How to Become Rich: तुम्ही पैसे कमविणे की तुमच्या पैशाने तुमच्यासाठी पैसे कमविणे? काय चांगल आहे?

How to Become Rich in Marathi with Power of Compounding: शाळा झाली. कॉलेज केल. जॉब लागला. पैसे कमविले. आणि ही गाडी पुढे अशीच चालू राहते. पण श्रीमंतीच सीक्रेट तुम्ही पैसे कमविण्यासाठी काय केल यापेक्षा तुम्ही कमविलेल्या पैशाने तुमच्यासाठी काय केल यात आहे. नाही समजलात? टेंशन घेऊ नका आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये आपण यावर डीटेलमध्ये चर्चा करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. 

श्रीमंत बनायच आहे तर पॉवर ऑफ कमपौंडिंगला पहिल समजून घेतल पाहिजे. पॉवर ऑफ कमपौंडिंगला जगाच आठव आश्चर्य बोलण्यात आल आहे. Power of Compounding च्या मदतीने तुम्ही तुमचा मेहनतीचा पैसा एका पैसे कमवून देणाऱ्या Asset मध्ये बदलू शकता. 

जरा कल्पना करा. तुम्ही पैशासाठी अतोनात मेहनत घेत आहात किंवा तुमचा पैसा तुमच्यासाठी अतोनात मेहनत घेत आहे. यापैकी तुम्हाला काय आवडेल? नक्कीच तुम्ही दूसरा ऑप्शन निवडणार. पण हे शक्य आहे पॉवर ऑफ कमपौंडिंगने. कारण तुम्ही किती पैसे कमविता यापेक्षा तुम्ही किती Smartly ते पैसे इन्वेस्ट करता हे जास्त महत्वाच आहे. 

तुम्ही Snowball Effect बद्दल एकल आहे का?

How to Become Rich in Marathi with Power of Compounding

बर्फाने भरलेल्या एका डोंगराच्या टोकावरून जर तुम्ही बर्फाचा एक छोटासा बॉल खाली ढकलला तर तो खाली येता येता एक भला मोठा बर्फाचा गोळा बनतो. यालाच Snowball Effect म्हणतात.

आता कल्पना करा. तुम्ही ढकलेला छोटा बर्फाचा गोळा ही तुमची सुरुवातीची छोटी इन्वेस्टमेंट आहे. आणि काही वर्ष असंच नियमित इन्वेस्ट करून तुम्ही पॉवर ऑफ कमपौंडिंगच्या मदतीने ती छोटी इन्वेस्टमेंट एक मोठी रक्कम बनते. 

पण Power of Compounding वेल्थ बनविण्याचा रामबाण उपाय कस आहे? 

Percentage ची पॉवर: 1,000 रुपयांवर जर तुम्हाला 10% इंट्रेस्ट मिळाला तर होतात 100 रुपये. पण 10,000 वर जर 10% इंट्रेस्ट मिळाला तर होतात 1,000 रुपये. तुम्हाला समजत आहे ना जितकी जास्त इन्वेस्टमेंट असेल त्यावर कमी रिटर्न मिळाला तरी खूप होतो. म्हणून इन्कम वाढवा आणि जास्तीत जास्त इन्वेस्ट करा.  (आपण इथे इंट्रेस्ट फक्त 10% घेतला आहे जो नक्कीच जास्त असेल जेव्हा तुम्ही पैसे शेअर मार्केटमध्ये इन्वेस्ट करणार) 

पैसा पैशाला बनवितो: कल्पना करून बघा की तुमचे पैसे स्वतःहून पैसे कमवत आहेत. जस आपण आताच पाहिल की 1,000 रुपयांवर तुम्हाला 100 रुपये मिळाले. तसेच 10,000 रुपयांवर तुम्हाला 1,000 रुपये मिळाले. पण हे पैसे कमविण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली का? अजिबात नाही. तुमच्या पैशाने तुमच्यासाठी पैसा बनविला आहे. 

टाइम एक खरा मित्र: तुम्ही एकल असेल ना की टाइम हे आपल सगळ्यात मोठ Asset आहे आणि ते 100% खर आहे. तुम्ही जितका जास्त वेळ पैसे इन्वेस्ट करणार आणि त्यावर 10-12% जरी रिटर्न मिळाला तरी खूप होतो. फक्त तुम्ही इन्वेस्टमेंटची रक्कम कशी वाढविता येईल यावर फोकस केल पाहिजे. एक गणित करून बघा. फक्त 2,000 रुपये दर महिन्याला पुढच्या 25 वर्षासाठी. त्यावर रिटर्न मिळणार 12% आणि दर वर्षी ही रक्कम 10% ने वाढणार तर किती होणार? 1,28,26,638 रुपये (वेल्थ अशीच बनते. जास्त टाइम = जास्त वेल्थ) 

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Mutual Fund कंपनीकडे तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
श्रीमंत बनण्यासाठी या टिप्स तुमच्या कामी येतील. (Become Rich Tips)

लवकर सुरुवात करा: जितक लवकर सुरुवात कराल तितक फायद्यात राहाल. छोटी छोटी इन्वेस्टमेंट 20-25 वर्षानी खूप मोठी झालेली असेल. आजच सुरुवात करा. 

योग्यरित्या पैसे इन्वेस्ट करा: स्वताचे Financial Goals आणि रिस्क क्षमता ओळखा. त्यानुसार पैसे इन्वेस्ट करा. स्वताला जमत नसेल तिथे चांगल्या Advisor ची हेल्प घ्या. 

Automate Your Wealth: हे तर आधी करा. सगळ काही ऑटोमॅटिक असल पाहिजे. दर महिन्याला ठराविक तारखेला तुमचे पैसे म्यूचुअल फंड SIP मध्ये आपोआप इन्वेस्ट होणार. स्वता डोक्याला ताप देऊ नका अरे आज एवढे इन्वेस्ट करायचे आहेत. तुम्ही तुमची कामे करा आणि तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करत राहील. 

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉तुमच्या पैशापासून पैसा कसा बनवाल? | How to Make Money from Money in Marathi

आयुष्यभर काम काम काम या Mindset मधून बाहेर पडा. तुमच्या पैशाला कसं कामाला लावता येईल याचा विचार करा. Power of Compoundig चा फायदा घ्या. तुम्ही एकवेळ थकू शकता पण तुमचा पैसा नाही. सुरवात छोट्या रक्कमेपासून करा आणि Snowball Effect प्रमाणे ती इन्वेस्टमेंट वाढताना बघा.

नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही किती पैसे कमविता हे महत्वाच आहे पण त्याहून जास्त महत्वाच आहे की तुम्ही किती Save करता आणि किती इन्वेस्ट करता. जास्तीत जास्त पैसे इन्वेस्ट करा. श्रीमंत बनण्याची वर्षे कमी होतील. 

Keep Learning & Keep Investing! आणि पोस्ट नक्की शेअर करा

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)

2 thoughts on “How to Become Rich: तुम्ही पैसे कमविणे की तुमच्या पैशाने तुमच्यासाठी पैसे कमविणे? काय चांगल आहे?”

Leave a Comment

आर्थिक स्वातंत्र्य काय आहे? | What is financial freedom in Marathi भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची माहिती | Airtel IPO 31 मार्चच्या आधी हे करा, नाहीतर बंद होतील म्यूचुअल फंड व्यवहार | Mutual Fund RE-KYC चांगला सीबील स्कोर का गरजेच आहे? | Why do you need a CIBIL score?) सीबील स्कोर काय आहे? | What is CIBIL Score?