DOMS IPO: – डॉम्स आयपीओची किंमत झाली फिक्स 750-790 रुपये प्रति शेअर

Rate this post

DOMS IPO Price Details

DOMS इंडस्ट्रीज IPO (Initial Public Offering) द्वारे ₹1200 कोटी उभारणार आहे. DOMS IPO 13 डिसेंबर रोजी उघडेल आणि 15 डिसेंबर रोजी बंद होईल. डॉम्स आयपीओची  किंमत बँड ₹750 ते ₹790 प्रति शेअर निश्चित केला आहे.

डॉम्स आयपीओ घेताना तुम्हाला एका लॉटमध्ये कमीत काकी ₹14,220 रुपये देऊन टोटल 18 शेअर्स घ्यावे लागणार आहेत.  रीटेल इन्वेस्टर (आपल्यासारखे साधे इन्वेस्टर) टोटल 14 लॉटसाठी अप्लाय करू शकतात. यामध्ये तुम्हाला टोटल  252 शेअर्स मिळतील आणि यासाठी तुम्हाला ₹199,080 एवढी रक्कम द्यावी लागेल. 

डॉम्स आयपीओद्वारे सुमारे ₹1200 करोंड उभारणार आहे ज्यामध्ये ₹250 करोंडचा फ्रेश इश्यू आहे. आणि बाकी उरलेली रक्कम म्हणजे ₹850 करोड रुपये ही ऑफर फॉर सेल (Offer for Sale) असेल. थोडक्यात काय तर कंपनीचे मालक त्यांचे शेअर्स पब्लिकला विकणार आहेत.

DOMS IPO Quota Details 

डॉम्स आयपी मध्ये रिटेल इन्वेस्टर साठी 10% चा कोटा असेल तसेच QIB (Qualified Institutional Investors) ज्यामध्ये यामध्ये मोठ मोठ्या Mutual Funds कंपन्या, पेन्शन फंड, Insurance कंपन्या, बँका इत्यादिचां समावेश होतो आणि त्यांच्यासाठी  75% कोटा असेल.  आणि HNI (High-Net-Worth Individual) साठी 15% कोटा आहे.

डॉम्स आयपीओची ग्रे मार्केटमध्ये किंमत 400 स्तरावर खूप मजबूत दिसते; डॉम्स आयपीओ हा मार्केटच्या अंदाजानुसार आणि ग्रे मार्केटने सूचित केल्यानुसार प्रीमियमवर लिस्ट होईल अशी अशा आहे. 

DOMS Industries Company Details

DOMS Industries Limited ही वलसाड, गुजरात येथे स्थित एक भारतीय स्टेशनरी आणि कला साहित्य निर्मिती कंपनी आहे. कंपनीची स्थापना 1976 मध्ये एक पार्टनरशिप फर्म ,  आर.आर. इंडस्ट्रीज या नावाने झाली.  रसिकलाल अमृतलाल रवेशिया आणि मनसुखलाल जमनादास रजानीयांनी 2005 मध्ये त्यांचा प्रमुख ब्रँड “DOMS” लाँच केला.

ही कंपनी भारतातील ‘स्टेशनरी आणि आर्ट’ प्रॉडक्टच्या मार्केटमधील आघाडीची खेळाडू आणि ब्रँड असलेली एक समग्र प्रॉडक्ट कंपनी आहे. DOMS कंपनीचे 31 मार्च 2023 पर्यंत देशांतर्गत मार्केटमध्ये तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर 40 पेक्षा जास्त देशांमध्ये आमच्या प्रमुख ब्रँड ‘DOMS’ अंतर्गत या प्रॉडक्टच डिझाइन, निर्मिती आणि विक्री करतात. त्यांची मुख्य प्रॉडक्ट जसे की ‘पेन्सिल’ आणि ‘मॅथेमॅटिकल इन्स्ट्रुमेंट बॉक्स’ यांचा मार्केटमध्ये चांगला हिस्सा घेतात.  2023 मध्ये आकड्यानुसार पेन्सिल मार्केटमध्ये 29% आणि मॅथेमॅटिकल इन्स्ट्रुमेंट बॉक्समध्ये 30% मार्केट शेअर आहे. 

DOMS Industries Peoduct Details

DOMS ग्राहकांना चांगल्या प्रकारे डिझाइन केलेली आणि दर्जेदार ‘स्टेशनरी आणि आर्ट मटेरियल’ उत्पादने देते, ज्याचे आम्ही सात कॅटेगरीमध्ये वर्गीकरण करतो: (i) शैक्षणिक स्टेशनरी; (ii) शैक्षणिक कला साहित्य; (iii) कागदी स्टेशनरी; (iv) किट आणि कॉम्बो; (v) कार्यालयीन पुरवठा; (vi) छंद आणि हस्तकला; आणि (vii) ललित कला उत्पादने. कंपनीचे अमेरिका, आफ्रिका, आशिया पॅसिफिक, युरोप आणि मध्य पूर्व मध्ये मजबूत, जागतिक Multi Channel Distribution नेटवर्क आहे.

DOMS IPO चा हेतू काय आहे?

आयपीओतून येणारे पैसे दोन प्राथमिक कारणांसाठी वापरले जातील. पहिलं म्हणजे, DOMS नवीन मॅन्युफॅक्चरिंगची सुविधा  स्थापन करण्यासाठी हा पैसा वापरला जाईल.   या नवीन मॅन्युफॅक्चरिंगच्या मदतीने नवीन लेखन उपकरणे, वॉटर कलर पेन, मार्कर आणि हायलाइटरसाठी उत्पादन क्षमता वाढवली जाईल. दुसरे म्हणजे, IPO मधून जमा झालेला पैसा इतर कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरला जाईल. 

Details Values
IPO Opening Date 13th December 2023
IPO Closing Date 15th December 2023
IPO Price Range ₹750 to ₹790 per share
Lot Size 18 shares
Retail Investor Lots 14 lots (252 shares)
Total Amount for Retail ₹199,080
Total IPO Size ₹1,200 crores
Fresh Issue ₹250 crores
Offer for Sale ₹850 crores.
Retail Investor Quota 10%
QIB Quota 75%
HNI Quota 15%
GMP (Grey Market Premium) ₹400
Company Location Valsad, Gujarat
Establishment Year 1976 (as R.R. Industries)
Brand Launch Year 2005 (as DOMS)
Main Products Pencils, Mathematical Instrument Boxes
Market Share (2023) 29% (Pencils), 30% (Mathematical Instrument Boxes)
Categories Educational Stationery, Art Materials, Paper Stationery, Kit and Combo, Office Supplies, Chant and Handicraft, Fine Art Products
Global Presence Strong Multi-Channel Distribution Network in America, Africa, Asia-Pacific, Europe, and the Middle East

 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance) 

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

लवकरच येतोय DOMS IPO: – तारीख, कंपनी माहिती,ओव्हरव्ह्यू 

Zomato Share: – सॉफ्टबँक झोमॅटोमधील 1.1% ची हिस्सेदारी विकणार (उद्या शेअर पडणार?) 

2 thoughts on “DOMS IPO: – डॉम्स आयपीओची किंमत झाली फिक्स 750-790 रुपये प्रति शेअर”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi