Credo Brands (Mufti Jeans) IPO GMP: 2022 मध्ये मार्केट शेअरच्या बाबतीत मुफ्ती जीन्स हा भारतातील मिड-प्रिमियम आणि प्रीमियम पुरूषांच्या कॅज्युअल वेअर मार्केटमधील सर्वात मोठा स्वदेशी ब्रँड आहे. शर्टपासून ते टी-शर्टपर्यंत, जीन्सपासून चिनोपर्यंत मुफ्ती जीन्सचे प्रॉडक्टस सध्या सुरू असलेल्या फॅशन ट्रेंडला अनुसरून तरुण दिसण्यासाठी डिझाइन केलेली असतात.
क्रेडो ब्रँड्स (मुफ्ती जीन्स) आयपीओ 19 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाला होता आणि 21 डिसेंबर 2023 रोजी बंद झाला. क्रेडो ब्रँड्स (मुफ्ती जीन्स) आयपीओचा इश्यू साइज 550 करोड होता आणि प्राईस बॅंड 266 रुपये ते 280 रुपये प्रति शेअर निश्चित केला होता. आज 27 डिसेंबर 2023 रोजी दोन्ही एक्स्चेंज स्टॉक म्हणजेच BSE आणि NSE वर लिस्ट होणार आहेत.
Credo Brands (Mufti Jeans) IPO Listing gain
स्टॉक मार्केट एक्स्पर्टच्या मते क्रेडो ब्रँड्स (मुफ्ती जीन्स) आयपीओची लिस्टिंग इन्वेस्टरना चांगला रिटर्न देणारी नसेल.आयपीओला इन्वेस्टरकडून एवढा चांगला प्रतिसाद मिळाला होता. क्रेडो ब्रँड्स (मुफ्ती जीन्स) आयपीओची ग्रे मार्केटमध्ये चालू GMP (Grey Market Premium) 109 रुपये आहे. GMP च्या हिशोबाने पाहिल तर 280 रुपये + 109 रुपये म्हणजे टोटल 389 रुपये होतात. आणि म्हणून हा आयपीओ जवळजवळ 38% वर लिस्ट होईल असा मार्केट एक्स्पर्टचा अंदाज आहे.
Parameter | Amount (in INR) |
---|---|
IPO Price | 280 |
Grey Market Premium | 109 |
Listing Price (IPO + Premium) | 389 |
What is Grey Market Premium
कोणताही आयपीओ BSE आणि NSE सारख्या मोठ्या स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होण्याआधी Unofficial मार्केटमध्ये त्या आयपीओच्या शेअर्सची खरेदी विक्री होते यालाच ग्रे मार्केट अस म्हणतात. इथे शेअर्सची खरेदी विक्री ही over-the-counter market स्वरूपात केली जाते याचा अर्थ असा की इथे स्टॉक एक्स्चेंजचा काही संबंध येत नाही. ग्रे मार्केटमधील आयपीओची किंमत ही आयपीओच्या किंमतीपेक्षा वेगळी असू शकते. ग्रे मार्केट प्रीमियमवरुन एखादा आयपीओ लिस्ट झाला की प्रॉफिट देईल की लॉस याचा अंदाज लावला जातो.
Credo Brands (Mufti Jeans) IPO FAQs (in Marathi)
1) क्रेडो ब्रँड्स (मुफ्ती जीन्स) आयपीओ ची अलॉटमेंट तारीख काय आहे?
क्रेडो ब्रँड्स (मुफ्ती जीन्स) आयपीओ ची अलॉटमेंट तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.
2) क्रेडो ब्रँड्स (मुफ्ती जीन्स) आयपीओ ची रिफंड तारीख काय आहे?
क्रेडो ब्रँड्स (मुफ्ती जीन्स) आयपीओ ची रिफंड तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.
3) क्रेडो ब्रँड्स (मुफ्ती जीन्स) आयपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?
क्रेडो ब्रँड्स (मुफ्ती जीन्स) आयपीओ 27 डिसेंबर 2023 ला BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल.