Atal Pension Yojana: काय आहे आणि तुम्ही घेतली पाहिजे का?

Rate this post

atal pension Yojana

मनोजला हा प्रश्न पडला आहे आणि याच उत्तर त्याला या पोस्टमध्ये मिळेलंच पण त्यासोबत तुमच्या मनात असा प्रश्न असेल किंवा अटल पेंशन योजना नक्की काय हे समजून घ्यायच असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठीच लिहिली आहे.

Atal Pension Yojana: – अटल पेन्शन योजना (APY) ही भारत सरकारने सुरू केलेली पेन्शन योजना आहे. अटल पेन्शन योजना विशेषत: असंघटित क्षेत्रात (Unorganized Sector) काम करणाऱ्या लोकांसाठी तयार करण्यात आली आहे ज्यांना कोणतीही फॉर्मल पेन्शन योजना उपलब्ध नाही. ही योजना पहिल्यांदा 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. ही योजना तुम्हाला वयाच्या ६० वर्षानंतर दर महिन्याला पेन्शन देते. आणि तुम्हाला किती पेन्शन मिळेल हे तुम्ही या योजनेत दरमहा किती पैसे जमा करता यावर आधारित असेल.

अटल पेन्शन योजनेसाठी पात्रता

 • तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
 • तुमचे वय १८ ते ४० च्या दरम्यान असावे
 • तुम्ही इतर कोणत्याही पेन्शन प्रणाली (जसे की National Pension System (NPS) आणि Employees’ Provident Fund (EPF) अंतर्गत समाविष्ट नाही असले पाहिजेत.

अटल पेन्शन योजनेचे फायदे

1) दर महिन्याला गॅरंटीड पेन्शन

जेव्हा तुम्ही या योजनेत पैसे गुंतवता तेव्हा वयाच्या ६० वर्षांनंतर तुम्हाला रु. 1000, रु. 2000, रु. 3000, रु. 4000, किंवा रु. तुम्हाला 5000 रुपये पेन्शन मिळेल. पण तुम्हाला किती पेन्शन मिळेल यावर तुम्ही या योजनेत किती पैसे गुंतवले आहेत यावर अवलंबून असेल.

2) टॅक्स बचत 

Atal Pension Yojana त तुम्ही जे काही पैसे जमा करता त्यावर तुम्ही Tax Deduction घेऊ शकता. आणि हे Deduction  इन्कम टॅक्स Act, 1961 अंतर्गत कलम 80CCD (1) अंतर्गत मिळते.

3) Death benefit

अटल पेन्शन योजनेच्या सब्स्क्राइबरचा वयाच्या ६० वर्षापूर्वी मृत्यू झाल्यास, या योजनेचा सर्व बेनिफिट त्याच्या जोडीदाराला (पती किंवा पत्नी) दिले जातील. या दोघांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या नॉमिनीला या योजनेचा बेनिफिट दिल जाईल.

4) तुमच्या आवडीनुसार रक्कम निवडा

जर तुम्हाला या योजनेत पैसे गुंतवायचे असतील तर त्यासाठी कोणतीही निश्चित रक्कम नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार रक्कम ठरवू शकता. पण तुम्ही जितके जास्त पैसे गुंतवाल तेवढा जास्त फायदा तुम्हाला म्हातारपणात होईल.

5) पाहिजे तेव्हा बँक बदलण्याची सुविधा

असे बरेचदा घडते की, कामामुळे लोक आपले राहते घर बदलत राहतात, कधी या शहरात तर कधी त्या. अशा वेळी तुम्ही Atal Pension Yojana इतर कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करू शकता.

Atal Pension Yojana Contribution 

Atal Pension Yojana साठी तुम्ही प्लॅन घ्याल हे तुमची कमाई आणि वय यावर अवलंबून असेल. पण लक्षात ठेवा, तुम्ही आता जितके जास्त पैसे द्याल तितके जास्त पेन्शन तुम्हाला नंतर मिळेल. तुम्ही किती पैसे गुंतवले आहेत त्यानुसार तुम्हाला किती पेन्शन मिळेल हे पाहण्यासाठी खालील टेबलवर लक्ष द्या.

Age at Entry Pension Amount (Rs.) Monthly Contribution (Rs.)
18-22 1000 42
18-22 2000 84
18-22 3000 126
18-22 4000 168
18-22 5000 210
23-27 1000 53
23-27 2000 106
23-27 3000 159
23-27 4000 212
23-27 5000 265
28-32 1000 67
28-32 2000 134
28-32 3000 201
28-32 4000 268
28-32 5000 335
33-37 1000 85
33-37 2000 170
33-37 3000 255
33-37 4000 340
33-37 5000 426
38-40 1000 113
38-40 2000 226
38-40 3000 339
38-40 4000 452
38-40 5000 565

अटल पेन्शन योजनेत जॉइन कराल? 

 • तुमची जवळची बँक जिथे तुमचे बँक खाते किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जा
 • तुम्ही तिथे अAtal Pension Yojana चा फॉर्म भरू शकता
 •  तुम्हाला या योजनेत भरायची असलेली रक्कम निश्चित करा
 • तुम्हाला तुमचे APY स्टेटमेंट एका Unique Account Number दिल जाईल. (जो तुम्हाला सुरक्षित ठेवण्याची आवश्यकता आहे).

Mode of Contribution 

 • या योजनेत तुम्ही महिन्यातून एकदा पैसे जमा करू शकता.
 • किंवा तुम्ही ते Quartely म्हणजे दर तीन महिन्यांनी करू शकता.
 • किंवा तुम्ही वर्षातून दोनदा म्हणजे Half Yearly पैसे जमा करू शकता.
 • तुम्ही तुमच्या सोयीनुसार पैसे भरण्याची तारीख ठरवू शकता.

अटल पेन्शन योजनेत पैसे भरण्यात डिफॉल्ट केला तर 

 • तुमच्या अटल पेन्शन योजनेत पैसे भरायच्या तारखेला तुम्ही तुमच्या बँक खात्यात अतिरिक्तबॅलेन्स न ठेवल्यास, डिफॉल्ट होईल आणि त्यासाठी तुम्हाला दंडही भरावा लागेल.
 • ज्या महिन्यात तुम्ही रक्कम भरणार नाही, अशा वेळी पुढच्या महिन्यात  तुमच्या बँक खात्यातून व्याजासह पैसे कापले जातील.
 • प्रत्येक 100 रुपयांसाठी 1 रुपये पेनॉल्टी आहे.

समजा तुम्ही Atal Pension Yojana त 1000 रुपये जमा करत आहात पण काही प्रॉब्लेम आला आणि तुम्ही या महिन्याचे पैसे जमा केले नाहीत तर पुढील महिन्यात या 1000 रुपयांवर 10 रुपये दंड आकारला जाईल. म्हणजे तुम्हाला मागील महिन्यासाठी एकूण 1010 रुपये द्यावे लागतील.

अटल पेन्शन योजनेतून पैसे काढण्याची प्रक्रिया

👉सबस्क्राइबरला ६० वर्षे पूर्ण झाल्यावर

1. मग या योजनेचा सबस्क्राइबर त्याच्या बँकेला पेन्शन सुरू करण्याची विनंती करू शकतो.
2. जर सबस्क्राइबरचा मृत्यू झाला तर त्याच्या जोडीदाराला दर महिन्याला समान पेन्शन मिळेल.
3. आणि जर सबस्क्राइबर आणि त्याचा जोडीदार दोघेही मरण पावले, तर नॉमिनीला संपूर्ण पेन्शन मिळेल.

👉सबस्क्राइबर वयाच्या ६० वर्षापूर्वी बाहेर पडल्यास

1. जर एखाद्या सबस्क्राइबरला या योजनेतून स्वतःहून पैसे काढायचे असतील, तर त्याने भरलेले पैसे त्याला व्याजासह परत केले जातील (पण maintenance charges वजा केल्यानंतर).
2. जर सरकारने तुमच्या वतीने या योजनेत अर्धे पैसे दिले असतील (जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा एक वर्ष ही सुविधा होती की सरकार तुमच्या वतीने पैसे भरायचे) आणि तुम्ही मुदतपूर्ती पैसे काढणार असाल तर तुम्हाला कोणताही रिटर्न मिळणार नाही.

👉सबस्क्राइबरचा 60 वर्षापूर्वी मृत्यू झाल्यास 

1. सबस्क्राइबरच्या जोडीदाराला अटल पेन्शन योजना सुरू ठेवण्याचा पर्याय आहे. (सबस्क्राइबरच वय ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत)
2. जर सबस्क्राइबरचा मृत्यू झाला तर त्याच्या जोडीदाराला दर महिन्याला समान पेन्शन मिळेल.
3. आणि जर सबस्क्राइबर आणि त्याचा जोडीदार दोघेही मरण पावले, तर नॉमिनीला संपूर्ण पेन्शन मिळेल.

मराठी फायनॅन्सकडून एक टीप

अनेकदा असे घडते की लोक अशा योजनांमध्ये पैसे भरतात पण त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे नसतात किंवा असले तरी काही वर्षांनी ते गायब होतात. जरा विचार करा, 60 वर्षे खूप दूर आहेत, तोपर्यंत तुम्हाला ती सर्व कागदपत्रे सुरक्षित ठेवावी लागतील.

ज्या बँकेतून तुम्ही ही योजना घ्याल, त्या बँकेचे अधिकारी बदलत राहतात (कारण मी सुद्धा एका बँकमध्ये काम करतो आणि हे सीन मी रोज बघतो) त्यामुळे प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही अशा योजनेत इनवेस्ट करताना जो फॉर्म भरता त्याची एक कॉपी तुमच्याकडे ठेवा. आणि त्यावर बँकेचा स्टॅम्प नक्की घ्या. कारण काही वर्षानी तुम्ही चौकशी करायला जाल तेव्हा हातात काहीरी असायला हव. आणि त्यासोबत तुमचा युनिक अकाउंट नंबर लक्षात ठेवा.

आणि राहीला प्रश्न  मनोजचा तर, त्याने ही योजना बंद केली पाहिजे आणि ते पैसे इतर Assets मध्ये इनवेस्ट केले पाहिजेत. कारण तो यंग आहे त्यात जॉबपण करत असेल. त्याच्यासाठी Provident Fund ची सुविधा आहे. किंवा तो स्वता आतापासून एक म्यूचुअल फंड निवडून रिटायरमेंटसाठी पैसे इनवेस्ट करू शकतो. आणि जस तो बोलला की 60 च्या वयात या योजेनेत मिळणारे पैसे त्याच्यासाठी पुरेसे नसतील कारण महागाई कुठे पोचली असेल.

अधिक महितीसाठी Atal Pension Yojana| National Portal of India

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance) 

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

फक्तं 67% भारतीय रिटायरमेंटसाठी तयार आहेत | PGIM India MF Retirement Survey

2 thoughts on “Atal Pension Yojana: काय आहे आणि तुम्ही घेतली पाहिजे का?”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi