तुम्ही म्यूचुअल फंडमध्ये इन्वेस्ट करताना या चुका करताय का? | 5 Mutual Fund Mistakes in Marathi

Rate this post

5 Mutual Fund Mistakes in Marathi: म्यूचुअल फंड हा अनेकांसाठी शेअर मार्केटमध्ये जास्त रिसर्च न करता पैसे इन्वेस्ट करण्याच एक उत्तम मार्ग बनत आहे. पण म्यूचुअल फंडमध्ये पैसे इन्वेस्ट करताना काही गोष्टी पूर्णपणे तुमच्या कंट्रोलमध्ये असतात जस की  (१) फंड निवडणे. (२) फंडमधून बाहेर पडणे. (३) फंडच्या परफॉर्मेंसच विश्लेषण करणे.

बाकी गोष्टी सहसा तुमच्या  कंट्रोलमध्ये नसतात त्यामुळे म्यूचुअल फंडमध्ये इन्वेस्ट करताना काही चुका आपल्याकडून होतात. आणि त्या चुका कोणत्या आणि कशा टाळायच्या हेच या पोस्टमध्ये समजून घेणार आहोत. (त्या  5 चुका पुढीलप्रमाणे)

१) एखाद्या फंडमध्ये कोणते शेअर्स आहेत याकडे लक्ष देवू नका.

कारण त्याचा काहीच उपयोग होत नाही. एखाद्या फंड मॅनेजरने शेअर का निवडला आहे हे आपल्याला माहीत नसत. तसेच कधी तो एखाद्या शेअरमधून बाहेर पडतो आणि का पडतो याची आपल्याला काहीच कल्पना नसते. फार कमी लोक असतात जे फंडमधील शेअर्सकडे बघून त्यातून काही अर्थपूर्ण निष्कर्ष काढू शकतात. तुम्ही त्यापैकी एक असाल तर चांगलच आहे आणि जरी नसलात तरी फारसा फरक पडत नाही.

२) फंड मॅनेजर कोण आहे ते पाहू नका.

मी खात्रीने सांगू शकतो आपल्यापैकी ९९.९९% लोकांना हे माहीत नसेल की ते ज्या फंडमध्ये SIP करत आहेत त्याचा फंड मॅनेजर कोण आहे. आणि माहीत करुन पण काही फायदा होत नाही. आणि तसंही तो पण एखाद्या म्यूचुअल फंड कंपनीचा एक एम्प्लॉयीच असतो. त्याला वाटेल तेव्हा जॉब सोडू शकतो.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)

३)दररोजच्या प्रॉफिट-लॉसला बघत बसू नका.

कारण त्याने काही होणार नाही ज्या दिवशी मार्केट वर गेलेल असेल तेव्हा मस्त वाटेल आणि जेव्हा मार्केट पडल असेल तेव्हा डोक्याला फुकटचा ताप होईल. मी तर ज्या दिवशी SIP ची रक्कम कट होते तेव्हा बघतो आणि मग दोन दिवसांनी म्यूचुअल फंड यूनिट्स आले की नाही ते बघतो.

४) कमीत कमी वर्षभर इनवेस्ट केल्याशिवाय वार्षिक रिटर्नकडे पाहू नका.

कारण फंड चांगला आहे की नाही हेच समजायला कमीत कमी 2 वर्ष तरी द्यावेच लागतील. शॉर्ट टर्ममध्ये पक्क अस काही सांगता येत नाही. 

५) फंड निवडल्यानंतर सतत इतरांच Confirmation मागू नका.

मी अनेक वेळा पाहिल आहे जरा कोणी आपल्या फंडबद्दल काही वाईट बोलला की निघाले त्यातून पैसे काढायला किंवा स्वता नीट रिसर्च करुन फंड निवडतात आणि फंड चांगला पण असतो पण तरीही सतत इतरांच मत घेत असतात तो फंड चांगला आहे की वाईट. त्यामुळे आजपासून प्रतेकयाने जबाबदारी घ्या की फंड बेकार निघाला तरी माझी चूक असेल आणि चांगला निघाला तर मीच स्वतची पाठ थोपटेण. अस केल्याने तुम्हाला इतर लोक काय म्हणत आहेत याची काळजी करावी लागणार नाही. 

Keep Learning & Keep Investing 

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 म्यूचुअल फंडवर लोन काढता येत का? | Loans Against Mutual Funds in Marathi (marathifinance.net)

1 thought on “तुम्ही म्यूचुअल फंडमध्ये इन्वेस्ट करताना या चुका करताय का? | 5 Mutual Fund Mistakes in Marathi”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi