म्यूचुअल फंड कोणता घेऊ? कमी NAV vs जास्त NAV | Mutual Funds in Marathi

Rate this post

जेव्हा तुम्ही एखाद्या Mutual Fund मध्ये SIP करता तेव्हा तुम्हाला त्या फंडचे यूनिट्स मिळतात. आता या यूनिट्सची किंमत ही Mutual Fund च्या NAV वरून ठरवली जाते.

आता ही NAV नक्की काय आहे ते आपण आज नीट समजून  घेऊयात. कारण NAV ची कन्सेप्ट खूप चुकीच्या प्रकारे लोक समजून घेतात.

जर तुम्हाला 2 Mutual Funds मधून एक फंड निवडायला सांगितल तर तुम्ही कोणता फंड निवडाल? यातील एका फंडची NAV जास्त आहे तर दुसऱ्या फंडची NAV कमी आहे.

इथे 99% लोक नेहमी कमी NAV वाला फंड SIP साठी निवडतिल. याच कारण अस की कमी NAV म्हणजे जास्त यूनिट्स मिळणार त्यामुळे जास्त फायदा होणार  असा असलेला गैरसमज.

Mutual Fund NAV म्हणजे काय?

NAV म्हणज Net Asset Value

म्यूचुअल फंडचा एक यूनिट घ्यायला तुम्हाला जी रक्कम द्यावी लागते तीच NAV असते.

कमी NAV vs जास्त NAV

आपण एक प्रॅक्टिकल एक्झॅम्पल घेऊयात आणि पुढे दिलेल्या दोन्ही फंड्सची तुलना करुन बघूयात. ( आधीच स्पष्ट करतो हे फंडस फक्त एक्झॅम्पल म्हणून घेतले आहेत, कोणता आर्थिक सल्ला नाही)

फंड नंबर 1: – Tata S&P BSE Sensex Index Fund (Direct Growth Plan)

फंड नंबर 2: – HDFC Index S&P BSE Sensex (Direct Growth Plan)

आता हे दोन्ही पण इंडेक्स फंड आहेत आणि एकाच प्रकारच्या इंडेक्सला कॉपी करतात ती म्हणजे S&P BSE Sensex.

फंड नंबर 1:  चालू NAV आहे = Rs 172.33

फंड नंबर 2:  चालू NAV आहे = Rs 614.08

पण आपल्याला या दोन्ही फंडसशी तुलना करायला त्यांच्या 5 वर्षा आधीची NAV लागतील आणि त्या पूढीलप्रमाणे

फंड नंबर 1: 5 वर्षा आधीची NAV = Rs 91.64

फंड नंबर 2: 5 वर्षा आधीची NAV = Rs 325.23

तुलना करू की कोणता फंड बेस्ट असेल?

समजा तुम्ही 5 वर्षाआधी या दोन्ही Mutual Funds मध्ये प्रत्येकी 10,000 रुपये इनवेस्ट केले होते.

फंड नंबर 1: – Tata S&P BSE Sensex Index Fund (Direct Growth Plan) हा फंड Sensex मधील 30 कंपन्यामध्ये पैसे इनवेस्ट करतो.

म्हणजे तुम्ही या फंडमध्ये जेव्हा 10,000 रुपये इनवेस्ट करता तर तुमचे 10,000 रुपये या 30 कंपन्यामध्ये थोडे थोडे इनवेस्ट केले जातात.

5 वर्षा आधी Rs 91.64 NAV च्या हिशोबाने तुम्हाला 10,000 रुपयांचे टोटल 109.12 यूनिट्स मिळाले.

10,000 / Rs 91.64 = 109.12 Units 

आणि या फंडची चालू NAV (जेव्हा मी ही पोस्ट लोहितोय) आहे Rs 172.33.

आणि जर आता आपण 5 वर्षाआधी मिलालेल्या यूनिट्स किंमत केली तर ती होते

109.12 Units * Rs 172.33 = Rs. 18804.64 

थोडक्यात काय तर आजच्या तारखेला 5 वर्ष आधी इनवेस्ट केलेल्या 10,000 ची किंमत आता 18,805 रुपये झाली आहे.

फंड नंबर 2: – HDFC Index S&P BSE Sensex (Direct Growth Plan) हा फंडसुद्धा Sensex* मधील 30 कंपन्यामध्ये पैसे इनवेस्ट करतो.

म्हणजे या फंडमध्ये 10,000 इनवेस्ट केले तर अगदी मागच्या फंडसारखे हे पैसे देखील भारताच्या टॉप 30 कंपन्यामध्ये इनवेस्ट केले जातात.

5 वर्षा आधी Rs 325.23 NAV च्या हिशोबाने तुम्हाला 10,000 रुपयांचे टोटल 30.74 यूनिट्स मिळाले. फक्त 30.74 यूनिट्स  अस तुम्हाला वाटत असेल.

10,000 / Rs 325.23 = 30.74 Units 

आणि या फंडची चालू NAV (जेव्हा मी ही पोस्ट लोहितोय) आहे Rs 614.08

आणि जर आता आपण 5 वर्षाआधी मिलालेल्या यूनिट्स किंमत केली तर ती होते

30.74 Units * Rs 614.08 = Rs 18,876.81

NAV कमी असो की जास्त फरक पडत नाही.

आपण दोन्ही फंडसची तुलना केली आणि या दोन्ही फंड्सच्या यूनिट्स आजच्या तारखेला किंमत जवळजवळ सारखी आहे.

आपला फंड नंबर 1 होता Tata S&P BSE Sensex Index Fund (Direct Growth Plan). या फंडच्या यूनिट्सची किंमत होत आहे Rs. 18804.64  

आणि आपला फंड नंबर 2 होता HDFC Index S&P BSE Sensex (Direct Growth Plan). या फंडच्या यूनिट्सची किंमत होत आहे Rs 18,876.81

तुम्ही एक गोष्ट नोटिस केलीत का फंड नंबर 2 ची NAV महाग होती तरी पण फायदा त्यात जास्तच झाला आहे. पण एवढा फारसा फरक नाहीये. फक्त Rs 72 चा फरक आहे.

आता खरा मुद्दा असा की

तुमच्या पैकी अनेकांना हेच वाटल असेल जिथे जास्त यूनिट्स मिळतील असा फंड घेण्यात खरा फायदा आहे. म्हणजे फंड नंबर 1.

पण आता कमी NAV म्हणजे चांगला फंड हा गैरसमज तुमच्या डोक्यातून पूर्णपणे निघाला असेल.

कमी NAV असो की जास्त फारसा फरक पडत नाही.  इंडेक्स फंड असो की इतर कोणताही फंड असो त्या फंडचा फंड मॅनेजर कसा काम करतो यावरून ठरत.

आणि इंडेक्स फंडबद्दल आपण समजु शकतो कारण इथे प्रतेक फंड मॅनेजरसाठी कंपन्या या त्याच असतात.

पण जेव्हा आपण Actice Fund मध्ये इनवेस्ट करतो जस की एखादा Small Cap Fund किंवा एखादा Mid Cap Fund इ. फंड निवडताना फंड मॅनेजर कसा आहे आणि तो किती रिसर्च करतो यावरून त्या फंडचा परफॉर्मेंस ठरतो.

त्यामुळे या पुढे कोणाताही फंड निवडताना कमी NAV म्हणजे बेस्ट फंड हा गैरसमज बाजूला ठेवा.

(Disclaimer: – या पोस्टमध्ये सांगितलेले फंड्स नक्कीच चांगले आहेत यात काही शंका नाही पण ते फक्त माहितीसाठी होते, आर्थिक सल्ला नाही. आणि जरी तुम्ही या पैकी एखाद्या फंडमध्ये इनवेस्ट केलत तर लॉन्ग टर्मसाठी करा.)


इतर काही महत्वाच्या पोस्ट नक्की वाचा:-


जेव्हा पण तुम्ही Investing ला सुरुवात कराल पहिला प्रश्न तुमच्या माइंडमध्ये येईल की Demat अकाऊंट कुठे ओपन करू. मला पण हाच प्रश्न पडला होता. 

मी Zerodha, Groww, Upstox, 5paisa आणि AngelOne वर Demat अकाऊंट ओपन करून पाहिले आणि त्यापैकी 2 ब्रोकर मी माझ्यासाठी निवडले. 

म्यूचुअल फंडसाठी – Groww

शेअर घेण्यासाठी – Zerodha Kite 

मला हे Apps वापरायला Easy वाटले यांचा User Interface सोपा वाटला आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे या कंपन्या मला Trustworthy वाटल्या. तुम्ही तुमच Demat अकाऊंट यामध्ये ओपन करू शकता. (Highly Recommended)

Happy Investing!

1 thought on “म्यूचुअल फंड कोणता घेऊ? कमी NAV vs जास्त NAV | Mutual Funds in Marathi”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi