Mutual Fund कंपनीकडे तुमचे पैसे सुरक्षित आहेत का? (Mutual Fund RISKS)

बँक अकाऊंट आणि FD मध्ये आपले पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत असा लोकांचा सर्वसाधारण समज असतो. बँकांचे नियमन सरकारकडून केले जाते आणि रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांवर लक्ष ठेवल्याने या विश्वासाला आणखी बळ मिळते. पण, म्यूचुअल फंड कंपन्यांबद्दल हाच प्रश्न विचारला तर बहुतेक लोक नकारार्थी उत्तर देतील. ही भीती आश्चर्यकारक नाही, कारण आपल्यापैकी बहुतेकांना Mutual Funds कंपन्या कशा प्रकारे काम करतात आणि आपल्या पैशाचे मॅनेजमेंट कसे करतात हे समजत नाही.

जर मी तुम्हाला सांगितले की Mutual Funds कंपन्या देखील कठोर नियमांनुसार नियंत्रित केल्या जातात आणि त्या बँकांप्रमाणेच काही निश्चित मार्गदर्शक तत्त्वांनुसार काम करतात. तुम्हाला विश्वास नाही बसणार ना. चला तर यावर आज डीटेलमध्ये चर्चा करुत.

Mutual Fund कंपन्या चांगल्या प्रकारे नियंत्रित केल्या जातात. 

प्रत्येक इन्वेस्टरच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सर्व म्यूचुअल फंड कंपन्या कठोर नियमांनुसार काम करतात. शेअर मार्केटच्या देखरेखीसाठी आणि कामकाजासाठी जबाबदार असलेल्या SEBI (The Securities and Exchange Board of India) या सरकारी एजन्सीने हे नियम लागू केले आहेत. याशिवाय SEBI सर्व Mutual Funds कंपन्यांसाठी वेळोवेळी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करते आणि त्यांचे कामकाज आपल्या नियंत्रणाखाली ठेवते. SEBI काही चुकीच्या गोष्टी आढळल्यास म्यूचुअल फंड कंपन्यांवर विविध दंडात्मक तरतुदी लागू केल्या जातात.

दुसरीकडे AMFI (Association of Mutual Funds in India) ही एक वैधानिक संस्था आहे जी Mutual Fund इन्वेस्टरच्या तक्रारींचे निराकरण करते. एकत्रितपणे, या दोन्ही संस्था म्यूचुअल फंड कंपन्यांच्या कामकाजाला अगदी पारदर्शक आणि नैतिक ठेवण्याचा प्रयत्न करतात.

Mutual Fund कंपन्यांबाबतचे नियम व कायदे (थोडक्यात)

प्रत्येक Mutual Fund कंपनीला SEBI ने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या Mutual Fund च्या कामकाजात काही चुकची कामे तर होत नाहीत ना, याची खात्री करण्यासाठी या Mutual Fund  कंपन्यांचे नियमित ऑडिटही केले जाते. गुंतवणूकदारांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी SEBI ने लागू केलेले काही प्रमुख नियम पाहूया:

Investors ची कमीत कमी संख्या :

कोणत्याही Mutual Fund मध्ये कमीत कमी Investor असणे आवश्यक आहे कारण Mutual Fund मध्ये आपल्या सारख्या अनेक Investors कडून पैसे जमा केले जातात आणि इनवेस्ट केले जात. अस केल्याने रिस्क कोणा एकावर न राहता तीच विभाजन होते.

किमान पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशनचे नियम :

कोणत्याही Mutual Fund मध्ये विविध Asset Class तसेच Securities मध्ये इनवेस्ट करणे आवश्यक आहे. समजा, एखादा Small Cap Fund आहे तर त्यामध्ये फक्त Small Cap कंपन्या नसणार. थोड्या Mid Cap तर काही Large Cap कंपन्यादेखील असायला हव्यात. अस केल्याने Fund मधील रिस्क कमी करता येते.

इतर काही नियम :

Mutual Fund  कंपन्यांना कोणतेही कर्ज घेण्याची परवानगी नसते. शिवाय, त्यांना फक्त शेड्यूल्ड बँकांमध्ये रोख रक्कम ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे, इतर कोणत्याही बँकेत नाही. (रोख रक्कम यासाठी की आपल्यासारख्या इन्वेस्टरने अचानक पैसे मागितले तर लगेच द्यायला) आणि Mutual Fund चे Sponsor त्यांच्या ग्रुपमधील इतर कंपन्यांना मजबूत करण्यासाठी Investors च्या पैशाचा वापर करणार नाहीत याची खात्री SEBI घेते.

फॉर एक्झॅम्पल

SBI Mutual Fund चे Sponsor आहेत SBI म्हणजेच State Bank of India.

याचा अर्थ असा की, SBI ग्रुपच्या इतर कोणत्याच कंपनीमध्ये SBI Mutual Fund इनवेस्ट करू शकत नाही जस की SBI Life Insurance किवा Health Insurance किंवा इतर  कोणतीही कंपनी.

प्रत्येक स्तरावर Investors च्या हिताचे रक्षण करणारी रचना

म्यूचुअल फंडना सुरक्षित बनवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे फंडची रचना. SEBI ने ठरविल्याप्रमाणे म्यूचुअल फंड कंपनीच्या या रचनेसाठी ट्रस्टच्या स्वरूपात डिझाइन केलेला फंड आवश्यक असतो. आपण ही रचना थोडक्यात समजून घेऊत.

स्पॉन्सर 

प्रत्येक म्यूचुअल फंडचा एक स्पॉन्सर असतो. Mutual Fund च्या नेट वर्थच्या कमीत कमी 40% एवढी रक्कम या स्पॉन्सरला पुरवावी लागते. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की म्यूचुअल फंड सुरू करण्याचा लायसेंस स्पॉन्सरला त्याचा बॅकग्राऊंड तपासल्यानंतर आणि त्यांच्या आर्थिक क्षमतेची खात्री केल्यानंतरच दिला जातो.

बोर्ड ऑफ ट्रस्टीज 

म्यूचुअल फंड कंपनी ट्रस्ट म्हणून स्थापन केली जाते, ज्यामध्ये 2/3 ट्रस्टीज कोणत्याही प्रकारे स्पॉन्सरशी संबंधित नसलेल्या स्वतंत्र व्यक्ती असणे आवश्यक आहे. ते आपल्यासारख्या Investors च्या हिताचे रक्षण करण्यासाठी जबाबदार असतात.

Asset मॅनेजमेंट कंपनी

Asset मॅनेजमेंट कंपनीमध्ये ट्रस्टने फंडच्या Investing वर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेले प्रोफेशनल फंड मॅनेजर असतात. ते विविध सिक्युरिटीजमध्ये पैसे गुंतवतात आणि त्या Investors ना फायदेशीर आहे याची खात्री करतात. शेअर निवडणे, खरेदी करणे आणि विकणे ही सगळी कामे फंड मॅनेजर करतात.

कस्टोडियन 

कायद्यानुसार सर्व Mutual Funds नी त्यांच्या पोर्टफोलिओमधील सिक्युरिटीजला कस्टोडियनकडे ठेवून त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. Mutual Fund कडून केली जाणारी Investment बँकांसारख्या पात्र कस्टोडियनमार्फत केली जाते. हे कस्टोडियनपण सेबीकडे नोंदणीकृत असतात.

Mutual Funds मधील रिस्कचे प्रकार 

मार्केट Volatility रिस्क 

‘Mutual fund investments are subject to market risk’ हे डिस्क्लेमर तुम्ही टीव्ही किंवा यूट्यूबबर येणाऱ्या Mutual Fund च्या Ads मध्ये नक्कीच एकल असेल. मार्केटने जर खराब परफॉर्म केलं तर रिटर्न पण खराब मिळतो. आणि मार्केटचा performance खराब करायला खूप साऱ्या गोष्टी कारणीभूत असतात जस की महागाई, महामंदी, पॉलिटिक्स, नैसर्गिक आपत्ती इ. जेव्हा कोरोणा आला तेव्हा सुद्धा मार्केटमध्ये मोठी घसरण झाली. आणि अशा वेळी आपण फार काही करू शकत नाही. फक्त वाट बघू शकतो की मार्केट कधी पुन्हा वर जाईल.

Liquidity रिस्क

Liquidity रिस्क ही अशी रिस्क आहे जिथे तुम्ही Invest केलेले पैसे लगेच काढू शकत नाही. आणि काढायला गेलात तर ते लॉस घेऊन काढावे लागतात. ELSS (Equity Linked Savings Scheme) फंड असे फंड जिथे 3 वर्षाचा लॉक इन पिरियड असतो. 3 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही पैसे नाही काढू शकत. लॉक इन पिरियड ही एक प्रकारची Liquidity रिस्क आहे.  ETF म्हणजेच Exchange Traded Funds मध्ये सुध्दा Liquidity रिस्क बघायला मिळते. तुम्ही समजा एखादी ETF विकत घेतलीत पण विकायच्या वेळी समोर कोणी घेणारा नसेल तर तुम्ही ती विकू नाही शकत. म्हणून ETF विकत घेताना नेहमी त्याच Volume सगळ्यात आधी चेक करावं. Volume म्हणजे एकूण किती लोकांनी त्यामध्ये Invest केलं आहे किंवा खरेदी विक्री करत असतात. 

Concentration रिस्क

Concentration रिस्क म्हणजे एकाच प्रकारच्या Asset किंवा सेक्टरमध्ये सगळे पैसै Invest करणे जे खूप धोकादायक असत.  काही Mutual Funds जस की सेक्टर फंड जे त्यामधील सगळे पैसे फक्त एकाच सेक्टरमध्ये Invest करतात. आणि समजा त्या सेक्टरमध्ये काही बदल झाले, सरकारच्या Policies बदलल्या तर ते सेक्टर मोठ्या प्रमाणात पडत आणि Investor ला याचा परीणाम भोगावा लागतो. 

Interest Rate रिस्क

RBI म्हणजेच Reserve Bank of India वेळोवेळी इंटरेस्ट रेट बदलत असते. याचा परीणाम पूर्ण इकॉनॉमीवर होत असतो.  शेअर मार्केटमध्ये  पण याचा परिणाम नेहमी बघायला मिळतो. काही Mutual Funds असतात जे Bonds मध्ये पैसे Invest करतात अशा वेळी जात RBI ने रेट वाढवले तर Bonds च्या किंमती पडतात. याऊलट RBI जेव्हा इंटरेस्ट रेट कमी करते तेव्हा Bonds च्या किंमती वाढतात. जर तुम्ही एखाद्या Debt Mutual Fund मध्ये पैसे Invest केले असतील तर या सगळ्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या रिटर्नमध्ये बघायला मिळेल.

महागाईची रिस्क 

महागाई वाढणे म्हणजे थोडक्यात काय तर एखादी वस्तू खरेदी करण्याची आपली क्षमता कमी होणे. याचं साधं सोपं उदाहरण म्हणजे आपल्याला दैनंदिन जीवनाच्या वस्तू. आधी 10 रुपयात मोठा बिस्कीट पॅकेट यायचा पण आता ते सगळ बदलल आहे. जर महागाईचा रेट भारतामध्ये 6-7% आहे याचा अर्थ असा की तुम्ही नेहमी अशा Assets मध्ये पैसे Invest केले पाहिजेत जे या रेटपेक्षा जास्त रिटर्न तुम्हाला आणून देतील. म्हणून तर बँक अकाऊंट आणि FD मध्ये पैसे ठेऊन काही वाढत नाहीत. 

Rebalancing रिस्क

Mutual Fund चा फंड मॅनेजर सतत नविन कंपन्या विकत घेतो आणि जुन्या विकत असतो याला पोर्टफोलओ Rebalancing अस म्हणतात. पण हे सगळ करत असताना काही वेळा चांगले शेअर्स आधीच विकले जातात आणि नको ते शेअर्स घेतले जातात. यामुळे Investors ना रिटर्न खूप कमी मिळतो. आणि Rebalancing करताना फंड मॅनेजर एक फी पण घेतो म्हणजे हा पण एक खर्च झाला जो Investors ना द्यावा लागतो.

Management रिस्क 

Mutual Fund मध्ये नेहमीचं Management रिस्क असते. आता कितीही झालं तरी फंड मॅनेजर हा एक माणूसच आहे आणि चुका नेहमी होतात. फंड मॅनेजरने निवडलेल्या कंपन्या चांगल्या नाही निघाल्या तर Mutual Fund मध्ये Underperformance बघायला मिळते. कधी कधी तर खूप सारी रिसर्च करून पण एखादा फंड Nifty 50 पेक्षा जास्त रिटर्न आणून देत नाही. 

Regulatory रिस्क

अगदी नाव वाचूनच समजल असेल की जेव्हा सरकार, सेबी किंवा इतर Regulatory Authority काही नियम बदलते किंवा नवे नियम लागू करते तेव्हा एक प्रकारची रिस्क Mutual Fund ना सहन करावी लागते.

Mutual Funds मधील रिस्क कमी कशी करायची?

1. पोर्टफोलिओला Diversify करा. 

पैसे Invest करताना ते योग्यरित्या Diversify करणे अत्यंत आवश्यक आहे. Diversification म्हणजे पैसे एकाच Asset किंवा सेक्टरमध्ये न Invest करता विविध प्रकारच्या Assets आणि सेक्टरमध्ये Invest करणे. याचा फायदा असा होतो की समजा एखाद सेक्टर किंवा Asset खराब रिटर्न देत आहेत तर इतर Assets आणि सेक्टरच्या मदतीने पोर्टफोलिओचा रिटर्न चांगला राहतो. फक्तं एकाच टाईपचे सगळे Funds तुमच्या पोर्टफोलिओमध्ये घेऊ नका. एक इंडेक्स फंड, एक फ्लेक्सी कॅप फंड तर एक स्मॉल कॅप फंड असे विविध प्रकारचे Funds पोर्टफोलिओमध्ये ठेऊ शकता. 

2. SIP च्या माध्यमातून पैसे Invest करा.

SIP च्या माध्यमातून तुम्ही एखादी ठराविक रक्कम दर महिन्याला किंवा आठवड्याला Mutual Fund मध्ये Invest करू शकता. SIP केल्याने तुम्हाला मार्केटला टाईम करायची गरज नाही की आता पैसे Invest करणे ठीक नाही, काही टाइमने Invest करेन, हे अस काही SIP केल्यावर होत नाही. SIP केल्याने नियमितपणे एक रककम Invest होत राहते त्यामुळे Investing च्या प्रवासात एक Discipline बघायला मिळते. 

3. तुमची रिस्क प्रोफाइल चेक करा.

Risk Appetite म्हणजे तुम्ही किती रिस्क घेऊ शकता याची क्षमता. जास्त रिस्क घेतली की जास्त प्रॉफिट मिळत हे तर आपल्या सगळयांना चांगलंच माहित आहे पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी रिटर्न गॅरंटीड मिळेल. आणि म्हणून Mutual Fund मध्ये Invest करताना तुमच्या रिस्क क्षमतेनुसार Funds निवडा. 

4. Investing Goal ठरवा.

ठरावीक Goal ला समजून जेव्हा तुम्ही Investing करता तेव्हा त्या Goal पूर्ण करण्यासाठी बेस्ट फंड तुम्ही निवडू शकता. जर तुमचं Goal रिटायरमेंटसाठी पैसे जमा करणे आहे तर तुम्ही एखादा स्मॉल कॅप फंड निवडू शकता. कारण त्यामध्ये शॉर्ट टर्ममध्ये खूप रिस्क असते पण लाँग टर्ममध्ये चांगला फायदा होवू शकत. फक्त एवढंच की एखादा स्मॉल कॅप फंड इतका वेळ चांगले रिटर्न देईल यावर थोडी शंकात् येते कारण फंड मॅनेजर बदलला की फंडचा परफॉर्मन्स पण बदलतो.) जर तुमच Goal लग्नासाठी पैसे जमा करायचं असेल तर यात जास्त रिस्क घेऊन नाही चालणार कारण ठराविक वर्षानी तुम्हाला त्या पैशाची गरज लागेल. यासाठी तुम्ही सिंपल इंडेक्स फंड निवडू शकता.

5. लाँग टर्मसाठी Invest करा.

हे सांगायची काय गरज आहे का? कारण शेअर मार्केट म्हटल की लाँग टर्म अपोपाप डोक्यात येत. जेव्हा तुम्ही लाँग टर्मसाठी पैसे Mutual Fund मध्ये Invest करता तेव्हा Compounding च्या मदतीने पैसे मोठया प्रमाणात वाढतात. आणि लाँग टर्ममध्ये रिस्क पण खूप कमी होते. 

हे लक्षात घ्या!

प्रत्येक Mutual Fund ला आपण सुरुवातीला चर्चा केलेली रचना फॉलो करावीच लागते आणि ते पाहून आपण १०० टक्के ठामपणे सांगू शकतो की Mutual Fund मधील आपली Investment सुरक्षित आहे आणि कोणताही फंड तुमचे पैसे घेऊन पळून जाणार नाही.

म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते,  हे आपण नेहमीच TV वरील Ad मध्ये एकतो. पण ती रिस्क असते म्हणजे मार्केटमधील चढ-उतारांची. आणि रिस्क आपल्याला घ्यावीच लागत जर चांगले रिटर्न हवेत आणि पैसा वाढवायचा आहे. पण रिस्क घेताना ती रिस्क कशी कमी करता येईल याचा विचार तुम्ही नक्की केला पाहिजे. 

पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबात शेअर करा जे म्यूचुअल फंडला नेहमी Risky बोलत असतात. Keep SIPing!

2 thoughts on “Mutual Fund कंपनीकडे तुमचे पैसे सुरक्षित आहेत का? (Mutual Fund RISKS)”

Leave a Comment