Personal Finance चे 5 Principles (न बोलले जाणारे)

पर्सनल फायनान्स (Personal Finance)  हा प्रत्येक व्यक्तीसाठी अनोखा प्रवास आहे, जो त्यांच्या आकांक्षा, ज्ञान आणि स्वभावाने प्रभावित होतो. या मार्गावर यशस्वी होण्यासाठी, पर्सनल फायनान्सचे पाच तत्त्वांना आत्मसात केले पाहिजेत, ज्यात व्यक्तिमत्व (individuality), आत्मपरीक्षण (introspection), जडत्व (inaction), कल (inclination) आणि माहिती (information) या तत्त्वांचा समावेश आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे आपल्याला माहितीपूर्ण निर्णय घेण्याकडे, आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि भविष्य सुरक्षित करण्यासाठी मदत करतात.

पहिलं तत्व :- व्यक्तिमत्व (Individuality)

आर्थिक यशाची पहिली पायरी म्हणजे हट्टीपणा सोडणे. संपत्ती निर्मितीत अडथळा आणू शकणारी पारंपारिक गुंतवणुकीच्या साधनांशी असलेला हट्ट. आजपण अनेक लोक फक्त FD किंवा पारंपारिक इनवेस्टमेंट प्लॅन्स यामध्ये पैसे इनवेस्ट करतात.  आणि याचा परिणाम असा होतो की ते कधीच मोठी संपत्ती निर्माण करू शकत नाही.

पर्सनल फायनान्स (Personal Finance)  समजून घेताना सगळ्यात आधी Asset Allocation समजून घेणे महत्वाचे आहे. कोणत्या Asset मध्ये नक्की किती पैसे इनवेस्ट करायचे जेणेकरून तुमची रिस्क कमी आणि रिटर्न जास्त मिळतील हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. एकदा का तुम्ही पैसे कुठे आणि किती गुंतवायचे हे ठरवळत की तुमच्या आर्थिक ध्येयांशी संरेखित मार्ग तुम्हाला सापडेल. आणि त्यानंतर लोक काय करत आहेत किंवा कुठे इनवेस्ट करत आहेत अशा दबावाची पर्वा न करता तुम्ही निवडलेल्या इनवेस्टिंग स्टाइलसोबत तुम्ही चिकटून राहू शकता.

दुसर तत्व :- आत्मपरीक्षण (Introspection)

कोणत्याही आर्थिक प्रयत्नांसाठी आत्मभान महत्त्वाचे असते. तुमच्या चालू आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करून आणि तुमचे ध्येय निश्चित करून तुम्ही सुरुवात केली पाहिजे. तुमच्या गरजा, जोखीम सहिष्णुता आणि गुंतवणुकीसाठी द्यावा लागणारा टाइम समजून घ्या. मार्केटमध्ये काय ट्रेंडमध्ये आहे या मागे धावण्यापेक्षा, तुमच्या परिस्थितीनुसार रणनीती तयार करण्यावर लक्ष केंद्रित करा.

नेहमी बेस्ट स्टॉक, बेस्ट म्यूचुअल फंड यामागे धावणे टाळा किंवा इतर लोक जे करत आहेत त्याला न समजता कॉपी करणे थांबवा. त्याऐवजी, तुमच्यासाठी सर्वात योग्य आणि अनावश्यक गुंतागुंत कमी करणारा मार्ग शोधण्यास प्राधान्य द्या. कारण अस केल्याने तुम्ही तुमच्या आर्थिक प्रवासात लॉन्ग टर्मसाठी टिकून राहाल.

तिसर तत्व :- निष्क्रियता (Inaction)

निष्क्रियता (Inaction) म्हणजे काही न करणे. आता ही निष्क्रियता एकतर आपल्या आर्थिक प्रवासात अडथळा आणू शकते किंवा मदत करू शकते. पर्सनल फायनान्स मॅनेज करताना जगरुक राहणे गरजेच आहे. आपण सगळेच एकतो की एवढे स्टॉक घ्या आणि विसरून जा किंवा हे म्यूचुअल फंड्स घ्या आणि विसरून जा. पण खर तर हे बोलायला सोप आहे पण करायला तेवढंच कठीण कारण फायनान्स हे अस क्षेत्र आहे जिथे सतत तुम्हाला जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचं आहे.

पण हे करत असताना सतत तुमच्या आर्थिक प्लॅनमध्ये बदल करत राहणे हे देखील चुकीच आहे.  तुमच्या प्लॅन गतिमान करण्याबद्दल नेहमीच सावधगिरी बाळगा. पण एखादी गोष्ट किंवा प्लॅन अगदी चांगले काम करीत आहे हे ओळखणे आणि त्यामध्ये नको ते बदल करणे टाळणे हे ओळखण तितकच गरजेच आहे. जर तुम्ही  केलेली गुंतवणूक समाधानकारक प्रगती करत असेल तर तुमच्या प्लॅनिंगवर विश्वास ठेवा आणि शॉर्ट टर्ममधील चढउतारांना बळी पडणे टाळा.

हे वाचा:- मार्केटमधून रिटर्न कोण कमवितो? 

चौथ तत्व :- प्रवृत्ती (Inclination)

वेळोवेळी बदलण्याची आणि सुधारण्याची तुमची प्रवृत्ती ही तुमच्या आर्थिक कृतींमागील प्रेरक शक्ती असली पाहिजे. लाइफमध्ये विकसित होण्यासाठी खुल्या मानसिकतेचा  स्वीकार करा.  तुमचा कल, तुमची आवड एक प्रकारची चिंगारी असू द्या जी तुम्हाला तुमच्या आर्थिक भविष्याची जबाबदारी घेण्यास प्रेरित करेल.  जे सगळे जण करीत आहेत म्हणून तुम्ही सुद्धा तेच केल पाहिजे अस गरजेच नाही. पण तुमच्या ध्येयाशी सुसंगत असे बदल स्वीकारण्यासाठी तुम्हाला तत्पर राहाव लागेल.

पाचव तत्व :- माहिती (Information)

माहितीच्या ओझ्याच्या युगात ज्ञान आणि माहिती यांच्यात फरक करणे गरजेच आहे. आजकाल ऑनलाईन आपल्याला हवी ती माहीत अगदी काही क्लिक केले की लगेच उपलब्ध होते. पण हीच माहिती आजकाल सगळयात मोठा प्रॉब्लेम झाला आहे कारण प्रत्येकजण माहिती तर घेतो पण त्या माहितीचा वापर खूप  कमी लोक करतात. विविध विषयांवर अभ्यासपूर्ण ज्ञान घेऊन मग ते बुक्सच्या माध्यमातून असो की आजकाल संगळ्यांच आवडत माध्यम म्हणजे यूट्यूब असो.  हव तिथून ज्ञान घ्या पण तुमचा आर्थिक समज सखोल करा. योग्य ज्ञानतून मिळालेला समजूतदारपणा तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास नेहमीच मदत करेल.

आपण या पोस्टमधून काय शिकलो?

एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, पर्सनल फायनान्समध्ये प्रभुत्व मिळविणे कला आणि विज्ञानाचे मिश्रण आहे, ज्यासाठी तुम्हाला Theory आणि प्रॅक्टिकल  यांच्यात संतुलन राखणे आवश्यक आहे. पर्सनल फायनान्सच्या या 5 तत्वांच्या मदतीने तुमच्या आर्थिक प्रवासाचा पाया रचला पाहिजे. या परिवर्तनकारी प्रवासाला सुरुवात करताना लक्षात ठेवा की ही तत्त्वे एकमेकांशी जोडलेली आहेत.

तुमचे व्यक्तिमत्त्व तुमच्या आत्मपरीक्षणावर परिणाम करते, ज्यामुळे कार्य करण्याची तुमची प्रवृत्ती वाढते. निष्क्रियता, जेव्हा संतुलित होते, काय करायच आणि काय नाही हे जेव्हा तुम्हाला स्पष्ट होते तेव्हा ती तुम्हाला पुढे नेणारी शक्ती बनते. योग्य माहितीसह, तुम्ही तुमच्या आर्थिक आकांक्षांशी सुसंगत असे निर्णय घ्याल.


या पोस्टमधून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळाल असेल. पोस्ट शेअर करा. भेटू आता पुढच्या पोस्टमध्ये. Keep Investing!

5 thoughts on “Personal Finance चे 5 Principles (न बोलले जाणारे)”

Leave a Comment

श्रीमंत व्यक्तींच्या 5 सवयी (ज्या तुम्ही विकसित केल्या पाहिजेत) Nova Agritech IPO GMP: ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? BLS-E Services IPO: अप्लाय करण्याआधी डीटेल माहिती वाचा डिटेल माहिती: HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य कस मिळेल? | 3 Steps of Financial Freedom in Marathi