे खूप Risky असत.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)

Small Cap Fund मध्ये तुम्ही इनवेस्ट केल पाहिजे का?  

अधिक रिटर्न हवेत पण त्या बदल्यात अधिक रिस्क घेण्यास तयार असलेल्या गुंतवणूकदारांसाठी स्मॉल कॅप फंड ही एक चांगला पर्याय आहे.

तसेच ज्या गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणायची आहे आणि विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी स्मॉल कॅप फंड देखील एक चांगली गुंतवणूक आहे. कारण पोर्टफोलिओमध्ये फक्त मोठ्या कंपन्या न राहता काही छोट्या कंपन्यादेखील असतील ज्या पूर्ण पोर्टफोलिओचा रिटर्न वाढवू शकतात. पण, स्मॉल कॅप फंड हा सर्व गुंतवणूकदारांसाठी चांगली गुंतवणूक नाही.

ज्यांना त्यांच्या पैशा सोबत एकडूम कमी रिस्क घ्यायची असते किंवा रिस्क अजिबात नको असते त्यांनी  स्मॉल कॅप फंडपासून खूप लांब रहाव.  किंवा ज्यांना शॉर्ट टर्ममध्ये त्यांचे पैसे वापरण्याची आवश्यकता आहे त्यांनी स्मॉल कॅप फंड टाळले पाहिजेत.

Small Cap Mutual Fund मध्ये कोणी Invest नाही केलं पाहिजे? 

  • जर तुमची रिस्क घेण्याची क्षमता खूप कमी असेल तर तुम्ही स्मॉल कॅप Mutual Fund पासून दूर राहील पाहिजे. 
  • जर तुम्ही आताच पैसे Invest करायला सुरुवात केली आहे आणि तुम्ही तुमचा पहिला Mutual Fund निवडत आहात. 
  • जर तुम्ही 5 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी पैसे Invest करत आहात तर तुम्ही Small Cap Fund मध्ये पैसे Invest करू नका.

Small Cap Fund मध्ये Invest करण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवा. 

1. स्वतः रिसर्च करा: Small Cap Fund मध्ये पैसे Invest करण्याआधी त्यांना नीट समजून घेणे आवश्यक आहे. त्यांचा आधीचा परफॉर्मन्स, फंड मॅनेजर, फी, Investment strategy इ गोष्टींचा नीट अभ्यास करा. 

2. पोर्टफोलओ Diversify करा: स्मॉल कॅप फंड जबरदस्त रिटर्न देतात म्हणून सगळे पैसे फक्त यांमध्ये Invest सगळ्यात मोठी चूक आहे. आणि म्हणून तुमचे पैसै मार्केटमधील विविध कंपन्यांमध्ये Invest केले पाहिजेत तरच तुमचा पोर्टफोलिओ योग्यरित्या Diversify होतो. त्यासाठी तुम्ही थोडे पैसे इंडेक्स फंड, लार्ज कॅप फंड किंवा इतर प्रकारच्या फंडमध्ये Invest करू शकता.

3. पोर्टफोलिओला Rebalance करा: पोर्टफोलओ Rebalance करणे म्हणजे विविध प्रकारच्या Assets किंवा Funds मध्ये योग्यरित्या पैसे वाटप करणे. आणि हे सतत चेक करणे यालाच Rebalancing अस म्हणतात. कारण खूप वेळा अस होत की आपण पैसे Invest करत असतो पण जास्त प्रमाणत पैसे फक्त एकाच प्रकारच्या फंडमध्ये असतात जे चुकीचं आहे. 

Keep Learning & Keep Investing 

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 म्यूचुअल फंडवर लोन काढता येत का? | Loans Against Mutual Funds in Marathi (marathifinance.net)

2 thoughts on “स्मॉल कॅप फंड काय आहे? फायदे आणि तोटे | Small Cap Fund in Marathi”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi