Gandhar Oil Refinery IPO Day 3: – गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद! 64.07 Times Subscribed

जस मागील दोन दिवसात Gandhar Oil Refinery या IPO ला शेअर मार्केटमध्ये विवीध प्रकारच्या Investors कडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला, तसाच प्रितिसाद IPO च्या शेवटच्या दिवशी बघायला मिळाला आहे. Gandhar Oil Refinery IPO २२ नोव्हेंबर रोजी सुरू झाला होता आणि आज २४ नोव्हेंबर ही या IPO साठी Apply करायची शेवटची तारीख होती.

 IPO च्या शेवटच्या दिवशी म्हणजेच २४ नोव्हेंबर २०२३ रोजी हा IPO ६४.०७ Times Subscribed झाला आहे.  Gandhar Oil Refinery Ltd कंपनीने एकूण २.०७ करोड एवढे शेअर्स मार्केटमध्ये विकायला या IPO च्या माध्यमातून विकायला काढले आहेत त्यांपैकी जवळजवळ १३६ करोड एवढ्या शेअर्स साठी विविध Investors कडून Bid आली आहे. (थोडक्यात काय तर या IPO साठी पैसे भरले आहेत.)

कोणत्या कॅटेगरीमध्ये आणि किती शेअर्ससाठी Application आले आहेत? 

  • Non-Institutional Investor (NII) कॅटेगरीमध्ये ६२.२३ Times Subscribed झाला आहे.  NII म्हणजे भरतीय नागरिक, NRI (बाहेर देशात राहणारा भारतीय व्यक्ती), HUF – Hindu Undivided Family चा कर्ता, एखादी ट्रस्ट, सोसायटी इ. जे २ लाखापेक्षा जास्त शेअर्ससाठी Apply करतात.  
  • Retail Investor कॅटेगरीमध्ये IPO २८.९५ Times Subscribed झाला आहे. रिटेल Investor म्हणजे आपल्या सारखे सामान्य माणसे जी २ लाखा पेक्षा कमी किंमती असलेल्या शेअर्ससाठी Apply करतात. 
  • आता राहिले QIB म्हणजेच Qualified Institutional Buyers ज्यामध्ये Gandhar Oil Refinery Ltd चा IPO १२९ Times म्हणजेच सगळ्यात जास्त Subscribed झाला आहे.  QIB  या कॅटेगरीमध्ये मोठ मोठ्या Mutual Funds कंपन्या, पेन्शन फंड, Insurance कंपन्या, बँका इत्यादिचां समावेश होतो.

Gandhar Oil Refinery IPO बद्दल माहिती

Gandhar Oil Refinery IPO नोव्हेंबर २२ ला सुरू झालं असून नोव्हेंबर २४ ला बंद होणार आहे. या IPO ची किंमत ₹१६०-₹१६९ प्रतेकी शेअर ठरवली आहे.  जर तुम्हाला या IPO साठी Apply करायचं असल्यास तुम्हाला एका वेळी कमीत कमी ८८ शेअर्सचा एक लॉट घ्यावा लागेल ज्याची किंमत एकूण ₹२४,८७२ रुपये होते. 

गंधार ऑइल रीफायनरी या कंपनीची सुरुवात 1192 मध्ये झाली. या कंपनीचे मॅनिजिंग डायरेक्टर रमेश बाबूलाल पारेख आहेत.

गंधार ऑइल रीफायनरी ही एक व्हाइट ऑइल बनवणारी कंपनी आहे. गंधार ऑइल रीफायनरी ही कंपनी बिझनेससाठी प्रामुख्याने दोन सेक्टरवर फोकस करते आणि ते सेक्टर म्हणजे Consumer आणि Healthcare सेक्टर. 2017 मध्ये सुध्दा या कंपनीने IPO मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता पण काही कारणास्तव त्यांना तो प्लॅन कॅन्सल करावा लागला होता. 

Gandhar Oil Refinery चे प्रोडक्टचां वापर कुठे होतो?

  • Personal Care – स्किनवर लावले जाणारे Moisturizer, Cleansers, Creams, केसांवर लावले जाणारे प्रोडक्ट, मेकअपचे प्रोडक्ट इत्यादी मध्ये White Oil चा वापर होतो.
  • Health Care – लहान मुलांचे लोशन आणि Oils, Massage Oils, Syrups इत्यादी मध्ये White Oil चा वापर होतो.
  • Performance Oil – मोठ मोठ्या मशिनमध्ये Lubricants म्हणून White Oil चा वापर होतो.

Gandhar Oil Refinery बद्दल FAQ (Frequently Asked Questions) 

👉 गंधार ऑइल रीफायनरी  IPO चा इश्यू साइज किती शेअर्सचा आहे? 

गंधार ऑइल रीफायनरी IPO इश्यू साइज 2,96,26,732 shares (296.27 करोंड  शेअर्स  approximately) इक्विटि शेअर्स विकण्यासाठी आहे. 

👉 गंधार ऑइल रीफायनरी  IPO टोटल किती रककमेचा आहे? 

गंधार ऑइल रीफायनरी  IPO टोटल Rs.500  करोंड एवढा आहे. 

👉गंधार ऑइल रीफायनरी IPO कोणत्या तारखेला चालू आणि बंद होणार आहे? 

गंधार ऑइल रीफायनरी  हा IPO दिनांक 22 नोवेंबर 2023 ला चालू होणार आणि 24 नोवेंबर 2023 ला बंद होणार आहे. 

👉 गंधार ऑइल रीफायनरी  IPO ची किंमत काय असणार आहे? 

गंधार ऑइल रीफायनरी च्या एक शेअरची किंमत Rs.160 – 169 पर्यन्त असणार आहे. 

👉 गंधार ऑइल रीफायनरी  IPO मध्ये तुम्ही एका लॉटमध्ये  किती शेअर घेऊ शकता? 

गंधार ऑइल रीफायनरी  च्या IPO मध्ये तुम्हाला एका लॉटमध्ये टोटल 88 शेअर विकत घेता येतील. 

👉 गंधार ऑइल रीफायनरी  IPO कोणत्या एक्स्चेंजवर लिस्ट होणार आहे? 

गंधार ऑइल रीफायनरी  ही कंपनी भारताचे दोन्ही मोठे स्टॉक एक्स्चेंज म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज तसेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणार आहे. 

👉 गंधार ऑइल रीफायनरी  IPO चा रजिस्ट्रार कोण आहे? 

गंधार ऑइल रीफायनरी  या IPO साठी Link Intime India Pvt Ltd ही कंपनी रजिस्ट्रार आहे. 

इतर महत्वाच्या पोस्ट:-  Gandhar Oil Refinery IPO: – Date, Price आणि इतर माहिती 

1 thought on “Gandhar Oil Refinery IPO Day 3: – गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद! 64.07 Times Subscribed”

Leave a Comment

श्रीमंत व्यक्तींच्या 5 सवयी (ज्या तुम्ही विकसित केल्या पाहिजेत) Nova Agritech IPO GMP: ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? BLS-E Services IPO: अप्लाय करण्याआधी डीटेल माहिती वाचा डिटेल माहिती: HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य कस मिळेल? | 3 Steps of Financial Freedom in Marathi