Mutual Fund SIP in Marathi: झीरोधा कॉईन मध्ये SIP करण्यासाठी कमीत कमी रक्कम 5,000 आहे का? असा प्रश्न मला Instagram पेजवरील एका फॉलोवरने मला विचारला. आणि असा प्रश्न साहजिक आहे कारण Zerodha Coin App ज्यामधून म्यूचुअल फंड SIP करू शकतो.
पण कोणत्याही म्यूचुअल फंडमध्ये SIP करायला जा. काही वेळा तुम्हाला एक Minimum Ammount एवढी करावीच लागेल असा ऑप्शन येतो. तो नक्की काय आहे? काय 5000 रुपये सुरुवातीला इन्वेस्ट करावा लागेल. हेच आपण आजच्या पोस्टमध्ये समजून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया.
Zerodha Coin मध्ये SIP करताना तुम्हाला दोन ऑप्शन बघायला मिळतात.
आता त्या दोन्ही ऑप्शनना आपण नीट समजून घेऊत.
समजा तुम्हाला UTI Nifty 50 Index Fund मध्ये 1,000 रुपयाची SIP करायची आहे. तर जेव्हा तुम्ही SIP करायला जाणार तेव्हा तुम्हाला या App मध्ये आधी 5,000 रुपये सुरुवातीची इन्वेस्टमेंट (Initial Investment) अस बघायला मिळेल. आता हे Initial Investment नक्की काय आहे?
याचा अर्थ असा होतो की, जर तुम्हाला या म्यूचुअल फंडमध्ये SIP करायची आहे तर आधी तुम्हाला हे 5,000 रुपये भरावे लागतील तरच तुम्ही SIP चालू करू शकता. म्हणजे तुमच्या SIP चे 1,000 + 5000 Initial Investment म्हणून असे टोटल 6,000 तुम्हाला इन्वेस्ट करावे लागतील. आणि समजा तुम्ही Initial Investment च्या इथे 0 टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला असा Error बघायला मिळेल.
पण काय प्रत्येक म्यूचुअल फंडमध्ये SIP करताना 5,000 रुपये Intial Investment करावी लागेल?
तर तस नाहीये. काही म्यूचुअल फंडमध्ये ही इन्वेस्टमेंट 5,000 आहे तर काहीमध्ये 1,000 तर काहीमध्ये 100. पण हा एक प्रकारचा प्रॉब्लेम आहे कारण जो व्यक्ती अगदी नव्याने SIP ची सुरवात करतोय तो कुठून आणणार एवढे पैसे अगदी सुरुवातीलाच.
Initial Investment हा ऑप्शन सिलेक्ट न करता SIP करू शकतो का?
तुम्ही करू तर शकता पण त्यामध्ये पुढे जावून खूप मोठा प्रॉब्लेम तुम्हाला येणार. काय ते मी सांगतो. Zerodha Coin App मध्ये SIP करताना वरती एक ऑप्शन आहे तो म्हणजे AMC SIP. आता हा प्रकार आहे ते सांगतो.
AMC म्हणजे Asset Management Company. AMC SIP या ऑप्शनमध्ये तुमची SIP डायरेक्ट AMC म्हणजेच म्यूचुअल फंड कंपनीसोबत केली जाते. पण याचा सगळ्यात मोठा नुकसान हेच आहे की मग फ्युचरमध्ये तुम्ही त्या SIP मध्ये काही बदल करू शकत नाही.
जस की तुम्हाला वाटल या वर्षी मी 1,000 रुपये इन्वेस्ट करेन. पण पुढच्या वर्षी तुम्हाला वाटल की SIP ची रक्कम 1,500 रुपये करुयात तर तुम्हाला ते करता येणार नाही. दुसर म्हणजे तुम्ही ती SIP हव तेव्हा Pause किंवा Resume करू शकत नाही.
आणि तुम्हाला वाटल की दर वर्षी माझ्या SIP ची रक्कम 10% ने आपोआप वाढली पाहिजे. म्हणजे यावर्षी दर महिन्याला 1,000 रुपये इन्वेस्ट केले तर पुढच्या वर्षी दर महिन्याला आओपाप 10% ने SIP रक्कम वाढून 1,100 रुपये इन्वेस्ट व्हावे तर तेही करू शकत नाही (Step SIP ऑप्शन बंद)
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Groww App मध्ये इतर Investing Apps वरील म्यूचुअल फंडस कसे बघायचे?
आणि याच फालतू कारणांमुळे मी Zerodha Coin App वापरायच बंद केल?
तुम्हाला खर बोलू तर माझी पहिली SIP मी Zerodha App वरच केली होती पण जेव्हा मला समजल की यामध्ये हे सारे प्रॉब्लेम आहेत मी Groww App वापरायला सुरुवात केली. Groww मध्ये असा काही प्रकार नाहीये. हव तेव्हा SIP ची रक्कम वाढवा, तारीख बदला, SIP Installment Skip करा इ. आरामात करता येत. मी तर आवर्जून सांगेन की म्यूचुअल फंडसाठी तुम्ही Groww App वापरा. (डाउनलोड Groww App)
या पोस्टमधून काही नवीन माहिती मिळाली असेल आणि मला थॅंक यू बोलायच असेल तर तुम्ही ही पोस्ट शेअर करू शकता! Keep Learning & Keep Investing!
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
Zerodha coin madhe pan ahe same option. SIP amount edit karun change karata yete. SIP skip karu shakto apan
होय करू शकतो, पण SIP ची सुरवात करताना काही म्यूचुअल फंडमध्ये Initial Investment करावी लागते जी खूप मोठी असते. ते भरली तर नंतर SIP एडिट आणि स्कीप करता येते.