Health Insurance Cashless Everywhere: हॉस्पिटल कोणतेही असो, तुमच्या खिशातून बिलाचे पैसे भरायची गरज नाही

Rate this post

Health Insurance Cashless Claim in Marathi: नुकतंच ही न्यूज आलीय की जनरल इन्शुरेंस काऊंसिलने (General Insurance Council) सगळ्या जनरल इन्शुरेंस कंपन्या आणि हेल्थ इन्शुरेंस कंपन्यासोबत चर्चा करून Cashless Everywhere ही सुविधा चालू केली आहे. याचा फायदा तुम्हाला कसा होणार हेच आपण या पोस्टमध्ये समजून घेऊ. पण त्याआधी

Health Insurance Cashless Claim नक्की आहे काय? 

जेव्हा तुम्ही एखादी हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी घेता, त्यानंतर तुम्ही एखाद्या आजारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती झालात तर त्याच बिल हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी भरते. पण यामध्ये एक प्रॉब्लेम असा होता की सगळेच हॉस्पिटल Cashless Claim ची सुविधा देत नाही.

Cashless Claim म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये भरती झालात आणि जे बिल येईल ते तुम्हाला भराव लागत नाही. तुम्ही फक्त तुमचा पॉलिसी नंबर हॉस्पिटलच्या स्टाफला द्यायचा जे बिल भरायची कामे करत असतात. आता हॉस्पिटल आणि तुमची हेल्थ इन्शुरेंस कंपनी तुमच्या हॉस्पिटल बिलचे पैसे भरून टाकते.

यामध्ये तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे भरायची गरज नाही. पण यासाठी तुम्ही अशा हॉस्पिटलमध्ये भरती झाले पाहिजे जे हॉस्पिटल त्या इन्शुरेंस कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये सामील आहे. आता हे नेटवर्क हॉस्पिटल काय? हेल्थ इन्शुरेंस कंपनी जगभरातील हॉस्पिटलसोबत Tie up करून ठेवते जेणेकरून कस्टमरला Cashless Claim मिळेल. आणि क्लेमची प्रोसेस पटापट होईल.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)

पण तुम्ही अशा हॉस्पिटलमध्ये भरती झालात जे इन्शुरेंस कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये नाहीये तर मग काय होईल? 

समजा तुमचा Accident झाला आणि तुमच्या हाताला लागल. तुम्हाला लगेच उपचाराची गरज आहे. आता अशा वेळी तुम्ही हे तर बघत बसणार नाही की मी ज्या हेल्थ इन्शुरेंस कंपनीची पॉलिसी घेतली आहे त्या कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये मला भरती व्हायच आहे.

तुम्ही जे हॉस्पिटल जवळ असेल त्यामध्ये भरती होणार आणि उपचाराला सुरुवात करणार. आता तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये भरती झाला आहात ते तुमच्या हेल्थ इन्शुरेंस कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये नाहीच आहे. मग हॉस्पिटल सगळ बिल तुम्हाला तुमच्या खिशातून भराव लागत आणि मग त्या सगळ्याची बिले तुमच्या हेल्थ इन्शुरेंस कंपनीकडे द्यावी लागतात.

आणि मग तुमची हेल्थ इन्शुरेंस कंपनी तुम्हाला तुमचे पैसे रिटर्न करते.

Cashless Everywhere च्या सुविधेमुळे हा प्रॉब्लेम आता संपला आहे. 

आता तुम्ही आजारी पडलात काय किंवा एखादा Accident झाला काय. आता तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलमध्ये भरती व्हा. ते हॉस्पिटल तुमच्या हेल्थ इन्शुरेंस कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये असो की नसो तुम्हाला आता तुमच्या खिशातून हॉस्पिटलच्या बिलाचे पैसे भरावे लागणार नाहीत.

तुम्ही तुमचा पॉलिसी नंबर द्या आणि सोबत हॉस्पिटलला जे काही फॉर्म भरा. तुमची हेल्थ इन्शुरेंस कंपनी डायरेक्ट बिलाचे पैसे तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये भरती झाला आहात त्यांना देतील.

Cashless Everywhere चा फायदा घेण्यासाठी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भरती व्हायच्या आधी 48 तास अगोदर तुमच्या हेल्थ इन्शुरेंस कंपनीला कळवायच  आहे जस की एखाद ऑपरेशन वेगेरे करायच असेल. आणि जेव्हा एखादी एमर्जन्सि असेल जस की Accident वेगेरे तेव्हा हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर 48 तासाच्या आतमध्ये तुम्हाला इन्शुरेंस कंपनीला कळवायचा आहे.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉हेल्थ इन्शुरेंस काय आहे? फायदे आणि तोटे जाणून घ्या (Health Insurance in Marathi) (marathifinance.net)

2 thoughts on “Health Insurance Cashless Everywhere: हॉस्पिटल कोणतेही असो, तुमच्या खिशातून बिलाचे पैसे भरायची गरज नाही”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi