Groww App मध्ये इतर Investing Apps वरील म्यूचुअल फंडस कसे बघायचे? | How to Track Your External Mutual Funds on Groww App

Rate this post

How to Track Your External Mutual Funds on Groww App: आपल्या पेजवरील एक फॉलोवर, रोहितने मला असा मेसेज केला की त्याच्या बहिणीने चुकून Groww App मध्ये Import External Funds या ऑप्शनवर क्लिक केल. तर त्याने काय इश्यू तर होणार नाही ना? आपण समजून घेऊ की हा ऑप्शन काय आहे आणि याचा फायदा काय आहे?

How to track external mutual funds on Groww App

म्यूचुअल फंडमध्ये पैसे इन्वेस्ट करण्यासाठी मी Groww App वापरतो कारण याच User Interface खूप सिम्पल आहे. मला खात्री आहे तुमच्यापैकी खूप जण Groww App वापरत असतील.

तर Groww App मध्ये एक चांगला फीचर असा आहे की तुम्ही इतर कोणत्याही Investing Apps जस की Zerodha, Upstox, Angel One किंवा इतर कोणताही App, त्यावर जर म्यूचुअल फंड SIP करत असाल तर ती तुम्ही Groww App मध्ये इम्पोर्ट म्हणजेच ट्रान्सफर करू शकता.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
इतर Apps वरील म्यूचुअल फंड Groww App वर इम्पोर्ट कसे करायचे? 

Step 1: Groww App मध्ये Mutual Fund या सेक्शनमध्ये जा

Step 2: Quick Access या सेक्शनमध्ये Import Funds या टॅबवर क्लिक करा

Manage All External Funds on Groww

Step 3: एक OTP येईल आणि पुढील 10-15 मिनिटात तुमचे इतर ठिकाणी असलेले म्यूचुअल फंड Groww App वर बघू शकता.

इतर Apps वरील म्यूचुअल फंड SIP, Groww App वर कंटिन्यू करू शकतो का? 

होय करू शकता. काही म्यूचुअल फंड असे आहेत जे तुम्ही डायरेक्ट Groww App मध्ये कंटिन्यू करू शकता किंवा त्यामध्ये अजून एक्स्ट्रा पैसे इन्वेस्ट करू शकता. पण काही फंडस असे असतात जे फक्त तुम्ही ट्रॅक करू शकता.

Groww App वरील Import Funds या ऑप्शनचा तुम्हाला फायदा काय होईल? 

आपल्या संगळ्यांना चांगलच माहीत आहे की, Groww, Zerodha किंवा यासारखे इतर Apps हे काही वर्षापासून प्रसिद्ध झाले आहेत. त्याआधी अनेक जण ऑफलाइन बँकमध्ये किंवा एखाद्या एजेंटच्या माध्यमातून म्यूचुअल फंडमध्ये पैसे इन्वेस्ट करायचे.

आता प्रॉब्लेम असा होतो की अशा वेळी सगळे म्यूचुअल फंड एकाच ठिकाणी ट्रक करणे शक्य होत नाही. पण जर तुम्ही Groww App वापरत असाल तर तुमचा हा प्रॉब्लेम नक्कीच दूर होवू शकतो.

म्यूचुअल फंडसाठी बेस्ट App 👉 Groww
पण तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की इतर Investing Apps वरील म्यूचुअल फंड Groww App कसे दिसू शकतात?

याच उत्तर अगदी सोप आहे. तुम्ही कितीही म्यूचुअल फंडसमध्ये इन्वेस्ट करा. तुमचा PAN हा एकच असतो. बरोबर ना. जेव्हा तुम्ही Groww App वर इतर म्यूचुअल फंडस ट्रॅक करण्याची Request टाकता तेव्हा Groww App ती Request MFcentral कडे पाठवत जिथून तुमच्या सगळ्या म्यूचुअल फंडसच  CAS or consolidated account statement मिळत आणि तुम्हाला तुमचे सगळे फंड्स Groww App वर दिसतात.

माहिती फायद्याची वाटली असेल तर तुमच्या फॅमिली मेंबरसोबत शेअर करा ज्याना त्यांचे म्यूचुअल फंड एकाच ठिकाणी मॅनेज करायचे आहेत. Happy Investing!

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉आधी ध्येय ठरवा मग म्यूचुअल फंड निवडा | Goal Based Mutual Fund Investing in Marathi (marathifinance.net)

3 thoughts on “Groww App मध्ये इतर Investing Apps वरील म्यूचुअल फंडस कसे बघायचे? | How to Track Your External Mutual Funds on Groww App”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi