Innova Captab IPO Allotment Status: इनोव्हा कॅपटॅब आयपीओ 21 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाला होता आणि 26 डिसेंबर 2023 रोजी बंद झाला. आइनोव्हा कॅपटॅब आयपीओची इश्यू प्राइस 570 करोड रुपये होती. आणि या आयपीओची प्राईस बॅंड 426 रुपये ते 448 रुपये प्रति शेअर निश्चित केला होता. इनोव्हा कॅपटॅब आईपीओची अलॉटमेंट तारीख आज म्हणजेच 27 डिसेंबर 2023 ही ठरविण्यात आली आहे.
ज्या लोकांना या आयपीओ अलॉट झाला असेल त्यांना 28 डिसेंबर 2023 ला शेअर्स त्यांच्या डिमॅट अकाउंटमध्ये येतील. पण ज्या लोकांनी या आयपीओसाठी अप्लाय केलं होत पण त्यांना शेअर्स अलॉट नाही होणार त्यांचे पैसे रीफंड केले जातील. रीफंडची प्रोसेस 28 डिसेंबर 2023 ला चालू होईल. या आयपीओची लिस्टिंग BSE आणि NSE वर 29 डिसेंबर 2023 ला होईल.
Innova Captab Company Details
इनोव्हा कॅपटॅब ही एक फार्मास्यूटिकल कंपनी आहे जिची सुरवात 2005 मध्ये झाली होती. इनोव्हा कॅपटॅब कंपनी फार्मा सेक्टरमध्ये रिसर्च, डेवलपमेंट, मार्केटिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्ट इ. मध्ये पारंगत आहे. कंपनीकडे 600 पेक्षा जास्त प्रॉडक्ट उपलब्ध आहेत ज्यांना 5000 Distributors च्या मदतीने पूर्ण भारतभर पुरविले जात.
इनोव्हा कॅपटॅब कंपनी सध्या बड्डी, हिमाचल प्रदेशमध्ये मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी उपलब्ध आहे. आणि कंपनी लवकरच जम्मूमध्ये एक नवीन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी उभे करायच्या तयारीत आहे. CRISIL च्या रीपोर्टनुसार इनोव्हा कॅपटॅब कंपनी टॅब्लेट आणि कॅप्सुल बनविण्याच्या मॅन्युफॅक्चरिंग क्षमतेनुसार भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे.
How to check Innova Captab IPO Allotment Status on KFintech
स्टेप 1: अलॉटमेंट स्टेटस पेजवर लॉग इन करा 👉 IPO Allotment Status | Kfintech
स्टेप 2: Innova Captab IPO नाव सिलेक्ट करा
स्टेप 3: यांपैकी एखादा ऑप्शन सिलेक्ट करा – PAN नंबर, ॲप्लिकेशन नंबर किंवा DP ID ऑप्शन
स्टेप 4: सर्च ऑप्शन वर क्लिक करा
स्टेप 5: तुम्हाला Innova Captab IPO अलॉटमेंट स्टेटस बघायला मिळेल.
How to check Innova Captab IPO Allotment Status on BSE
स्टेप 1: BSE च्या ऑफीशियल वेबसाइटवर जा 👉 BSE (formerly Bombay Stock Exchange) (bseindia.com)
स्टेप 2: Issue Type च्या इथे Equity अस सिलेक्ट करा.
स्टेप 3: Drop-Down ऑप्शनमध्ये आयपीओच नाव सिलेक्ट करा.
स्टेप 4: PAN नंबर किंवा Application नंबर टाका.
स्टेप 5: I am not a robot अस कन्फर्म करुन मग सबमिट करा.
How to check Innova Captab IPO Allotment Status on NSE
स्टेप 1: NSE च्या ऑफीशियल वेबसाइटवर जा 👉 NSE – National Stock Exchange of India Ltd.
स्टेप 2: Click here to sign up हा ऑप्शन सिलेक्ट करा (PAN सोबत रजिस्टर करा)
स्टेप 3: यूजर नेम, पासवर्ड आणि Captcha कोड टाका.
स्टेप 4: तुम्हाला अलॉटमेंट स्टेटस बघायला मिळेल.
Innova Captab IPO Allotment & Listing Dates
Anchor Investors Allotment: | December 20, 2023 |
IPO Open Date: | December 21, 2023 |
IPO Close Date: | December 26, 2023 |
Basis of Allotment: | December 27, 2023 |
Refunds: | December 28, 2023 |
Credit to Demat Account: | December 28, 2023 |
IPO Listing Date: | December 29, 2023 |
Innova Captab IPO FAQs (in Marathi)
Question 1) इनोव्हा कॅपटॅब आयपीओची अलॉटमेंट तारीख काय आहे?
Answer: इनोव्हा कॅपटॅब आयपीओची अलॉटमेंट तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.
Question 2) इनोव्हा कॅपटॅब आयपीओची रिफंड तारीख काय आहे?
Answer: इनोव्हा कॅपटॅब आयपीओची रिफंड तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.
Question 3) इनोव्हा कॅपटॅब आयपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?
Answer: इनोव्हा कॅपटॅब आयपीओ 29 डिसेंबर 2023 ला BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल.
4 thoughts on “Innova Captab IPO: अलॉटमेंट स्टेटस कसा चेक कराल?”