फ्लेक्सिबल इन्वेस्टमेंटसाठी फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड निवडा: Top 3 Flexi Cap Mutual Funds 2024

5/5 - (1 vote)

SEBI च्या नियमानुसार Flexi Cap Mutual Fund मधील 65% पैसे हे इक्विटी म्हणजेच कंपन्यांच्या शेअरमध्ये इन्वेस्ट करावे लागतात. पण बाकीचे 35% त्या फंडचा फंड मॅनेजर कसा इन्वेस्ट करेल आणि कुठे करेल यावर काही बंधन नसतं. फंड मॅनेजर फंडमधील 35% पैसे त्याच्या मनाप्रमाणे इन्वेस्ट करू शकतो याची फ्लेक्सिबिलिटी त्याला असते, म्हणून तर यांना Flexi Cap Mutual Fund असं म्हणतात.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 @marathifinance

मे 2024 मध्ये Flexi Cap Mutual Fund कॅटेगरीमध्ये 3155.07 करोड एवढी रक्कम इन्वेस्ट करण्यात आली आहे. Flexi Cap Mutual Fund मध्ये पैसे इन्वेस्ट करण्याचा फायदा असा असतो की फंड जरी एक असला तरी मार्केटमधील सगळ्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये पैसे इन्वेस्ट करता येतात. Flexi Cap Mutual Fund मधील काही पैसे Small Cap स्टॉक, काही Mid Cap स्टॉक तर काही पैसे Large Cap स्टॉक असे इन्वेस्ट केले जातात.

1) JM Flexi Cap Fund – Direct Plan- Growth:

रेटिंग एजन्सी CRISIL ने या फंडला फाइव स्टार रेटिंग दिली आहे. 3 वर्षांत या फंडने वार्षिक 40.58% एवढा रिटर्न दिला आहे. या फंडची AUM (Asset Under Management) 2,107.42 करोड एवढी आहे. JM Flexi Cap Fund ची चालू NAV (Net Asset Value) ₹107.37 एवढी आहे.

तुम्ही या फंडमध्ये इन्वेस्ट करताना कमीत कमी ₹100 रुपयांची SIP करू शकता आणि कमीत कमी Lumpsum पैसे इन्वेस्ट करताना तुम्ही ₹1,000 रुपये एवढी रक्कम इन्वेस्ट करू शकता. या फंडचा Expense Ratio (म्हणजे फी) 0.48% एवढा आहे. या फंडमध्ये सध्या 63 स्टॉक्स आहेत ज्यापैकी काही मोठे स्टॉक्स म्हणजे ICICI Bank, HDFC Bank, L&T आणि SBI आहेत.

2) Quant Flexi Cap Fund – Direct Plan – Growth

Quant Mutual Fund चे नाव आजकाल नेहमीच टॉपवर असतं. Quant Flexi Cap Fund ने मागील 3 वर्षांत वार्षिक 36.45% एवढा रिटर्न दिला आहे. या फंडची AUM (Asset Under Management) ₹6,272 करोड एवढी आहे. Quant Flexi Cap Fund ची चालू NAV (Net Asset Value) ₹114.38 एवढी आहे.

तुम्ही या फंडमध्ये इन्वेस्ट करताना कमीत कमी ₹1,000 रुपयांची SIP करू शकता आणि कमीत कमी Lumpsum पैसे इन्वेस्ट करताना तुम्ही ₹5,000 रुपये एवढी रक्कम इन्वेस्ट करू शकता. या फंडचा Expense Ratio (म्हणजे फी) 0.59% एवढा आहे. या फंडमध्ये सध्या 38 स्टॉक्स आहेत ज्यापैकी काही मोठे स्टॉक्स म्हणजे RIL, Kotak Mahindra Bank आणि Jio Financial आहेत.

ही पोस्ट वाचा 👉 Flexi Cap Fund की Multi Cap Fund कोणता फंड तुमच्यासाठी बेस्ट आहे?

3) Bank of India Flexi Cap Fund – Direct Plan – Growth

रेटिंग एजन्सी CRISIL ने या फंडला फाइव स्टार रेटिंग दिली आहे. 3 वर्षांत या फंडने वार्षिक 37.53% एवढा रिटर्न दिला आहे. या फंडची AUM (Asset Under Management) ₹879.32 करोड एवढी आहे. Bank of India Flexi Cap Fund ची चालू NAV (Net Asset Value) ₹36.83 एवढी आहे.

तुम्ही या फंडमध्ये इन्वेस्ट करताना कमीत कमी ₹1,000 रुपयांची SIP करू शकता आणि कमीत कमी Lumpsum पैसे इन्वेस्ट करताना तुम्ही ₹5,000 रुपये एवढी रक्कम इन्वेस्ट करू शकता. या फंडचा Expense Ratio (म्हणजे फी) 0.77% एवढा आहे. या फंडमध्ये सध्या 64 स्टॉक्स आहेत ज्यापैकी काही मोठे स्टॉक्स म्हणजे SBI, HAL, Vedanta आणि Siemens आहेत.

Marathi Finance कडून एक महत्वाचा सल्ला

जर तुम्ही आधीपासूनच एखाद्या Flexi Cap Mutual Fund मध्ये SIP करत असाल किंवा Lumpsum पैसे इन्वेस्ट करत असाल, तर त्या फंडमधून बाहेर पडायची गरज नाही. नेहमी बघा की तो फंड तुम्हाला अपेक्षित तसा रिटर्न देत आहे का. जर तुमच्या अपेक्षेनुसार रिटर्न मिळत नसेल, तरच तुम्ही यापैकी एका फंडमध्ये स्विच करू शकता.

आणि जर तुम्ही एक नवीन Flexi Cap Mutual Fund तुमच्या पोर्टफोलियोमध्ये Add करायचं असेल, तर तुम्ही यापैकी एका फंडसोबत जाऊ शकता. पण फंड निवडताना तुमचे आर्थिक उद्दिष्ट (Financial Goal) बघा, तुमची रिस्क क्षमता ओळखा, आणि त्यानुसार फंड निवडा.

तसेच खाली दिलेल्या गोष्टींचा विचार करा:

  1. फंड मॅनेजरचा अनुभव आणि त्याची कामगिरी बघा.
  2. फंडचा ट्रॅक रेकॉर्ड आणि त्याची पोर्टफोलियो DIVERSIFICATION तपासा.
  3. फंडाचे एक्स्पेन्स रेशो आणि इतर फीजचा विचार करा.
  4. बाजारातील स्थिती आणि भविष्यातील संभाव्य बदलांचा अंदाज घ्या.
ही पोस्ट वाचा   👉 Navi Mutual Fund ची रिसर्च: तरुणांच्या म्यूचुअल फंड इन्वेस्टिंगमधील चुकांचा पर्दाफाश

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Flexi Cap Mutual Fund म्हणजे काय?

Flexi Cap Mutual Fund हा असा म्युच्युअल फंड आहे ज्यामध्ये फंड मॅनेजरला 65% पैसे इक्विटी म्हणजेच कंपन्यांच्या शेअरमध्ये इन्वेस्ट करणे बंधनकारक आहे. उर्वरित 35% पैसे कसे आणि कुठे इन्वेस्ट करायचे हे मॅनेजरच्या निर्णयावर अवलंबून असते.

Flexi Cap Mutual Fund मध्ये पैसे इन्वेस्ट करण्याचे फायदे काय आहेत?

Flexi Cap Mutual Fund मध्ये इन्वेस्ट करून, एकाच फंडाद्वारे मार्केटमधील लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये पैसे इन्वेस्ट करता येतात. यामुळे विविध प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक होऊन जोखीम कमी होते.

JM Flexi Cap Fund बद्दल माहिती सांगा.

JM Flexi Cap Fund – Direct Plan- Growth फंडाला CRISIL ने फाइव स्टार रेटिंग दिली आहे. मागील 3 वर्षांत या फंडने वार्षिक 40.58% रिटर्न दिला आहे. फंडची AUM 2,107.42 करोड आहे आणि चालू NAV ₹107.37 आहे. कमीत कमी ₹100 ची SIP आणि ₹1,000 चा Lumpsum इन्वेस्टमेंट केला जाऊ शकतो. फंडचा Expense Ratio 0.48% आहे.

Quant Flexi Cap Fund बद्दल माहिती सांगा.

Quant Flexi Cap Fund – Direct Plan – Growth फंडाला मागील 3 वर्षांत वार्षिक 36.45% रिटर्न मिळाला आहे. फंडची AUM ₹6,272 करोड आहे आणि चालू NAV ₹114.38 आहे. कमीत कमी ₹1,000 ची SIP आणि ₹5,000 चा Lumpsum इन्वेस्टमेंट केला जाऊ शकतो. फंडचा Expense Ratio 0.59% आहे.

Bank of India Flexi Cap Fund बद्दल माहिती सांगा.

Bank of India Flexi Cap Fund – Direct Plan – Growth फंडाला CRISIL ने फाइव स्टार रेटिंग दिली आहे. मागील 3 वर्षांत या फंडने वार्षिक 37.53% रिटर्न दिला आहे. फंडची AUM ₹879.32 करोड आहे आणि चालू NAV ₹36.83 आहे. कमीत कमी ₹1,000 ची SIP आणि ₹5,000 चा Lumpsum इन्वेस्टमेंट केला जाऊ शकतो. फंडचा Expense Ratio 0.77% आहे.

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi