Financial Freedom Mindset: आता एंजॉय नाही करणार तर मग म्हातारपणी करणार का?

Financial Freedom Mindset:

financial freedom marathi

आता एंजॉय नाही करणार तर मग म्हातारपणी करणार का? असा प्रश्न आपल्या पेजच्या एका फॉलोवरला त्याच्या मित्राने केला. आणि असा प्रश्न आपल्याला प्रत्येकाला कधी ना कधी एकायला मिळतो. पण ही एंजॉयमेंट नक्की काय आहे? तुमच्यासाठी एंजॉयमेंटची व्याख्या काय यावर आपण आज चर्चा करू?

मित्र बोलला, आता एंजॉय नाही करणार तर काय म्हातारपणी करणार? 

रतनचा मित्र नुकताच 2 लाखाच पर्सनल लोन काढून साऊथ इंडिया फिरायला गेला आहे. आता हे योग्य आहे की नाही यावर आपण चर्चा नाही करणार पण पर्सनल लोन 10%  पेक्षा जास्त इंटरेस्टने दिले जातात जे खूप होत. लोन हे सगळ्यात मोठा शत्रू असतो Financial Freedom च्या प्रवासात हे लक्षात ठेवा.

तुमच्यासाठी एंजॉयमेंटची व्याख्या काय? 

आता एजॉयमेंट काय हे आपल्या प्रत्येकासाठी पूर्णपणे वेगळ असू शकत. आपण वेगवेगळ्या ठिकाणी राहतो, लाइफ जगण्याचा आपला दृष्टिकोण हा पूर्णपणे वेगळा आहे. आणि त्यामुळे तुमच्यासाठी एंजॉयमेंट काय हे तुम्हालाच ठरवाव लागेल. जस की रतन बोलला,

कोणाला 5 स्टार हॉटेलमध्ये जावून खाणे एंजॉयमेंट असू शकते तर कोणासाठी starbucks मध्ये जावून कॉफीचा फोटो काढून स्टेटसला ठेवण्यात एंजॉयमेंट मिळू शकते. तर कोणासाठी चहाच्या टपरीवर चाय पिणे ही एंजॉयमेंट असू शकते (मी यापैकी एक आहे)

याचा अर्थ असा की तुम्ही जिथे खुश आहात किंवा जे करून तुम्हाला आनंद मिळतो तीच असते तुमची एंजॉयमेंट.

Demotivate करणारे लोक भेटतात अशा वेळी काय करायच? 

आता आपण सगळे जण आपल्या  Financial Freedom च्या प्रवासात आहोत. जस आणि जितक शक्य होईल तेवढ आपण सेव आणि इनवेस्ट करत आहोत. आता हे सगळ करताना लोक तुम्हाला भेटणार जे तुम्हाला कंजूस बोलतील. काही खर्च करत नाही अस बोलतील पण तुम्ही फोकस रहा. तुम्हाला तुमच गोल अगदी स्पष्ट दिसल पाहिजे.

आता मी माझ उदाहरण देऊ तर मी 2018 पासून फक्त ब्लॅक,व्हाइट आणि नेवि ब्ल्यु  कलरचे कपडे घालतो. आता गावी गेलो की कोण ना कोणतरी बोलतच “अरे तुझ्याकडे दुसरे कलर नाहीयेत का? आता मी यावर प्रत्येकाला काय उत्तर देऊ म्हणून सरल इंगनोर करतो नाहीतर बोलतो घेण पुढच्या वेळी दुसरा कलर घेईन बोलून मोकळा होतो. कारण आता मला माझ्या कपड्यांनी कोणाला इम्प्रेस करावस नाही वाटत. त्यापेक्षा मी कोणाला माझ्या कामाने किंवा माझ्या नॉलेजने इम्प्रेस करेन. अस मला वाटत.

गावी आपण सगळे जातो. गणपती असो किंवा शिमगा. खूप जण भेटतात. गावी कोणाची हळद असेल तर मग पिण्याचा प्रोग्राम तर झालाच पाहिजे. आता मी आणि दादा ड्रिंक करत नाही पण बाजूला बसून कधी चणे शेंगदाणे नक्कीच खातो. आता ते लोक ड्रिंक करतात म्हणून चुकीच अस आपण अजिबात बोलून चालणार नाही. त्यांना ड्रिंक करून एंजॉयमेंट वाटते तर ते योग्य आहे.

तुम्हाला कशात एंजॉयमेंट मिळते हे ठरवा आणि तीच काम करा. 

मी बुक्स वाचतो, तुमच्यासाठी इनस्टा पेजवर आणि आता या ब्लॉगवर पोस्ट लोहितो, यातूनमला आनंद मिळतो. अगदी तसंच तुम्हाला आता फिरायला न जाता तेच पैसे इनवेस्ट करून आनंद मिळणार असेल तर तस करा. तुमच्या लाइफ निर्णय आजूबाजूच्या लोकांच्या सांगण्यावरून घेऊ नका.  तुमच ध्येय आहे Financial Freedom गाठायच आहे . आणि त्यासोबत एंजॉय पण करा पण ते तुमच्या पद्धतीने. आणि हो प्रत्येक वेळी फक्त इनवेस्टिंग, स्टॉक मार्केट हे सगळ नको. लाइफची एंजॉयमेंट आणि Financial प्लॅनिंग यात तुम्हाला बॅलेन्स बनवता आला पाहिजे. तरच लाइफ जगण्यात मज्जा येईल.

Happy Investing!

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance) 

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

5 Money Lies: पैशाबद्दलचे 5 गैरसमज (जे आपण सहज मान्य करत आलोय) 

श्रीमंत व्यक्तींच्या 5 सवयी (ज्या तुम्ही विकसित केल्या पाहिजेत) Nova Agritech IPO GMP: ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? BLS-E Services IPO: अप्लाय करण्याआधी डीटेल माहिती वाचा डिटेल माहिती: HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य कस मिळेल? | 3 Steps of Financial Freedom in Marathi