How to Become Rich: श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला या 4 पैकी 1 गोष्ट हवीय! (जाणून घ्या)

Rate this post

How to Become Rich in Marathi: जोई रोगन यांच्या पॉडकास्टवर एपिसोड नंबर 1309 मध्ये नवल रविकांत यांनी श्रीमंत होण्यासाठी लागणाऱ्या लेव्हरेजच्या 4 प्रकारांबद्दल सांगितल आहे.  

आणि नवल रविकांत कोण आहेत तर थोडक्यात सांगतो, नवल रविकांत एक इन्वेस्टर आहेत ज्यांनी Uber, Twitter आणि 200 पेक्षा अनेक स्टार्टअप्समध्ये पैसे इनवेस्ट केले आहेत. ते AngelList या कंपनीचे फाउंडर आहेत.

वयाच्या 9 व्या वर्षी  ते आई वडिलांसोबत दिल्लीवरुन अमेरिकामध्ये गेले. आई वडिलांचा Divorce झाला त्यामुळे आईने एकटीने त्यांना वाढवल. आई जॉबवर गेली की ते दिवसभर लायब्ररीमध्ये जे मिळेल ते पुस्तक वाचत बसायचे. खूप इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी आहेत. (2024 मध्ये तुम्हाला फक्त एक बुक वाचायच असेल तर मी खालील बूक रिकमेंड करेन) 

आजच्या पोस्टमध्ये आपण श्रीमंत होण्यासाठी गरजेच्या असलेल्या लेव्हरेजच्या 4 टाइप्सवर चर्चा करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. 

the almanack of naval ravikant book

आधी लेव्हरेज काय हे थोडक्यात समजुयात 

how to become rich marathi

तुम्ही एखादा मोठा दगड हाताने हलवायला गेलात तर तुम्हाला खूप ताकद लावावी लागेल पण तो काय जागचा हलणार नाही.

तुम्ही कधीतरी नक्की पाहिल असेल की असे मोठे दगड हलवताना लोखंडी सळीचा वापर केला जातो आणि ती दगड किंवा एखादी जड वस्तु सहज हलवता येते. आता या ठिकाणी लोखंडी सळी ही लेव्हरेज आहे.

लेव्हरेजची अगदी सोपी व्याख्या आपण अशी म्हणू शकतो की, एखादी अशी छोटी गोष्ट जिचा वापर करून तुम्ही मोठ्या आणि कठीण गोष्टी सहज करू शकता. 

लेव्हरेजचे 4 प्रकार (How to Become RICH)

नवल रविकांत यांनी लेव्हरेजचे चार प्रकार मांडले आहेत. आणि आजच्या जगात श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला यापैकी एक निवडायच आहे. चार 4 लेव्हरेज पुढीलप्रमाणे

  1. लेबर (Labour)
  2. कॅपिटल (Capital)
  3. कोड (Code)
  4. मीडिया (Media)

लेबर 

आधीच्या काळात काही लोक जबरदस्ती करून, दमदाटी करून लोकांना मोठफक्तरो  फॅक्टर्यामध्ये आणि खाणींवर काम करायला लावायचे आणि त्यांच्या मेहनतीवर पैसा कमवायचे.

आत्तासुद्धा फॅक्टऱ्या आहेत, कंपन्या आहेत पण आता कायदे खूप कडक झाले आहेत. आता लोकांवर दमदाटीकरून काम करून घेणे कठीण झालं आहे. आता त्यांना सॅलरीच्या स्वरूपात पैसे द्यावे लागतात.

त्यामुळे हे लेव्हरेज तुमच्या काही कामाचा नाहीये कारण एवढी लोकं कुठून आणणार. 

कॅपिटल 

कॅपिटल म्हणजे पैसा. 

तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही त्या पैशाचा वापर करून अजून पैसा बनवू शकता हे एक सिंपल लॉजिक आहे. पण त्यासाठी तुम्हाला नॉलेज हवय की पैसा कुठे Invest करायचा आणि कसा वाढवायचा.

पण 99% लोकांकडे एवढा पैसा नसतो त्यामुळे हे लेव्हरेज पण आपल्या काही कामाचा नाहीये.

कोड

कोड म्हणजे एखाद सॉफ्टवेअर किंवा ॲप.

जर तुम्ही असा एखाद्या ॲप बनवू शकता किंवा सॉफ्टवेअर बनवू शकता ज्यामुळे लोकांचा फायदा होतो, त्यातून त्यांचे प्रॉब्लेम Solve होतात तर त्यातून तुम्ही पैसे कमवू शकता आणि श्रीमंत बनू शकता. 

मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स असो की Amazon चे जेफ बेजोस किंवा भारतातील Zerodha चे निखिल आणि नितीन कामथ असो, सगळयांनी याचा प्रकारच्या लेव्हरेजचा वापर केला आहे. आणि आजकाल येणारे नवीन ॲप्स हे सगळे याच लेव्हरेज वापर करत आहेत.

जर तुम्हाला अस काही करता आलं तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. (हे लेव्हरेज काही जणांच्या कामाचं नक्की आहे.)

मीडिया 

 इथे मीडियाचा अर्थ न्यूज चैनलवाले नाहीत. इथे मीडियाचा अर्थ होतो कॉन्टेन्ट जे आजकाल आपण सगळीकडे कन्स्युम करतोय.

इंस्टाग्रामवर रील असूदेत की युट्युबवर शॉर्ट असूदेत किंवा व्हिडिओ, पॉडकास्ट असो की ब्लॉक पोस्ट हे सगळं या लेव्हरेजमध्ये येत. तुम्ही स्वतः आजूबाजूला बघा किती लोक युट्युब वरून पैसे कमवतात,  किती लोक इंस्टाग्रामवरून पैसे कमवतात,  किती लोक ब्लॉगिंग करून पैसे कमवतात. 

कारण यासाठी कोणती परमिशन लागत नाही. तुम्ही एक हे काम अगदी फ्रीमध्ये स्टार्ट करू शकता.  फक्त एवढंच की तुम्ही जे काय कराल त्यातून लोकांना फायदा झाला पाहिजे लोकांचे प्रॉब्लेम सॉल झाले पाहिजेत. (हे सगळ्यात महत्वाचं आहे) 

एक साधा एक्झाम्पल घेऊ, तुम्ही आता जी माहिती वाचताय ती जर मी एकेकाला सांगत बसलो असतो तर दिवसभरात मी जास्तीत जास्त ३०- 40 लोकांना सांगू शकलो असतो आणि मग त्यात माझा एवढा टाईम गेला असता की विचारु नका. 

पण मी या ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून असंख्य लोकांपर्यंत पोहोचू शकतो. त्याला काही लिमिट नाही कारण ही ब्लॉग पोस्ट माझ्यासाठी एक लेव्हरेजच काम करत आहे. आणि त्यासोबत मी तुमचे प्रॉब्लेम Solve करत आहे. (पण मी अजून श्रीमंत नाही झालोय😂

तुम्हाला सुद्धा या चार लेव्हरेजपैकी शेवटचे दोन कामी  येणार आहेत.  यापैकी एक निवडा आणि त्यावर काम करायला सुरुवात करा.

लोकांचे प्रॉब्लेम Solve करा. आणि संयम बाळगा.

आज ना उद्या तुम्ही तुम्ही श्रीमंत होणार एवढं नक्की. 

ALL THE BEST 👍

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

Investing Success Story: फक्त एका स्टॉकमधून 70 मिलियन डॉलर बनविले!

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi