Happy Forgings Share Price: स्टॉक एक्स्चेंजवर 18% प्रीमियम ने झाली लिस्टिंग

Rate this post

Happy Forgings Share Price: हॅप्पी फोर्जिंग्जच्या शेअर्सनी  स्टॉक मार्केटमध्ये मजबूत एन्ट्री घेतली आहे. हॅप्पी फोर्जिंग्ज आयपीओचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर  ₹1,001.25 रुपये प्रति शेअरने लिस्ट झाले आहेत. त्यासोबत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर या आयपीओचे शेअर्स  ₹1,000 रुपये प्रति शेअरने लिस्ट झाले आहेत. याचा अर्थ असा की इन्वेस्टरना पहिल्याच दिवशी 18% चा प्रॉफिट झाला आहे.

पण, आज सकाळीच लिस्ट झालेल्या या स्टॉकमध्ये इन्वेस्टरनी प्रॉफिट बुकिंग सुरू केली आणि हॅप्पी फोर्जिंग्ज शेअर NSE वर ₹961 प्रति शेअरच्या इंट्राडे लोवर सर्किट लागला. पण त्यानंतर या शेअरमध्ये इन्वेस्टरकडून Buying इंटरेस्ट बघायला मिळाला आणि पुन्हा हा शेअर NSE वर ₹1,044 च्या इंट्राडे High वर पोचला आहे.हॅपी फोर्जिंग्जच्या शेअरची किंमत सध्या NSE वर ₹1,025 प्रति शेअर आहे.

हॅप्पी फोर्जिंग्ज ही फोर्जिंग क्षमतेच्या बाबतीत भारतातील चौथ्या क्रमांकाची Engineering-led Manufacturer कंपनी आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार दर्जेदार आणि जटिल घटकांचे उत्पादन आणि पुरवठा करण्याचा 40 वर्षांहून अधिक अनुभव या कंपनीकडे आहे. त्यासोबत भारताच्या क्रँकशाफ्ट Manufacturing बिझीनेसमधील कमर्शियल वेहिकल आणि High Horse-Power इंडस्ट्रियल क्रँकशाफ्ट बनवणारी  सर्वात मोठी Manufacturing क्षमता असलेली दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. 

हॅप्पी फोर्जिंग्ज आयपीओ 19 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाला होता आणि 21 डिसेंबर 2023 रोजी बंद झाला. हॅप्पी फोर्जिंग्जआयपीओचा इश्यू साइज 1009 करोड होता आणि प्राईस बॅंड 808 रुपये ते 850 रुपये प्रति शेअर निश्चित केला होता. हॅप्पी फोर्जिंग्ज आयपीओची अलॉटमेंट तारीख 22 डिसेंबर 2023 होती. आज या आयपीओची बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टिंग झाली. 

इतर पोस्ट वाचा👉Innova Captab IPO: अलॉटमेंट स्टेटस कसा चेक कराल? 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi