Flair Writing Industries IPO: – फ्लेअर रायटिंग इंडस्ट्रीज IPO ने जबरदस्त मार्केट एन्ट्री केली पण नंतर लोअर सर्किट लागलं

Rate this post

Flair Writing Industries IPO

फ्लेअर रायटिंग इंडस्ट्रीजच्या IPO ने बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर दिनांक नोव्हेंबर 30, 2023 रोजी एन्ट्री घेतली आहे. पण ही एंट्री Investors साठी एका रोलरकोस्टर राईडपेक्षा कमी नव्हती. या IPO ने अपेक्षेपेक्षा जास्त चांगला परफॉर्मन्स अगदी पहिल्या दिवशी केला आहे. मार्केटमधील Investors कडून मोठ्या प्रमाणात मिळणारा प्रतिसाद आणि उत्साह हा प्रत्येक IPO साठी बघायला मिळत आहे जस की Tata Technologies IPO, IREDA IPO, Gandhar Oil Refinery IPO इ.

BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर हा IPO ₹503 प्रत्येक शेअरच्या हिशोबाने उघडला. पहिल्याच दिवशी 65% च्या जबरदस्त प्रीमियमवर उघडलेल्या या स्टॉकने सुरुवातीला खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला. पण लिस्टिंगनंतर 10% ने या स्टॉकमध्ये घसरण झाली आणि मार्केट बंद होताना हा स्टॉक ₹452.70 रुपयांपर्यंत खाली आला. 

या ब्लॉग पोस्टमध्ये, आपण फ्लेअर रायटिंगच्‍या IPO च्या मार्केटमधील सुरुवातीची कामगिरी आणि या IPO बद्दल इंडस्ट्री एक्सपर्ट काय म्हणत आहेत हे जाणून घेऊ.

Flair Writing Industries IPO: – सुरुवात तर मस्त झाली.

फ्लेअर रायटिंग इंडस्ट्री IPO ने शेअर मार्केटमध्ये उल्लेखनीय एन्ट्री घेतली. BSE आणि NSE या प्रमुख स्टॉक एक्सचेंजवर 65% प्रीमियमसह प्रवेश केला. (प्रीमियम म्हणजे थोडक्यात काय तर एवढा प्रॉफिट झाला) हा IPO BSE वर ₹503 रुपये आणि NSE वर ₹501 रुपयांवर उघडला. IPO जेव्हा चालू झाला तेव्हा याची issue price ₹304 होती. सुरुवातीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक ₹514 रुपयांपर्यंत पोहोचला आणि यामध्ये 69% ची वाढ झाली, पण हा आनंद जास्त वेळ टिकला नाही.

Flair Writing Industries IPO: – लोअर सर्किट्समध्ये IPO अडकला.

जोरदार सुरुवात असूनही, फ्लेअर रायटिंगला सुरुवातीची Growth जास्त वेळ टिकवता आली नाही. हा IPO 10% ने घसरून त्याची किंमत ₹452.70 वर आली आणि हा स्टॉक लोअर सर्किटमध्ये अडकला. (लोअर सर्किट म्हणजे कमीत कामी एखद्या स्टॉकची किंमत, ज्या किमती पर्यंत एखादा स्टॉक खाली पडू शकतो जेणेकरून Investors चा लॉस होवू नये) अचानक हा स्टॉक एवढ़ा पडला त्यामुळे Investors असो की स्टॉक एक्सपर्ट सगळ्यांना टेन्शनमध्ये टाकलं आहे.

Flair Writing Industries IPO: – सबस्क्रिप्शन माहिती 

Flair Writing IPO सगळ्या कॅटेगरी एकत्र पाहिलं तर ४९.२८ Times Subscribed झाला होता. 

त्यांपैकी QIB (Qualified Institutional Buyers) नी या IPO जबरदस्त प्रतिसाद दिला होता. या कॅटेगरीमध्ये हा IPO १२२.०२ Times Subscribed झाला होता. QIB कॅटेगरीमध्ये यामध्ये मोठ मोठ्या Mutual Funds कंपन्या, पेन्शन फंड, Insurance कंपन्या, बँका इत्यादिचां समावेश होतो.

NII (Non-Institutional Investors) या कॅटेगरीमध्ये हा IPO ३५.२३ Times Subscribed झाला होता. NII म्हणजे भरतीय नागरिक,NRI (बाहेर देशात राहणारा भारतीय व्यक्ती), HUF – Hindu Undivided Family चा कर्ता, एखादी ट्रस्ट, सोसायटी इ. जे २ लाखापेक्षा जास्त शेअर्ससाठी Apply करतात.  

आता राहिले आपल्या सारखे सामान्य माणूस म्हणजेच Retail Investors. या कॅटेगरीमध्ये Flair Writing IPO १३.७३ Times Subscribed झाला होता.

Flair Writing Industries IPO: – स्टॉक एक्स्पर्ट काय म्हणत आहेत? 

  • StoxBox चे पार्थ शहा यांनी या स्टॉकवर विश्र्वास ठेऊन मिडीयम ते लाँग टर्मसाठी तुम्ही हा स्टॉक ठेवला पाहिजे असा सल्ला देत आहेत.
  • Hensex Securities चे महेश ओझा हे सांगतात की भारताच्या Writing मार्केटमध्ये Flair Writing Industries चा 9% एवढी मार्केट हिस्सेदारी आहे. ओझा याणी असा सल्ला दिला आहे की 50% शेअर्सवर प्रॉफिट बूक करा आणि उरलेले लाँग टर्मसाठी ठेऊन द्या.
  • नरेंद्र सोलंकी, Anand Rathi Shares & Stockbrokers असा सल्ला देतात की Flair Writing Industries या कंपनीचा ट्रेक रेकॉर्ड उत्तम आहे मग ते प्रॉफिट असो की ग्रोथ. नरेंद्र सांगतात की कंपनीकडे विविध प्रकारचे प्रोडक्ट आहेत. शिवाय भारतीय मार्केट असो की बाहेर देशात, कंपनीची चांगली पकड आहे. ते सांगतात की स्टॉक लाँग टर्मसाठी होल्ड करा.
  • Swastika Investment च्या शिवानी न्याती सांगतात की, Flair Writing Industries या कंपनीचे Fundamentals उत्तम आहेत. फ्युचरमध्ये या स्टॉकमध्ये चांगल ग्रोथ पोटेन्शियल आहे. Investors नी Flair Writing IPO कडे एक लाँग टर्म संधी म्हणून बघितलं पाहिजे.

Aspect Details
IPO Entry Date November 30, 2023
Stock Exchanges Bombay Stock Exchange (BSE) and National Stock Exchange (NSE)
IPO Listing Price BSE: ₹503 per share, NSE: ₹501 per share
Initial Trading Performance 65% premium on the first day, BSE: ₹514, NSE: ₹514.15
Closing Price on Listing Day ₹452.70
IPO Subscription Details Oversubscribed 49.28 times
– QIB (Qualified Institutional Buyers) Subscribed 122.02 times
– NII (Non-Institutional Investors) Subscribed 35.23 times
– Retail Investors Subscribed 13.73 times
Analyst Recommendations – Parth Shah (StoxBox): Hold for medium to long-term
– Mahesh M. Ojha (Hensex Securities): Book 50% profit, hold the rest for long term
– Narendra Solanki (Anand Rathi): Hold for the long term
– Shivani Nyati (Swastika Investmart): Positive outlook, fundamentally sound

 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance) | Instagram profile

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

IREDA IPO चा स्टॉक एक्स्चेंजवर जबरदस्त DEBUT, शेअर विकून प्रॉफिट घ्यावा की होल्ड कराव?

Gandhar Oil Refinery IPO: – पहिल्याच दिवशी 76% रिटर्न, प्रॉफिट बुक कराल की स्टॉक होल्ड कराल?

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi