Investing Success Story: फक्त एका स्टॉकमधून 70 मिलियन डॉलर बनविले!

Rate this post

Investing Success Story of Theodore Johnson

थिओडर जॉन्सन यांचा जन्म 1903 मध्ये झाला आणि वयाच्या 91 वर्षी 1993 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. 1923 ते 1952 म्हणजे जवळजवळ 29 वर्ष त्यांनी युनायटेड पार्सल सर्विस (UPS)  या कंपनीमध्ये काम केलं.  जेव्हा ते या कंपनीमध्ये जॉईन झाले तेव्हा त्यांची सॅलरी आठवड्याला 25 डॉलरअशी होती. आणि 1952 मध्ये जे व्हा ते रिटायर झाले तेव्हा त्यांची सॅलरी आठवड्याला 270 डॉलर एवढी होती.  जर आपण टोटल गणित केलं तर त्यांची वर्षाची सॅलरी 14000 डॉलर एवढी होत. ( आजच्या तारखेला 14000 डॉलर 11,63,299.90 एवढे होतात. पण मुद्दा पैसे नाहीये तर हा स्टोरीमधील धडा त्यासाठी स्टोरी पूर्ण वाचा. 

जॉन्सन यांना एक चांगली सवय होती ती म्हणजे दर महिन्याला सॅलरीमधील 25% रक्कम इनवेस्ट करायची. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की, त्यांनी ही 25 टक्के रक्कम फक्त एका स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केली होती आणि तो स्टॉक होता UPS, ज्या कंपनीमध्ये ते काम करायचे.  1952 मध्ये जॉन्सन जेव्हा रिटायर झाले तेव्हा त्यांच्या यूपीएस स्टॉक्सची किंमत जवळ जवळ 7 लाख डॉलर एवढी होती. त्यांनी या रकमेला कधी हात सुद्धा लावला नाही.  एवढ्या रकमेवर जरी त्यांना  2 % Dividend मिळाला तरी त्यांची पुढची लाईफ अगदी आरामात  जगू शकत होते. 

1991 मध्ये रिटायरमेंटनंतर जवळजवळ 39 वर्षांनी त्यांच्या UPS स्टॉकची किंमत 70 मिलियन डॉलर एवढी होती. (जी आजच्या तारखेला  5,81,64,47,000 एवढी होते तुम्ही आरामात वाचा) त्यासोबत या स्टॉकवर मिळालेळी Dividend इन्कम आपण बघितली तर ती वर्षाला 1.4 मिलियन डॉलर एवढी होत होती. (जी आजच्या तारखेला 11,63,30,270 हे पण आरामात वाचा) 1993 मध्ये जेव्हा जॉन्सन यांचा  मृत्यू झाला तेव्हा त्यांनी त्यांच्या वेल्थमधील मोठा हिस्सा त्यांचा मुलगा आणि दोन नातवाना दिला.  तसेच 36 मिलियन डॉलर त्यांनी चॅरिटेबल ट्रस्टना दान केले. 

 Investing Success Story मधून आपल्याला काय शिकायला मिळत? 

काही जण बोलतील अरे ती तर अमेरिका होती आपण भारतात राहतो. जरी अमेरिकेत पैसे जास्त असले तरी खर्च पण तेवढेच असतात हे लक्षात घ्या. आणि आता येऊ मेन पॉइंटवर तो म्हणजे, आपण सुद्धा आता बऱ्यापैकी कमवायला लागलो आहोत आणि जे कॉलेजमध्ये आहेत ते सुद्धा काही वर्षानी कमवायला लागतील. 

आपण सुद्धा आपल्या सॅलरीमधील 25% रक्कम सेव करू शकतो आणि ती इनवेस्ट करू शकतो. जॉन्सनप्रमाणे सगळी रक्कम फक्त एका स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचा सल्ला मी तर देणार नाही पण आपण एखादा चांगला इंडेक्स फंड किंवा Active म्युच्युअल फंड नक्कीच निवडू शकतो किंवा जर तुम्हाला चांगले स्टॉक निवडता येत असतील तर 10 -12 स्टॉकचा एक लॉन्ग टर्म पोर्टफोलिओ बनवू शकतो.  जर पुढील वीस वर्ष जर तुम्ही प्रामाणिकपणे ही 25 टक्के रक्कम सेव आणि इन्वेस्ट केलीत तर तुम्ही सुद्धा चांगली वेल्थ बनवू शकता यात मला तर काहीच शंका वाटत नाही.

खालील काही टिप्स तुमची हेल्प करतील. 

  • जशी सॅलरी होईल 25 टक्के रक्कम ही स्वतःसाठी द्या आणि ती इनवेस्ट करा. 
  • मार्केट कसेही असू दे, न चुकता ही 25 टक्के रक्कम एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये इनवेस्ट करा किंवा स्टॉक SIP करा. 
  • पावर ऑफ Compounding चा पूर्ण फायदा घेण्यासाठी तुम्हाला संयम बाळगावा लागेल. 
  • 2024 येत आहे, पुढचे 240 महिने न चुकता इन्वेस्ट करुयात, बघुयात काय होतं. (मी पण एथे आहे आणि तुम्ही पण आहात) 
  • सुरुवातीला 25% जर नाही जमले तर 10% करा पण सुरवात करा.
  • मी यासाठी एक फंड निवडला आहे तो म्हणजे Zerodha Nifty Large Midcap 250 Index Fund

ALL THE BEST भावांनो आणि बहिणींनो!👍

सपोर्ट मराठी फायनान्स ब्लॉग 🙏

जेव्हा तुम्ही या ब्लॉगवरील एड्सवर क्लिक करता त्यामुळे या ब्लॉगला हेल्प होते आणि त्यातूनच आम्ही या ब्लॉगवर माहितीपूर्ण पोस्ट तुमच्यासाठी घेऊन येत राहू तेही लाईफटाईम फ्री. मराठी फायनान्स ब्लॉगला सपोर्ट करण्यासाठी खूप खूप आभार!  Keep Learning & Keep Supporting! 💡🙏

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

Career in Share Market: शेअर मार्केटमध्ये कोणते करियर ऑप्शन आहेत?

Financial Freedom Mindset: आता एंजॉय नाही करणार तर मग म्हातारपणी करणार का? 

Finance & Family: माझ्या बायकोला (किंवा GF) फायनॅन्समध्ये काही इंटेरेस्ट नाहीये. (मी काय करू) 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi