Innova Captab IPO: इनोव्हा कॅपटॅब आयपीओ 21 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाला होता आणि 26 डिसेंबर 2023 रोजी बंद झाला. आइनोव्हा कॅपटॅब आयपीओची इश्यू प्राइस 570 करोड रुपये होती. आणि या आयपीओची प्राईस बॅंड 426 रुपये ते 448 रुपये प्रति शेअर निश्चित केला होता. इनोव्हा कॅपटॅब आईपीओची अलॉटमेंट तारीख 27 डिसेंबर 2023 ही ठरविण्यात आली आहे.
Innova Captab IPO Final Subscription Status (Day 3)
इनोव्हा कॅपटॅब आयपीओ सगळ्या कॅटेगरीमध्ये एकत्रित पाहिलं तर 55.17 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. त्यांपैकी QIB (Qualified Institutional Buyers) या कॅटेगरीमध्ये हा आयपीओ 116.73 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. QIB कॅटेगरीमध्ये यामध्ये मोठ मोठ्या म्यूचुअल फंड कंपन्या, पेन्शन फंड, इन्शुरेंस कंपन्या, बँका इत्यादिचां समावेश होतो.
NII (Non-Institutional Investors) या कॅटेगरीमध्ये हा आयपीओ 64.91 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. NII म्हणजे भरतीय नागरिक,NRI (बाहेर देशात राहणारा भारतीय व्यक्ती), HUF – Hindu Undivided Family चा कर्ता, एखादी ट्रस्ट, सोसायटी इ. जे २ लाखापेक्षा जास्त शेअर्ससाठी अप्लाय करतात. आता राहिले आपल्या सारखे सामान्य माणूस म्हणजेच रीटेल इन्वेस्टर आणि या कॅटेगरीमध्ये इनोव्हा कॅपटॅब आयपीओ 16.98 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे.
(फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance))
Innova Captab IPO Subscription Status Day 2
इनोव्हा कॅपटॅब आयपीओ सगळ्या कॅटेगरीमध्ये एकत्रित पाहिलं तर 3.54 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. त्यांपैकी QIB (Qualified Institutional Buyers) या कॅटेगरीमध्ये हा आयपीओ 1.09 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. QIB कॅटेगरीमध्ये यामध्ये मोठ मोठ्या म्यूचुअल फंड कंपन्या, पेन्शन फंड, इन्शुरेंस कंपन्या, बँका इत्यादिचां समावेश होतो.
Innova Captab Company Details
इनोव्हा कॅपटॅब ही एक फार्मास्यूटिकल कंपनी आहे जिची सुरवात 2005 मध्ये झाली होती. इनोव्हा कॅपटॅब कंपनी फार्मा सेक्टरमध्ये रिसर्च, डेवलपमेंट, मार्केटिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्ट इ. मध्ये पारंगत आहे. कंपनीकडे 600 पेक्षा जास्त प्रॉडक्ट उपलब्ध आहेत ज्यांना 5000 Distributors च्या मदतीने पूर्ण भारतभर पुरविले जात. इनोव्हा कॅपटॅब कंपनी सध्या बड्डी, हिमाचल प्रदेशमध्ये मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी उपलब्ध आहे. आणि कंपनी लवकरच जम्मूमध्ये एक नवीन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी उभे करायच्या तयारीत आहे. CRISIL च्या रीपोर्टनुसार इनोव्हा कॅपटॅब कंपनी टॅब्लेट आणि कॅप्सुल बनविण्याच्या मॅन्युफॅक्चरिंग क्षमतेनुसार भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे.
Innova Captab IPO Allotment & Listing Dates
Anchor Investors Allotment: | December 20, 2023 |
IPO Open Date: | December 21, 2023 |
IPO Close Date: | December 26, 2023 |
Basis of Allotment: | December 27, 2023 |
Refunds: | December 28, 2023 |
Credit to Demat Account: | December 28, 2023 |
IPO Listing Date: | December 29, 2023 |
Innova Captab IPO FAQs (in Marathi)
Question 1) इनोव्हा कॅपटॅब आयपीओची अलॉटमेंट तारीख काय आहे?
Answer: इनोव्हा कॅपटॅब आयपीओची अलॉटमेंट तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.
Question 2) इनोव्हा कॅपटॅब आयपीओची रिफंड तारीख काय आहे?
Answer: इनोव्हा कॅपटॅब आयपीओची रिफंड तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.
Question 3) इनोव्हा कॅपटॅब आयपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?
Answer: इनोव्हा कॅपटॅब आयपीओ 29 डिसेंबर 2023 ला BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल.
1 thought on “Innova Captab IPO: आयपीओ 55.17 टाइम्स सबस्क्राईब होवून झाला बंद”