हेल्थ इन्शुरेंसचे फायदे आणि तोटे जाणून घ्या | Advantages and Disadvantages of Health Insurance in Marathi

Rate this post

हेल्थ इन्शुरेंस (Health Insurance) हा तुमच्या आर्थिक प्लॅनिंगमधील एक महत्वाचा भाग आहे. अचानक येणाऱ्या एखाद्या मेडिकल एमर्जन्सिच्या खर्चासाठी काढला जाणारा इन्शुरेंस म्हणजे हेल्थ इन्शुरेंस होय. 

मागच्या ब्लॉग पोस्टमध्ये आपण डीटेलमध्ये समजून घेतल की हेल्थ इन्शुरेंस (Health Insurance) काय आहे आणि त्याचे किती प्रकार असतात. (तुम्ही वाचल नसेल तर नक्की वाचा) 

आजच्या पोस्टमध्ये आपण हेल्थ इन्शुरेंस (Health Insurance) चे फायदे आणि तोटे यावर डीटेल चर्चा करणार आहोत. चला तर सुरुवात करूया!

हेल्थ इन्शुरेंस (Health Insurance) चे फायदे 
1) मेडिकल इमर्जन्सी खर्च

जेव्हा पण एखादी मेडिकल इमर्जन्सी येते तेव्हा हेल्थ इन्शुरेंसच्या मदतीने सोबत येणारा खर्च भरता येतो. अचानकपणे येणारं एखादं आजारपण किंवा अपघात या सगळ्यासाठी आर्थकदृष्टया तयार राहणे फार गरजेचं आहे आणि यासाठी हेल्थ इन्शुरेंस एक बेस्ट पर्याय आहे कारण आजकाल जरा हॉस्पिटलमध्ये गेलो तरी हे एवढ मोठ बिल तयार होत. 

2) नियमित चेक-अप आणि डोस

नियमितपणे मिळणारे डोस, चेक अप एक Healthy Lifestyle जगण्यासाठी आवश्यक असतात. आणि काही Health Issue असल्यास तो मोठा होण्याआधीच त्यावर उपचार केला जातो. काही अशा Insurance Policies आहेत ज्या हे नेहमीचे चेक अप, इतर डोसचे खर्च कव्हर करतात. त्यामूळे आयत्या वेळी तुमच्यावर कसला भार येत नाही.

3) गोळ्या औषधांचा खर्च व स्वास्थ्य खर्च कव्हर करणारी सुविधा

अनेक हेल्थ इन्शुरेंस प्लॅन्समध्ये डॉक्टरने लिहून दिलेल्या गोळ्या औषधांचा खर्च कव्हर करण्याची सुविधा असते. याचा फायदा असा होतो अनेकदा ही गोळ्या औषध खूप महाग असतात. आणि तुमच्याकडे जर हेल्थ इन्शुरेंस  असेल तर याचा खर्च तुम्ही त्यातून करू शकता.

तुम्हाला तुमच्या खिशातून पैसै द्यायची गरज नाही लागणार. तसेच outpatient department (OPD) चे खर्च देखील हेल्थ इन्शुरेंसच्या मदतीने भरता येतात. OPD म्हणजे जिथे तुम्ही हॉस्पिटलमध्ये भरती होत नाही, डॉक्टर घरी येऊन उपचार करतो)

4) आजाराच्या खर्चांची टेन्शन नाही

जर तुमच्याकडे हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी असेल तर कोणताही मोठा आजार येऊदेत तुमच्या डोक्याला त्या आजारपणाचा खर्च कसा करायचा याचं टेन्शन येणार नाही. अचानक येणाऱ्या आजारांच्या खर्चावर मात करण्यासाठी एक विश्वासू सिस्टीम म्हणजे हेल्थ इन्शुरेंस  तुम्ही आधीच घेऊन ठेवली आहे. त्यामुळे तुम्ही लाईफ अगदी टेन्शन फ्री जगू शकता.

5) Cashless Hospitalization चा फायदा

हेल्थ इन्शुरेंसचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे Cashless Hospitalization. थोडक्यात काय तर तुम्हाला हॉस्पिटलचे बिल भरायची गरज नाही फक्त हेल्थ इन्शुरेंस कंपनीने दिलेल कार्ड किंवा पॉलिसी नंबर तुम्हाला हॉस्पिटलला द्यायचा आहे.

हॉस्पिटलवाले तुमच्या हेल्थ इन्शुरेंस कंपनीशी काँटक्ट करून त्यांचे बिल भरून घेतात. त्यामुळे आजारपणाच्या वेळी पैसा कसा जमा करायचां याच टेन्शन तुमच्या डोक्यावरून कमी होत.

6) टॅक्स बेनेफिट देणारा सेक्शन 80D

काय तुम्हाला माहित आहे? तुम्ही जे हेल्थ इन्शुरेंस प्रीमियम भरता त्यावर टॅक्स बेनेफिट घेता येतो. इन्कम टॅक्स ॲक्टच्या अनुसार सेक्शन 80D च्या अंतर्गत तुम्हाला टॅक्स Deduction घेता येतं. याचा फायदा असा होतो की तुम्ही जे पैसे प्रीमियमला भरणार ती रक्कम तुमच्या टोटल इन्कममधून कमी दिसेल आणि त्यामुळे टॅक्स भरताना तुम्ही कमी इन्कम दाखवू शकता.

7) इतर अतिरिक्त फायदे

हेल्थ इन्शुरेंससोबत इतर अनेक फायदे येतात जस की क्रिटिकल इलनेस कव्हर, Maternity Benefits, Ambulance Services इ. तुम्ही तुमच्या गरजेनुसार अजुन काही Extra Benefits तुमच्या हेल्थ इन्शुरेंस पॉलिसीमध्ये Add करू शकता.

इतर पोस्ट वाचा 👉हेल्थ इन्शुरेंस Co-Payment म्हणजे काय?

Health Insurance चे तोटे 
1) प्रीमियमचा खर्च येतो

पहिलं कारण ज्यामुळे हेल्थ इन्शुरेंस घ्यायला अनेकजण टाळाटाळ करतात ते म्हणजे त्याच प्रीमियम खुप महाग असत अस त्यांना वाटत असत. एखाद्या मोठ्या आजाराच्या खर्चापेक्षा इन्शुरेंसच प्रीमियम हे नक्कीच कमी असेल. 

पण एक गोष्ट लक्षात घ्या की जस जस तुमचं वय वाढत जाणार प्रीमियमसुद्धा वाढत जाणार. आणि तुम्हाला प्रीमियम किती भराव लागेल हे तुमच्या हेल्थ , फिटनेस लेवल, मेडिकल हिस्ट्री इ. गोष्टींवर अवलंबुन असते. 

2) Limitations and Exclusions

काही मेडिकल पॉलिसी या काही नियम आणि अटीसोबत येतात. कोणतीही पॉलिसी घेताना सगळ्यात आधी Terms आणि Conditions नीट समजून घ्या. काहीं आजार किंवा मेडिकल खर्च काही वेळा पॉलिसीसोबत दिले जात नाहीत.

एक उदाहरण घ्यायचं झालं तर, जर एखाद्याला पॉलिसी घेण्याआधीच एखादा मोठा आजार असेल तर त्याचा खर्च हेल्थ इन्शुरेंस कमोनी काही वर्षानी म्हणजेच 3-4 वर्षांनी द्यायला तयार होते. त्याआधी हा सगळा खर्च तुम्हाला करायचां असतो. 

3) Waiting Period and Pre-existing Conditions

जस की आपण आताच चर्चा केली की काही हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी काही आजारांना कव्हर करत नाही त्यासाठी एक वेटिंग पिरियड असतो जो पॉलिसी होल्डरला कम्प्लीट करावा लागतो. त्यामुळे कोणतीही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेताना एखाद्या आजारासाठी किती वेटिंग पिरेड आहे हे आवर्जून चेक करा. 

4) Terms and Conditions नीट वाचा

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेताना नेहमी टर्म्स अँड कंडिशन्स नीट वाचून आणि समजून घ्या. खूप बारीक बारीक अक्षरात लिहिलेले असतात, वाचायला कंटाळा येतो त्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि हाच मोठा अडथळा बनतो ज्यावेळी क्लेमची वेळ येते.

तुमच्या पॉलिसीमध्ये कोणते लिमिटेशन्स तर नाहीयेत ना, कंडिशन तर नाहीये ना? या सगळ्याची नीट शहानिशा करा आणि मगच Health Insurance पॉलिसी घ्या. 

5) खर्च आणि फायदे किती ते बघा

हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला इमर्जन्सीच्या वेळी पैशाची मदत करते पण ते घेताना तुम्हाला जास्त खर्च तर येत नाही किंवा तुमच्या खिशातून जास्त पैसे तर जात नाहीये याचा अभ्यास करा आणि तुमच्या बजेटनुसार एक चांगली Health Insurance पॉलिसी घ्या.

पोस्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा. काही Feedback असेल तर कमेन्टमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या पोस्टमध्ये!

इतर पोस्ट वाचा 👉Best Health Insurance Policy कशी निवडाल? 

1 thought on “हेल्थ इन्शुरेंसचे फायदे आणि तोटे जाणून घ्या | Advantages and Disadvantages of Health Insurance in Marathi”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi