IREDA IPO चा स्टॉक एक्स्चेंजवर जबरदस्त DEBUT, शेअर विकून प्रॉफिट घ्यावा की होल्ड कराव?

Rate this post

Indian Renewable Energy Development Agency (IREDA) ने दिनांक नोव्हेंबर 29, 2023 रोजी शेअर मार्केटमध्ये एक जबरदस्त Debut केला आहे. IREDA चे शेअर्स ₹50 प्रत्येक शेअर असे लिस्ट झाले आहेत. जेव्हा हा IPO लाँच झाला तेव्हा एका शेअरसाठी तुम्हाला ₹32 द्यावे लागले होते. याचा अर्थ असा की पहिल्याच दिवशी या शेअरने 56% च प्रॉफिट Investors ना दिले आहे.

अनेक शेअर मार्केट Analysts लगेच हा न विकता मिडीयम ते लाँग टर्म होल्ड करायचा सल्ला देत आहे. याच कारण अस की ही एक सरकारी आहे. आणि त्यासोबत या शेअरचे Fundamentals मजबूत आहेत आणि शेअरमधे चांगल ग्रोथ पोटेन्शियल दिसत आहे.

IREDA चा चांगला Financial Performance आणि Renewable एनर्जी सेक्टरवरील फोकसमुळे हा शेयर एक Attractive investment ऑप्शन बनत आहे.

Renewable एनर्जी सेक्टरकडे येत्या काळात सरकारच खास लक्ष असेल. कारण Environment च्या दृष्टीकोनातून हा एक महत्वाचा सेक्टर आहे. येत्या काळात सरकार अनेक विविध उपक्रम या सेक्टरसाठी राबवेल अशी अशा आहे. त्यामुळे तुम्हाला हा IPO लागला असेल तर उगाच लगेच शेअर्स विकायला जावू नका.

IREDA IPO Subscription माहिती 

IREDA IPO ला विविध प्रकारच्या Investors कडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. हा आयपिओ 38.8 Times Subscribed झाला होता. या आयपिओची इश्यू Size 47.09 शेअर्स विकण्यासाठी होती. पण एवढ्या शेअर्ससाठी जवळजवळ 1,827.25 एवढे शेअर्ससाठी ॲप्लिकेशन आले होते.

QIB (Qualified Institutional Buyers) नी या IPO ला जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. या कॅटेगरीमध्ये हा IPO 104.57 Times Subscribed झाला आहे. QIB कॅटेगरीमध्ये यामध्ये मोठ मोठ्या Mutual Funds कंपन्या, पेन्शन फंड, Insurance कंपन्या, बँका इत्यादिचां समावेश होतो.

NII (Non-Institutional Investors) या कॅटेगरीमध्ये हा IPO 24.16 Times Subscribed झाला आह. NII म्हणजे भरतीय नागरिक,NRI (बाहेर देशात राहणारा भारतीय व्यक्ती), HUF – Hindu Undivided Family चा कर्ता, एखादी ट्रस्ट, सोसायटी इ. जे २ लाखापेक्षा जास्त शेअर्ससाठी Apply करतात.

आता राहिले आपल्या सारखे सामान्य माणूस म्हणजेच Retail Investors. या कॅटेगरीमध्ये हा IPO साठी 7.73 Times Subscribed झाला आहे.

REDA कंपनी बद्दल सांगायचं झाल तर १९८७ मध्ये या कंपनीची सुरुवात झाली असून ही १००% सरकारी मालकी असलेली कंपनी आहे.  IREDA कंपनीच काम हेच आहे की ती विविध Renewable एनर्जी संबधीत प्रोजेक्टसाठी लोन देते. त्या सोबत IREDA आपल्या Clients ना Renewable एनर्जी प्रोजेक्ट संबधी मार्गदर्शन पण करते. 


फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance) | Instagram profile

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

[डीटेल माहिती] Tata Technologies IPO Allotment Date: – फायनल प्राइस Rs. 500 रुपये?

Share Market काय आहे? (Detail Information in Marathi)

Sensex & Nifty: – सेन्सेक्स आणि निफ्टी काय आहे? 

2 thoughts on “IREDA IPO चा स्टॉक एक्स्चेंजवर जबरदस्त DEBUT, शेअर विकून प्रॉफिट घ्यावा की होल्ड कराव?”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi