Peter Lynch: पिटर लिंच हे Fidelity Investments (ही एक अमेरिकन कंपनी आहे) या कंपनीमध्ये 1977 ते 1990 या दरम्यान फंड मॅनेजर होते. ते Magellan Fund मॅनेज करायचे.
आणि त्यांनी 13 वर्षाच्या कालावधीत दर वर्षाला 29.20% एवढा Average रिटर्न दिला आहे. हा आता पर्यंतचा एक बेस्ट रेकॉर्ड आहे. फंड मॅनेजर चांगले रिटर्न आणून देतात ही माहीत आहे पण सतत 13 वर्षे एवढा रिटर्न देणे म्हणजे कमालच आहे. पण एवढा चांगला रिटर्न देऊन पण एका इंटरव्ह्युमध्ये पिटर लिंच यांनी सांगितल की, आमच्या फंडमध्ये इन्वेस्टर Average फक्त 7% चा रिटर्न कमविला आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडेल की फंडचा रिटर्न 29.20% आणि इन्वेस्टरला मिळाले फक्त 7% कस शक्य आहे? याच कारण अस की जेव्हा मार्केट डाऊन व्हायच इन्वेस्टर लगेच पैसे काढायचे आणि मार्केट पुन्हा वर गेल की पैसे इन्वेस्ट करायचे.
याचा अर्थ असा की, जेव्हा मार्केट डाऊन होत तेव्हा आधीच आपण लॉसमध्ये असतो आणि त्याच वेळी पैसे काढले तर अजून लॉस होतो. आणि जेव्हा मार्केट पुन्हा वर जायला सुरुवात होते तेव्हा आपण त्यात पैसे इन्वेस्ट करायला जातो. पण मार्केट खूप महाग झालेल असत. अस केल्याने ना धड Compoundig चा फायदा होतो ना कधी वेल्थ बनते.
आणि हेच पिटर लिंच यांच्या इन्वेस्टरसोबत झाल. त्यांनी पैसे लॉन्ग टर्मसाठी कधी ठेवलेच नाहीत. आपल्या संगळ्याना यातून एक धडा घेण्यासारखा आहे तो म्हणजे तुम्ही कितीही चांगला फंड निवडा, त्याचा फंड मॅनेजर पण अगदी बेस्ट असेल पण जर तुम्ही त्या फंडमध्ये टिकून नाही राहिलात तर कधीच तुम्हाला वेल्थ बनवता येणार नाही.
शेअर मार्केट असाच आहे. कधी वर जातो तर कधी खाली येतो. तुम्ही या सगळ्यात तुमची SIP कशी चालू ठेवता ही आपल्या सगळ्यांची खरी परीक्षा असणार आहे. आपण सगळे बोलतो की मी लॉन्ग टर्म साठी इन्वेस्ट करत आहे. मनासारखा रिटर्न नाही मिळाला की लगेच फंड बदलत असतो. आणि कोरोनानंतर मार्केट 38% ने डाऊन जल होत त्यानंतर अजून कोणी मार्केट क्रॅश पाहिला नाहीये. पण तो कधी ना कधी नक्की येईल जर तुम्ही पुढच्या 20 वर्ष पैसे इन्वेस्ट करण्यासाठी प्लान करत आहात.
मी तुम्हाला घाबरवत नाहीये. पण आपण प्रत्येकाने आपला Mindset हा लॉन्ग टर्म इन्वेस्टरचा बनविला पाहिजे. आणि हो पिटर लिंच यांची बुक्स नक्की वाचा. खूप काही शिकायला मिळेल.
Peter Lynch Books in Marathi
1) One Up on Wall Street (1989): या बूकमध्ये, लिंच त्यांच्या Investing च्या दृष्टिकोनावर चर्चा करत आणि सामान्य इन्वेस्टर फायदेशीर investing ची संधी कशा ओळखू शकतात याबद्दल सल्ला दिला आहे.
2) Beating the Street (1993): या बूकमध्ये लिंच त्यांची गुंतवणूक धोरणे आणि अनुभव शेअर करत आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी ती कशी लागू केली हे स्पष्ट करण्यासाठी काही उदाहरणे आणि केस स्टडीज दिल्या आहेत.
3) Learn to Earn (1995): या बूकमध्ये नवशिक्या आणि तरुण इन्वेस्टरसाठी बेसिक धडे दिले आहेत. यात Investing, बिझनेस आणि शेअर मार्केटच्या मूलभूत कन्सेप्ट सोप्यारित्या मांडल्या आहेत.
शेअर करा टॅग करा 🚀
बस एक छोटी हेल्प करा, ही पोस्ट तुमच्या इन्वेस्टर मित्रांसोबत शेअर करा पोस्टला प्लीज शेअर करा. तुमच्या Insta स्टोरीवर ठेवून @marathifinance ला टॅग करा. आम्ही पेजवर स्टोरी नक्कीच शेअर करू. Thank You in Advance! 🙏
इतर पोस्ट वाचा👉 Sukanya Samriddhi Yojana: काय आहे सुकन्या समृद्धी योजना (मुलींसाठी 8.20% इंटरेस्ट रेट)
फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)